हिऱ्याचे दागिने म्हणजे महाग. न परवडणारे असं अजूनही भारतीयांना वाटतं आणि सोन्याचं प्रेम काही कमी होत नाही. पण या वेळी हिऱ्याच्या किमती सोन्याएवढ्याच झाल्या आहेत.
जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट काउंसिलचे चेअरमन कोलिन शाह यांनी सांगितले कोरोना संकट आणि आर्थिक संकट असताना देखील डायमंडच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे. यावेळी नागरिक 10 हजार ते 20 हजार रुपयांच्या रेंजमधील दागिन्यांची खरेदी करण्याची अपेक्षा आहे.
चेअरमन कोलिन शाह यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या या संकटामुळे या वर्षी खर्च कमी करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक सोन्यामध्ये आणि हिऱ्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्याचबरोबर नवरात्री आणि दुर्गा पूजेदरम्यान वाढलेल्या विक्रीमुळे बाजारात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे दिवाळी आणि धनत्रयोदशीला विक्री वाढण्याची अपेक्षा आहे
मुंबईच्या डब्लू एच.पी ज्वेलर्सचे डायरेक्टर आदित्य पेठे यांच्या मतानुसार, कोरोनानंतर सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात भाववाढ झाल्यामुळे सोन्यात गुंतवणूक करत आहेत. कोरोनामुळे नागरिकांनी लग्नदेखील डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली होती. त्यामुळे लग्नासाठी आणि दिवाळीसाठी एकत्रितच सोनंखरेदी केली जात आहे. त्यामुळे काही डायमंड दागिने विक्रेत्यांनी हफ्त्यांची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे.
सेनको गोल्ड अँड डायमंड्सने आधीच इंटरेस्ट-फ्री ईएमआयचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या दागिन्यांच्या किमती 1,999 रुपयांपासून सुरु होत आहेत. त्याचबरोबर या दागिन्यांच्या खरेदीवर मोफत इंश्युरन्सदेखील मिळत आहे. याविषयी बोलताना सेनको गोल्ड अँड डायमंड्सचे सीईओ सुवांकर सेन यांनी म्हटले, सुलभ हफ्त्यांसाठी ग्राहकांकडून झिरो इंटरेस्ट आणि झिरो प्रोसेसिंग फी आकारली जाणार आहे. आरबीआयच्या नियमांनुसार सुलभ हफ्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.