मुंबई, 30 ऑक्टोबर : यंदाच्या दिवाळीवर कोरोनाचं संकट आहे. पण ही दिवाळी घरी आणि सुरक्षित राहून साजरी करण्याचा संकल्प सर्व नागरिकांनी करायला हवा आहे. दिवाळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक. धनत्रयोदशीपासून दिपावलीची सुरुवात होते. प्रकाशांनी उजळवून टाकणारा आणि तेजोमय नवीन ऊर्जा देणाऱ्या या सणासुदीला आपल्या घरातील वातावरणही आनंदी, उत्साही आणि प्रफुल्लीत राहावं यासाठी सर्वतोपरी आपण प्रयत्न करत असतो.
आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, म्हणून या निमित्ताने आई लक्ष्मीचीही पूजा केली जाते. ही लक्ष्मी आपल्यावर कायम प्रसन्न राहावी यासाठी काही खास टिप्स आज सांगणार आहोत.
1.वास्तू शास्त्रात दिलेल्या माहितीनुसार दिवाळीच्या दिवशी ईशान्य आणि उत्तर दिशेला असलेल्या घराची बाजू ही स्वच्छ, नीटनेटकी असावी. त्यामुळे घरात आर्थिक समृद्धी प्राप्त होते.
2.ईशान्य दिशेला कचरा किंवा नको असलेलं अनावश्यक सामान ठेवलं असेल तर दिवाळीच्या आधी ते काढून स्वच्छ करा. असं केल्यानं धनाचा मार्ग खुला होईल आणि लक्ष्मी घरात येईल.
हे वाचा-यावर्षी सोनं सर्वाधिक महागलं, दिवाळीत सोन्यातून फायदा मिळवण्याची संधी?
3.पूर्व किंवा उत्तर दिशेला थोड्या उंचावर हिरव्या रंगाची झाडं कुंडीत ठेवावीत. असं केल्यानं घरात धन-धन्याची कमतरता जाणवत नाही.
4.दिवाळीआधी घरात थोडा बदल करावा. उत्तर दिशेला दर्पण लावावे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरात येते.
5. उत्तरेकडील प्रमुख देवता कुबेर आहेत, जे संपत्ती आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जातात. ज्योतिश शास्त्रानुसार बुद्ध हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत. उत्तर दिशेला मदर प्लेस असेही म्हणतात. या दिशेने, जागा रिक्त ठेवणे किंवा कच्ची जमीन सोडणे हे संपत्ती आणि समृद्धीचे घटक मानले जाते.
सूचना: - या लेखात दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची पुष्टी करत नाही