मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Life@25 : शॉपिंग करताना लूट; विक्रेत्याने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले तर काय करायचं?

Life@25 : शॉपिंग करताना लूट; विक्रेत्याने MRP पेक्षा जास्त पैसे घेतले तर काय करायचं?

वस्तूंच्या दरांवरून फसवणूक केल्यास काय करायचं?

वस्तूंच्या दरांवरून फसवणूक केल्यास काय करायचं?

बऱ्याचदा दुकानदार आपल्याला एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तू विकतात. अशावेळी तक्रार कुठे आणि कशी करायची?

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Priya Lad

शॉपिंग, खरेदी याला तसं वय नसतं. म्हणजे आपल्याला कोणत्या ना कोणत्या वस्तूंची खरेदी करावी लागते. पण तरुणपण म्हटलं की या वयात शॉपिंगचं वेड किंवा क्रेझ थोडं वेगळंच असतं. पण शॉपिंगमध्येही लूट होते, फसवणूक होते. बऱ्याचदा दुकानदार आपल्याला एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तू विकतात. साधी पाण्याची बाटली किंवा दुधाची पिशवी घ्यायची म्हटली तरी फ्रिजचे पैसे म्हणून अतिरिक्त पैसे आकारले जातात. दोन-तीन रुपये म्हणूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण अशा बऱ्याच वस्तूंच्या मागे आपली फसवणूक होऊ शकते. अशा वेळी ग्राहकांनाही काही हक्क आहेत.

विक्रेते आणि ग्राहक यांच्यासाठीही काही नियम, कायदे, अटी आहेत. त्यानुसारच वस्तूंची खरेदी-विक्री होते. काही वस्तूंच्या किमती ठरलेल्या असतात. ज्या त्या वस्तूवरच दिलेल्या असतात. याला एमआरपी म्हटलं जातं. एमआरपीनुसार सर्व ठिकाणी त्या वस्तूंचे दर सारखेच असतात. कोणताही दुकानदार त्या वस्तूंवर एमआरपीपेक्षा जादा पैसे आकारू शकत नाही.

जर विक्रेते एमआरपीपेक्षा जास्त दराने वस्तू देत असतील. तर ग्राहकांना तक्रार करता येऊ शकते. आता एमआरपीपेक्षा आपल्याकडून जास्त पैसे घेत असतील तर नेमकं काय करायचं? तक्रार करायची झाल्यास ती कुठे आणि कशी करायची?

हे वाचा - Life@25 - मित्राला पैसे दिले पण तो आता परत करण्याचं नावच घेत नाहीये, काय करायचं?

अॅड, किशोर मावळे - "कोणत्याही दुकानदाराला MRP पेक्षा जास्त पैसे आकारण्याचा अधिकार नाही. जर एखाद्या दुकानदाराने तुमची फसवणूक केली किंवा एखादा व्यापारी तुम्हाला महागड्या किमतीत वस्तू विकत असेल तर तुम्ही 8130009809 या क्रमांकावर एसएमएस करून तक्रार करू शकता.  एसएमएस व्यतिरिक्त, तुम्ही टोल फ्री ग्राहक हेल्पलाइन नंबरवरही तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही 1800-11-4000 किंवा 14404 वर कॉल करू शकता. एसएमएस प्रमाणेच तुमची तक्रार येथे नोंदवली जाईल आणि त्याचे संभाव्य उपाय किंवा तुम्हाला पुढे काय करायचे आहे. ही माहिती दिली जाईल"

हे वाचा - Life@25 : ड्रायव्हिंग शिकायचं आहे, स्वतःची गाडी घ्यायची आहे पण काय आहेत नियम?

"तुम्ही http://consumerhelpline.gov.in/ पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता आणि तुमची तक्रार नोंदवू शकता. येथे तुम्ही तुमची तक्रार माहिती, कंपनीचे नाव आणि विवाद संबंधित कागदपत्रे देखील संलग्न करू शकता"

First published:

Tags: Digital prime time, Law, Lifestyle