मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

एकेकाळी बनवली होती जेम्स बाँडची कार, आता पोलिसांनी केलं जेरबंद, वाचा एका अवलियाची कहाणी

एकेकाळी बनवली होती जेम्स बाँडची कार, आता पोलिसांनी केलं जेरबंद, वाचा एका अवलियाची कहाणी

कार डिझायनिंग (Customized car design) हे क्षेत्र भारतात आता विस्तारलं आहे. मात्र नव्या काळात या क्षेत्रात ठसा उमटवत चाकोरी मोडणारं DC एक नाव अनेकांना माहीत नाही.

कार डिझायनिंग (Customized car design) हे क्षेत्र भारतात आता विस्तारलं आहे. मात्र नव्या काळात या क्षेत्रात ठसा उमटवत चाकोरी मोडणारं DC एक नाव अनेकांना माहीत नाही.

कार डिझायनिंग (Customized car design) हे क्षेत्र भारतात आता विस्तारलं आहे. मात्र नव्या काळात या क्षेत्रात ठसा उमटवत चाकोरी मोडणारं DC एक नाव अनेकांना माहीत नाही.

    मुंबई, 30 डिसेंबर : ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा कुठल्या भारतीय माणसाला कार डिझाइन या विषयाचा अजिबातच गंध नव्हता. मात्र याला एकाच माणसाचा अपवाद होता. DC. डीसी म्हणजे दिलीप छाबडिया (Dilip Chhabria). मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जेरबंद केल्यामुळे ( 29 डिसेंबरला) छाबडिया यांचं नाव चर्चेत आलं. पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. मात्र नव्वदच्या दशकात छाबडिया यांचं नाव चर्चेत होतं ते चाकोरी मोडत कार डिझायनिंग (car designing) शिकून नाव कमावणारा तरुण म्हणून. अगदी जेम्स बॉण्डसाठी (James Bond) एस्टन मॉर्टिन डीबी - 8 या कारसह भारतातील पहिली स्पोर्ट्स कार (sports car) डिझाईन करण्याचं श्रेय या तरुणाला आहे. या क्षेत्रातील बापमाणूस म्हणवल्या जाणाऱ्या छाबडिया यांनी कधीच कार डिझायनिंगबाबत साधा विचारही केला नव्हता. कॉमर्समध्ये डिग्री घेऊन ते भविष्याचा वहिवाटीतला विचार करत होते. एके दिवशी मासिकं चाळताना त्यांची नजर पडली ती कार डिझायनिंगच्या एका कोर्सवर. त्यांनी कोर्सबाबत वाचून सरळ सामान भरलं आणि कोर्स करण्यासाठी अमेरिका गाठली. तिथल्या पासाडेना शहरातील आर्ट सेंटर कॉलेज ऑफ डिझाईनमध्ये छाबडिया शिकू लागले. ट्रान्सपोर्टेशन डिझाईनमधला कोर्स त्यांनी पूर्ण केला. काही काळ जनरल मोटर्ससोबत कामसुद्धा केलं. मात्र जास्त काळ तिथं मन न रमल्यानं नोकरी सोडून ते भारतात परतले. काळाच्या पुढचं काहीतरी त्यांना दिसत होतं. यानंतर स्वतःचा बिझनेस  करण्यासाठी त्यांनी वडिलांना मदत मागितली. वडिलांचा इलेक्ट्रॉनिक्सचा बिझनेस चांगला सुरू होता. वडिलांनी दिलीपला आपल्या वर्कशॉपमध्ये छोटीशी जागा दिली. सोबतच तीन महिन्यासाठी काही कर्मचारी देत सांगितलं, की एका महिन्यात तू स्वतःला सिद्ध करून दाखव, नाहीतर मी मदत काढून घेईन. दिलीप यांनी एका महिन्यात कमाल करून दाखवली. दिलीप यांनी प्रीमियर पद्मिनीचा हॉर्न बदलला. या कारची त्या काळात खूप क्रेझ होती. हा हॉर्न खूप लोकप्रिय झाला. वडिलांनी वर्षभरात कमावलं नसेल इतकं दिलीपनं महिनाभरात कमावून दाखवलं. आता दिलीप यांच्याकडं स्वतःचं वर्कशॉप होतं. 1992 मध्ये त्यांनी जिप्सीचं मॉडेल बदलून आपलं टॅलेंट ठळकपणे दाखवलं. त्यानंतर आरमाडा गाडीचं रूप बदलत ठळकपणे आजच्या स्कॉर्पिओसारखं केलं. 2002 मध्ये कायनेटिकनं छाबडिया यांना एक स्कूटर डिजाईन करण्यासाठी बोलावलं. मग 2006 ला त्यांनी ईटीएस्टार ग्रुपसोबत मिळून डीसी स्टार ही कंपनी बनवली. 2011 मध्ये छाबडिया यांनी महिंद्रासाठी REVA ही इलेक्ट्रिक कार डिजाईन केली. 2015 मध्ये त्यांनी भारताची पहिली स्पोर्ट्स कार डीसी अवंती बनवली. 2003 मध्ये जेम्स बॉण्ड या कॅरेक्टरसाठी एस्टन मार्टिन डीबी - 8 डिझाईन केली. याशिवाय त्यांनी माधुरी दीक्षितसाठी इनोवा क्रिस्टा, टोयोटा फॉर्च्युनर, रेनो डस्टर अशा कार बनवल्या आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Car, Lifestyle, Scorpio

    पुढील बातम्या