मुंबई, 11 नोव्हेंबर : दिवाळी (diwali) म्हटलं की चकली आलीच. दरवर्षी दिवाळीला आपण चकली खातोच. मात्र तुम्ही कधी कडबोळीची (kadboli) चव चाखून किंवा बनवून खाल्ली आहे का? यंदा कोरोना लॉकडाऊनमुळे (corona lockdown) बहुतेकांचं ऑफिसचं काम घरातून सुरू (work from home) आहे. त्यामुळे यंदा रेडिमेड फराळ (faral) मागवण्याऐवजी घरच्या घरीच काही पदार्थ बनवण्याचा तुमचा बेत असेल तर मग चकलीऐवजी किंवा चकलीसोबतच ही कडबोळी बनवून पाहण्यास तुम्हाला हरकत नाही.
पूर्वी कडबोळी अठरा धान्यांची करत असत. मात्र आता अगदी घरच्या घरी उपलब्ध होतील आणि कमीत कमी साहित्यातही तुम्ही कडबोळी बनवू शकता. कडबोळीला तुम्ही एखाद्या हुकाप्रमाणे आकार देऊ शकता किंवा चकलीसारखाचं साच्याने नव्हे पण हातानं आकार देऊ शकता.
तुम्ही आता पहिल्यांदाच कडबोळी बनवणार असाल. तुम्हाला ती कशी बनवावी हे सांगणारं कुणी नाही. Youtube वर तसे बरेच व्हिडीओ आहेत. पण नेमका कोणता व्हिडीओ पाहू आणि कडबोळीची रेसिपी ट्राय करू असं तुमचंही होत असेल तर आम्ही तुमच्यासाठी कडबोळीच्या काही मोजक्याच रेसिपी शोधल्या आहेत. यामध्ये अगदी पारंपारिक कडबोळी बनवण्याच्या पद्धतीपासून ते झटपट बनेल अशा कडबोळीच्या रेसिपीजदेखील आहेत.
पारंपारिक पद्धतीने कशी बनवावी कडबोळी
तुम्ही जर कडबोळी हे पहिल्यांदाच ऐकत असाल किंवा ऐकलं आहे पण कधी पाहिलं नाही किंवा कधी बनवलं नाही. असं असेल तर नेमकी कडबोळी काय, त्यासाठी काय काय साहित्य आणि ते किती प्रमाणात लागतं. कशा पद्धतीनं ती बनवायची आणि ती खुसखुशीत होण्यासाठी काही टीप्स. तुम्हाला या व्हिडीओतून मिळतील.
फक्त तांदळाच्या पिठापासून कडबोळी
वरच्या व्हिडीओत आपण पाहिलं कडबोळी सामान्यपणे भाजणीपासून बनवलं जातं. मात्र तुमच्याकडे भाजणीचं पीठ नसेल तर फक्त तांदळाचं पीठ वापरूनही तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. जी भाजणीइतकीच टेस्टीही लागेल.
ज्वारीची कडबोळी
तुमच्याकडे तांदळाचं नाही पण ज्वारीचं पीठ आहे. तरी हरकत नाही. ज्वारीच्या पिठापासूनही तुम्ही कडबोळी बनवू शकता. अगदी भाजणी आणि फक्त तांदळाच्या पिठापासून बनवलेल्या कडबोळीइतकीच ज्वारीची कडबोळीदेखील खुसखुशीत आणि टेस्टी बनते.
हलकी आणि चविष्ट मुगाची कडबोळी
दिवाळी म्हणजे बराचसा फराळ बेसन म्हणजे चण्याचा पिठाचा असतो. तुम्हाला हलकी, चविष्ट, खुसखुशीत आणि कमी साहित्यात कडबोळी बनवायची असेल तर तुम्ही मुगाची कडबोळी बनवू शकता.
झटपट कडबोळी
सध्या सर्व रेसिपी इन्स्टंट, झटपट असतात. एखादा पदार्थ बनवायला पुरेसा वेळ नसतो. वर्क फ्रॉम होम करत असतानाही तुम्हाला किचनमध्ये जायला पुरेसा वेळ नाही पण दिवाळी फराळ घरच्या घरी बनवण्याची तुमची इच्छा असेल तर ही झटपट कडबोळी तुम्ही बनवू शकता.