Home /News /lifestyle /

Diwali recipe : फक्त दिवाळीपुरतंच नाही तर महिनाभर कुरकुरीत राहिल अशी शेव; पाहा VIDEO

Diwali recipe : फक्त दिवाळीपुरतंच नाही तर महिनाभर कुरकुरीत राहिल अशी शेव; पाहा VIDEO

दिवाळीत (diwali) घरच्या घरी बाजारासारखी कुरकुरीत शेव (sev) बनवण्यासाठी तुमच्यासाठी उपयुक्त टिप्स.

    मुंबई, 12 नोव्हेंबर : दिवाळीमध्ये (diwali) प्रत्येकाच्या घरी हमखास बनते ती शेव (sev). अगदी पटापट होणारी ही दिवाळी फराळातील रेसिपी (diwali faral recipe). कुणाला तिखट, कुणारी बारीक, कुणाला जाड प्रत्येकाला वेगवेगळी शेव आवडते. पण ती कुरकुरीत असायला हवी. अनेकदा शेव सुरुवातीला कुरकुरीत असते. मात्र काही वेळातच ती नरम पडते. आपली शेव अगदी बाजारासारखी कुरकुरीत का होत नाही? किंवा ती कशी बनवायची? तर तुमच्या या प्रश्नांची उत्तरं आम्ही घेऊन आलो आहोत. YouTube वर शेव रेसिपीचे बरेच व्हिडीओ आहेत. त्यापैकी काही व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी इथं देत आहोत. या व्हिडीओतून तुम्हाला शेवसाठी साहित्याचं प्रमाण, शेव कुरकुरीत होण्यासाठी टिप्सही मिळतील. आणखी एक म्हणजे तुमच्या चवीनुसार आवडीनुसार वेगवेगळ्या शेवच्या रेसिपीचे हे व्हिडीओज आहेत. यापैकी कोणतीही शेव तुम्ही बनवा आणि त्यातील टिप्स फॉलो करा. म्हणजे तुमची शेव चविष्ट आणि कुरकुरीतही बनेल. कुरकुरी शेव अगदी सोप्या पद्धतीनं शेव कशी बनवावी त्याची ही पद्धत. शेव बनवताना पाणी जास्त घालू नये, कमीत कमी पाण्यात शेवचं पीठ भिजवावं असा सल्ला या व्हिडीओत देण्यात आला आहे. शेव तळताना तेल कडकडीत तापलेलं नसावं तर ते मध्यम आचेवर तळावं, जेणेकरून शेव नीट तळली जाते, त्याचा रंग कायम राहतो आणि ती कुरकुरीत राहते. लसूण शेव तुम्हाला लसणीची टेस्ट आवडत असेल तर तुम्ही लसणीचा वापर करून शेव बनवू शकता. या आजींनी लसणाची झणझणीत अशी शेव बनवली आहे. शेवची टेस्ट वाढवण्यासाठी त्यात जिरं आणि ओवा घालावा. बेसनमध्ये गरम तेलाचं मोहन घालावा, कोमट पाण्यात पीठ मळावं आणि शेवचं पीठ अगदी पातळ किंवा जाडही नसावं अशा टिप्स या आजींनी कुरकुरीत शेव बनवण्यासाठी दिल्यात. बेसनमध्ये परात तिखट शेव तुम्हाला फक्त तिखट शेव आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी. तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट घालून झणझणीत शेव बनवू शकता. बेसनमध्ये गरम तेलाचं मोहन घालावं. चपातीच्या पिठापेक्षा शेवचं पीठ थोडं नरम मळावं. मंद आचेवर लाल रंग येईपर्यंत शेव तळून घ्यावी. बारीक खारी शेव तुम्हाला बारीक शेव आवडत असेल तर तशी शेवदेखील तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. ही शेव तुम्ही नुसती खाऊ शकता किंवा पोहे, उपमा, सँडवीच यावर टाकूनदेखील खाऊ शकता. ही शेव बनवताना मात्र त्यात गरम तेलाचं मोहन टाकण्याची गरज नाही. तेलात सुरुवातीला शेव सोडताना गॅस मोठा ठेवावा आणि त्यानंतर मंद गॅसवर शेव तळून घ्यावी. अशा पद्धतीनं शेव बनवल्यानं महिनाभर ही शेव कुरकुरीत राहते असं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Diwali 2020, Diwali Food, Diwali-celebrations

    पुढील बातम्या