मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Diwali 2021 Lakshmi Puja Timing: दिवाळीत लक्ष्मीपूजन करण्याची ही आहे शुभवेळ, वाचा सर्व मुहूर्त

Diwali 2021 Lakshmi Puja Timing: दिवाळीत लक्ष्मीपूजन करण्याची ही आहे शुभवेळ, वाचा सर्व मुहूर्त

Diwali 2021 Lakshmi Puja Timing: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करणं विशेष फलदायी मानलं जातं. या दिवशी व्यापारी त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये आणि सामान्य लोक त्यांच्या घरात श्रीलक्ष्मीची (Diwali 2021 Lakshmi Puja Timing) पूजा करतात.

Diwali 2021 Lakshmi Puja Timing: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करणं विशेष फलदायी मानलं जातं. या दिवशी व्यापारी त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये आणि सामान्य लोक त्यांच्या घरात श्रीलक्ष्मीची (Diwali 2021 Lakshmi Puja Timing) पूजा करतात.

Diwali 2021 Lakshmi Puja Timing: दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करणं विशेष फलदायी मानलं जातं. या दिवशी व्यापारी त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये आणि सामान्य लोक त्यांच्या घरात श्रीलक्ष्मीची (Diwali 2021 Lakshmi Puja Timing) पूजा करतात.

पुढे वाचा ...

मुंबई, 03 नोव्हेंबर : दिवाळीच्या (Diwali) सणाला संपन्नतेची देवता लक्ष्मीची (Goddess Lakshmi) पूजा करण्याची परंपरा आहे. असं मानलं जातं की, दिवाळीच्या रात्री माता लक्ष्मीची पूजा केल्यानं वर्षभर घरात सुख-शांती राहते आणि जीवनात ऐश्वर्य आणि अन्नाची कमतरता नसते. दिवाळीत माता लक्ष्मीसोबतच प्रथम आराध्य दैवत श्रीगणेशाचीही पूजा केली जाते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देवी लक्ष्मीची पूजा करणं विशेष फलदायी मानलं जातं. या दिवशी व्यापारी त्यांच्या प्रतिष्ठानांमध्ये आणि सामान्य लोक त्यांच्या घरात श्रीलक्ष्मीची (Diwali 2021 Lakshmi Puja Timing) पूजा करतात.

अशी आहे पौराणिक कथा

दिवाळी हा हिंदूंचा सर्वांत मोठा सण मानला जातो. हा पाच दिवस चालणारा सण धनत्रयोदशीपासून सुरू होतो आणि तिसर्‍या दिवशी दिवाळी साजरी केली जाते. शेवटच्या दिवशी भाऊबीज साजरी करून या महान उत्सवाची सांगता होते. दीपोत्सव का साजरा केला जातो, याविषयी काही पौराणिक कथा आहेत. एका पौराणिक कथेनुसार, लंकेत रावणाचा वध करून भगवान राम अयोध्येत परतले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी दिव्यांनी सजली होती. तेव्हापासून दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू झाली.

तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार, भगवान श्रीकृष्णानं दुष्ट राक्षस नरकासुराचा वध केला आणि 16 हजार 100 मुलींना त्याच्या कारागृहातून मुक्त केले. नरकासुराचा वध केल्याच्या आनंदात दीपोत्सवाची परंपरा सुरू झाली.

हे वाचा - Gold Price Today: दिवाळीआधी सोन्याचांदीची झळाळी उतरली, खरेदीपूर्वी तपासा आजचा भाव

लक्ष्मीपूजनासाठी हीच योग्य वेळ

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा विशेष मुहूर्त असतो. या विशेष वेळी पूजा केल्यानं त्याचं पूर्ण फळ मिळतं. पुरोहितांच्या मते, दिवाळीच्या दिवशी व्यावसायिक संस्थांनी स्थिर लग्नात लक्ष्मीची पूजा करणं सर्वोत्तम मानलं जातं. संध्याकाळच्या संधिप्रकाशावेळी घरांमध्ये संपन्नतेची देवता लक्ष्मीची पूजा करणं श्रेष्ठ मानलं जातं. संध्याकाळी वृषभ लग्नात घरोघरी केलेली माता लक्ष्मीची पूजा श्रेष्ठ असते.

दीपोत्सव विधि मूहूर्त

कार्तिक कृष्ण अमावस्या दिनांक 4:11: 2021 गुरुवार

प्रातः 06.16 – 08.54 शुभ वेला

दिवा 11.00 – 12.42 चंचल वेला

दिवा 11.58 – 12.42 अभिजीत वेला

दिवा 12.21 – 01.30 लाभ वेला

दिवा 04.28 – 05.50 शुभ वेला

हे वाचा - petrol diesel price : मोदी सरकारकडून दिवाळी भेट, पेट्रोल 5 तर डिझेलवर 10 रुपये उत्पादन शुल्क कपात

गोधूलि वेला 05.50 – 08.26

वृश्चिक लग्न प्रातः 07.50 – 10.06

कुंभ लग्न दिवा 01.54 – 03.24

वृषभ लग्न सायं 06.30 – 08.25

सिंह लग्न रात्रि 12.57 – 03.13

First published:

Tags: Diwali 2021, Diwali-celebrations