लाइफस्टाइल

  • Associate Partner
  • diwali-2020
  • diwali-2020
  • diwali-2020

Diwali Recipes : जिभेवर ठेवताच विरघळणारे स्वादिष्ट लाडू; 5 सोप्या पाककृतींचे VIDEO

Diwali Recipes : जिभेवर ठेवताच विरघळणारे स्वादिष्ट लाडू; 5 सोप्या पाककृतींचे VIDEO

लाडू आवडत नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. घरच्या घरीच चविष्ट लाडू बनवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी आणल्या आहेत या खास Youtube recipes. या पाककृतीचे Video पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : काय मंडळी दिवाळीची तयारी सुरू केलीत ना? शॉपिंग, घरातली साफसफाई झालीच असेल. फराळाचे कुठवर आलं? यंदाच्या दिवाळीला फराळ बाहेरुन मागवू नका. घरातच करा झटपट स्वादिष्ट फराळ बनवा. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या तुमच्या नवऱ्यालाही हाताशी घेतलंत तरी चालेल.

फराळा करताना लाडू हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ. छान काजू बेदाणे घातलेला, घराच्या तुपात वळलेला लाडू खाणं म्हणजे सुखच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत लाडू आवडत नाही असा माणूस सापडणं म्हणजे कठीणच. डाएटप्रेमीसुद्धा दिवाळीच्या दिवसात डाएट बाजूला ठेऊन फराळाचा आनंद लुटतात. लाडू करताना तुपाचं प्रमाण योग्य असलं की अर्धी लढाई तिथेच जिंकता येते.

यंदा पहिल्यांदाच लाडू घरी बनवणार आहात का? एकाच प्रकारचे लाडू खायचा कंटाळा आला आहे का? काही काळजी करु नका. आम्ही तुमच्यासाठी 5 लाडवांच्या रेसेपिज आणल्या आहेत. बेसनाचे लाडू, मिश्र डाळींचे लाडू, रवा बेसनाच्या लाडवाच्या चविष्ठ रेसेपिज बघून तुमच्या तोंडाला आत्ताच पाणी सुटेल. यामध्ये दिलेल्या खास टिप्स मिस करू नका.

बेसनाचे स्वादिष्ट लाडू

बेसनाचे लाडू करताना बेसन नीट भाजून घेतलं म्हणजे लाडू चवीला चांगले होतात. बेसनाचं पीठ भाजत असताना त्या बेसनामध्ये 2 चमचे पाणी घाला. त्यानंतरही पीठ बराच वेळ भाजा. असं केल्यामुळे लाडू खाताना चिकटत नाहीत.

मिश्र डाळींचे लाडू

मिश्र डाळींचे लाडू अतिशय पौष्टिक असतात. नेहमीच्या चवीचा कंटाळा आला असेल तर तुम्हाला ही रेसिपी नक्की करुन बघता येईल.

पारंपरिक पद्धतीचे लाडू

पीठ भाजून झाल्यानंतर लगेचच पिठीसाखर घालायची नाही. नाहीतर लाडूचा आकार बिघडतो. बेसन किंचीत गार झाल्यानंतर त्यामध्ये साखर घाला.

रवा खोबऱ्याचे झटपट लाडू

रवा खोबऱ्याचे लाडू करताना रवा भाजून झाल्यानंतर खोबरं एकत्र करुन स्टीम करुन घ्यावा. हे लाडू बनवण्यासाठी पाक करावा लागत नाही. त्यामुळे ते बिघडण्याचे चान्सेस कमी असतात. पिठीसाखर घरी करत असाल तर ती मिक्सरवर एकदम बारीक वाटायची. म्हणजे लाडू खाताना ती दाताखाली येत नाही.

पाकातले रवा बेसनाचे लाडू

पाक पातळ झाला तर गार झाल्यावरही लाडू वळता येत नाहीत. असं झालं तर 5 -6 तास हे मिश्रण आहे तसंच ठेवायचं. त्यानंतर हे मिश्रण आपोआप आळून येतं आणि लाडू छान वळता येतात.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 11, 2020, 7:16 AM IST

ताज्या बातम्या