Home /News /lifestyle /

Diabetic: मधुमेही रुग्णांनी सकाळी हे पदार्थ कधीही खाऊ नयेत, शुगरवर होईल भयंकर परिणाम

Diabetic: मधुमेही रुग्णांनी सकाळी हे पदार्थ कधीही खाऊ नयेत, शुगरवर होईल भयंकर परिणाम

आपण सकाळी जे काही खातो त्याचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. कधीकधी चुकीच्या आहारामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

    नवी दिल्ली, 24 डिसेंबर: मधुमेहाच्या रुग्णांनी (diabetic patient) त्यांच्या आहाराची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही सकाळी जे काही खाता त्याचा तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो. कधीकधी चुकीच्या आहारामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यासाठी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी, याबाबत जाणून (diabetics not eat in the morning) घेऊया. हायड्रेशनची काळजी घ्या 'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार, सर्वप्रथम हायड्रेशनची काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी उठल्याबरोबर हे तुमचे पहिले काम असायला हवे. तुम्ही झोपेत असताना शरीराला या काळात पाणी मिळत नाही. यामुळे शरीराचे निर्जलीकरण होते. सकाळी उठल्यावर एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्या. त्यामुळे तहानही भागेल आणि वजन नियंत्रणात राहण्यास अनेक गोष्टींसाठी त्याचा फायदा होईल. हा रस रिकाम्या पोटी प्या यानंतर काही पाने घ्या. यासाठी बेलची पाने, कढीपत्ता आणि तुळशीची पाने एकत्र बारीक करून घ्या. त्यात थोडेसे पाणी घालून त्याचे सेवन करा, महत्त्वाचे म्हणजे हा काढा सकाळी रिकाम्या पोटी प्या. मधुमेहाच्या रुग्णांनी या पानांचा रस रिकाम्या पोटी पिणे खूप फायदेशीर ठरेल. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. अर्जुन साल पावडरचे पाणी प्या. हे उच्च रक्त शर्करा नियंत्रित करण्यासाठी एक टॉनिक म्हणून कार्य करते. हे करण्यासाठी 1 चमचे अर्जुन साल पावडर रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी प्या. ब्लोटिंग किंवा पोट फुगण्याचा त्रास सकाळी उठल्यानंतर अॅसिडीटी जाणवत असेल तर यासाठी 8 ते 10 काळे मनुके भिजवून रिकाम्या पोटी खा. ब्लोटिंग किंवा पोट फुगण्याच्या समस्येवर जिरे, वेलची, बडीशेप आणि ओवा मिसळून चहा बनवून प्या. सकाळी उठल्याबरोबर अनेकांना छातीत जळजळ आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. रात्रीचे जेवण उशिरा केल्यामुळे असे होते. झोपण्याच्या तीन तास आधी अन्न खा. हे वाचा - Health Tips : हिवाळ्यात सुक्या मेव्याचं जास्त प्रमाण असं ठरू शकतं घातक, वाचा सविस्तर नाश्ता करा नाश्ता ही महत्त्वाची बाब आहे. यामध्ये त्या-त्या हंगामातील फळे, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने यांचे मिश्रण असलेल्या गोष्टींचा समावेश करा. जड नाश्ता करू नका. त्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. घरगुती न्याहारीमध्ये नैसर्गिक प्रथिन स्त्रोतांचा समावेश करा. पोहे, कोंब आलेली कडधान्ये, अंडी आणि ओट्स खा. हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नका सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नका. यामुळे अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि गॅस्ट्रिकची समस्या उद्भवू शकते. दुधासोबत फळे खाऊ नका. याशिवाय ध्यान करा आणि तणावाचे व्यवस्थापन करा. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत होईल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Diabetes, Health, Lifestyle, Tips for diabetes

    पुढील बातम्या