Home /News /lifestyle /

Diwali recipes : शंकरपाळी करण्याची सगळ्यात सोपी कृती; पाहा 5 वेगवेगळ्या प्रकारचे Recipe VIDEO

Diwali recipes : शंकरपाळी करण्याची सगळ्यात सोपी कृती; पाहा 5 वेगवेगळ्या प्रकारचे Recipe VIDEO

छोट्या छोट्या टिप्ससह सांगितलेल्या YouTube वरच्या शंकरपाळ्यांच्या 5 बेस्ट रेसिपीज.. बाजारासारखी चव, झटपट कसे करायचे, कमी कॅलरीसाठी काय आणि पारंपरिक रेसिपी कुठली.. पाहा VIDEO

    मुंबई : दिवाळीचा फराळ हा सगळ्यांचाच 'जिव्हा'ळ्याचा विषय. यंदाची दिवाळी Coronavirus च्या सावटामुळे साधेपणाने साजरा करायचं आवाहन सगळ्याच माध्यमातून केलं जात आहे. साधेपणाने असली तरी दिवाळीत फराळ तर होणारच. या वेळी Work From Home असाल तर थोडा जास्त वेळ किचनमध्ये नक्की खर्च करू शकाल आणि म्हणून घरचा फराळ या दिवाळी होऊन जाऊ द्या. दिवाळी फराळाच्या पारंपरिक पदार्थांमध्ये शंकरपाळी असतातच. घरोघरी पारंपरिक पद्धतीने शंकरपाळी केली जातात. खुसखुशीत शंकरपाळ्याच्या सिक्रेट रेसिपी YouTube वर अनेक आहेत पण त्यात शंकरपाळ्याचं पीठ किती छान घट्ट आणि एकसंध मळलं जातंय यावर सगळं अवलंबून आहेत. आम्ही देत आहोत अशाच छोट्या छोट्या टिप्ससह सांगितलेल्या YouTube वरच्या शंकरपाळ्यांच्या 5 बेस्ट रेसिपीज.. या बेस्ट रेसिपीज आम्ही म्हणतोय त्यामागे वेगवेगळे निकष लावले आहेत. बाजारात मिळतात तशीच खुसखुशीत चवीची शंकरपाळी, लो फॅट शंकरपाळी, झटपट होणारा पण त्याच पारंपरिक चवीचा पदार्थ आणि कमीत कमी कष्ट आणि वेळ घालवून पण चवीत कॉम्प्रमाइज न करायला लावणरी रेसिपी शोधण्याच्या प्रयत्नात आमच्या हाती लागल्या YouTube वरच्या या 5 भन्नाट पाककृती 1. मैद्याऐवजी रवा वापरून शंकरपाळी मैद्याऐवजी रवा वापरल्यामुळे ही शंकरपाळी जास्त हेल्दी आहेत. दुसरं म्हणजे मिक्सरमध्ये पीठ मळून घ्यायला सांगितलं आहे. त्यामुळे फटाफट कमी वेळात आणि खुसखुशीत शंकरपाळी होतात, असं याचंं म्हणणं आहे. 2. जिभेवर विरघळणारी परफेक्ट शंकरपाळी या VIDEO मध्ये आजींनी पारंपरिक पद्धतीची परफेक्ट होणारी शंकरपाळी सांगितली आहेत. रेसिपी सांगायची पद्धत भन्नाट आहे आणि रेसिपीचं प्रमाण घरात उपलब्ध असलेल्या साध्या फुलपात्रात मोजलं आहे. त्यामुळे या पद्धतीने शंकरपाळी बनवली तर तोंडात विरघळतील, असा आजींचा दावा आहे. 3. पिझ्झा शंकरपाळी ही शंकरपाळ्यांची रेसिपी भन्नाट आहे. थोड्या वेगळ्या चवीची, मुलांना आवडतील अशी, बिस्किटासारखी लागणारी पिझ्झा शंकरपाळी नेहमीपेक्षा वेगळी चवीची म्हणून करायला हरकत नाहीत. 4. भन्नाट आकाराची शंकरपाळी शंकरपाळी म्हणजे चौकोनी किंवा चौकटच्या आकाराची हे समीकरण आहे. पण या VIDEO मध्ये वेगवेगळ्या 3 आकाराची शंकरपाळी कशी करायची हे सांगितलं आहे. 5. कुरकुरीत तिखट शंकरपाळी या VIDEO मध्ये तिखट शंकरपाळ्यांची रेसिपी दिली आहे. ओवा, जिरं आणि हिंगामुळे चव नक्की वेगळी लागणार आणि गोड गोड खाताना ही वेगळ्या चवीची शंकरपाळी करून पाहायला नक्कीच हरकत नाही.
    First published:

    Tags: Diwali 2020, Diwali Food, Diwali-celebrations

    पुढील बातम्या