हापूस आंबा-इंग्रजीत अल्फांन्सो नाव असलेला हा आंबा महाराष्ट्रात येतो. याची जव जेवढी मधूर असते तेवढाच याचा सुगंधही सुंदर असतो. जगभरात या आंब्याला मागणी आहे.
दशहरी आंबा-दशहरी आंबा उत्तर प्रदेशमध्ये येतो. दशहरी नावाच्या गावामुळे या आंब्याला हे नाव पडलं. उत्तर प्रदेशमध्ये हा आंबा जास्त खाल्ला जातो. मलिहाबादी दशहरी आंबा जगभरात निर्यात केला जातो.
चौसा आंबा-बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये या आंबा आवडीने खाल्ला जातो. उत्तर प्रदेशातील हरदोईचा चौसा आंबा प्रसिद्ध आहे. भडक पिवळ्या रंगाचा हा आंबा त्याच्या रंगामुळे लवकर ओळखला जातो.
तोतापूरी आंबा-या आंब्याचा आकार पोपटाच्या चोची प्रमाणे असतो. त्यामुळे याला तोतापूरी हे नाव पडलं आहे. दक्षिण भारतीतल कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणात याचं उत्पादन होतं.
हिमसागर आंबा-पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा हा आंबा आहे. हा आंबा चवीला गोड असतो तर,त्याचा आकारही लहान असतो. पिकल्यानंतरही तो बाहेरून हिरवा दिसतो.
सिंधुरा आंबा-आंबट-गोड चवीच्या या आंब्याची चव जास्तकाळ जीभेवर राहते.याचा गर पिवळ्या रंगाचा असतो,तर बाहेरुन लाल दिसतो.
लंगडा आंबा-हा आंबा उत्तर प्रदेशच्या काशी आणि वाराणसीमध्ये येतो. जुन ते जुलै महिन्यात बाजारात येतो. हिरव्या आणि पिवळ्या रंगाचा हा आंबा असतो.
रसपूरी आंबा-कर्नाटकच्या ओल्ड म्हैसूरचा हा आंबा महाराणी आंबा म्हणून ओळखला जातो. मे ते जून या 2 महिन्यात बाजारात येतो. याचा आकार अंडाकृती असतो.
बायगनपल्ली आंबा-हा आंबा हापूस आंब्यासारखा दिसतो. त्यामुळे त्याला हापूसचा जुळा भाऊ म्हटलं जातं. आंध्र प्रदेशच्या कुरनूल जिल्ह्याच्या बांगनापल्लीमध्ये याचं उत्पादन होतं. हा आंबाही अंडाकृती दिसतो पण, या आंब्यावर छोटे डाग असतात.