मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /तुळशीविवाह आणि एकादशीच्या तिथीबाबत संभ्रम झालाय का? योग्य तिथी आणि शुभ वेळ जाणून घ्या

तुळशीविवाह आणि एकादशीच्या तिथीबाबत संभ्रम झालाय का? योग्य तिथी आणि शुभ वेळ जाणून घ्या

तुलसीविवाह आणि कार्तिकी एकादशीच्या तारखेबाबत गोंधळून जाण्याचं कारण नाही. 14 नोव्हेंबर रोजीच तुलसीविवाह आणि याच दिवशी प्रबोधिनी एकादशी आहे, असंही पंडित मणिराम शर्मा यांनी सांगितलं आहे.

तुलसीविवाह आणि कार्तिकी एकादशीच्या तारखेबाबत गोंधळून जाण्याचं कारण नाही. 14 नोव्हेंबर रोजीच तुलसीविवाह आणि याच दिवशी प्रबोधिनी एकादशी आहे, असंही पंडित मणिराम शर्मा यांनी सांगितलं आहे.

तुलसीविवाह आणि कार्तिकी एकादशीच्या तारखेबाबत गोंधळून जाण्याचं कारण नाही. 14 नोव्हेंबर रोजीच तुलसीविवाह आणि याच दिवशी प्रबोधिनी एकादशी आहे, असंही पंडित मणिराम शर्मा यांनी सांगितलं आहे.

  मुंबई, 14 नोव्हेंबर : कार्तिक महिन्यातल्या प्रबोधिनी एकादशीचं भाविकांसाठी खूप महत्त्व आहे. या दिवशी अनेक धार्मिक कार्य केली जातात. तुळशीचा विवाहदेखील ( tulsi vivah 2021) याच दिवशी केला जातो. श्री विष्णूंच्या शाळीग्राम रूपासोबत तुळशीचा विवाह केला जातो. दिवाळीनंतर येणाऱ्या या एकादशीला धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. या वर्षी एकादशी रविवारी आल्याने थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. हा गोंधळ दूर करणारं वृत्त ‘लाइव्ह हिंदुस्थान’नं दिलं (tulsi vivah 2021 date time puja) आहे.

  या वर्षी प्रबोधिनी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी पाच वाजून 48 मिनिटांनी सुरू होणार आहे. त्यामुळे एकादशीचा उपवास 14 नोव्हेंबर रोजी केला जाईल. एकादशीची तिथी सूर्योदयाच्या आधी लागली तर त्याच दिवशी एकादशीचा उपवास केला जावा, असं पंडित मणिराम शर्मा यांनी ‘लाइव्ह हिंदुस्तान’शी बोलताना सांगितलं. या वर्षी तुलसीविवाह आणि प्रबोधिनी एकादशी 14 नोव्हेंबर म्हणजेच रविवारी आहे. एकादशीचं पारणं 15 नोव्हेंबर म्हणजे सोमवारी केलं जाईल. रविवारी तुळशीची पानं तोडणं वर्ज्य आहे, असं धर्मशास्त्रात सांगितलं आहे; मात्र या दिवशी पूजा केली जाऊ शकते. तुलसीविवाह आणि कार्तिकी एकादशीच्या तारखेबाबत गोंधळून जाण्याचं कारण नाही. 14 नोव्हेंबर रोजीच तुलसीविवाह आणि याच दिवशी प्रबोधिनी एकादशी आहे, असंही पंडित मणिराम शर्मा यांनी सांगितलं आहे.

  तुळशीच्या विवाहाला आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीचं लग्न झाल्याशिवाय लग्नाचे मुहूर्त काढले जात नाहीत. या दिवशी अनेकांकडे वाजत गाजत तुळशीचा विवाह केला जातो.

  एकादशीच्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर उठून स्नानादि कार्यं करून व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर विष्णूंची आराधना करावी. विष्णूंच्या प्रतिमा, मूर्तीसमोर धूप-दीप लावावा. त्यानंतर फुलं, फळं आणि नैवेद्य अर्पण केला जावा. एकादशीला विष्णूला तुळस अवश्य वाहिली जावी. संध्याकाळी विष्णूची पूजा करताना विष्णुसहस्रनामाचं पठण करावं. एकादशीच्या पूर्वसंध्येला व्रतस्थ व्यक्तीने अत्यंत सात्त्विक भोजन करावं. एकादशीच्या व्रतादरम्यान अन्न भक्षण केलं जात नाही. एकादशीला भात खाणं वर्ज्य असतं. एकादशी व्रताची समाप्ती झाल्यानंतर ब्राह्मणांना दान-दक्षिणा द्यावी.

  एकादशी पूजा विधी

  सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करावे. घरातील देवघरात दिवा लावावा. विष्णूवर गंगाजलाने अभिषेक करावा. विष्णूला फुलं आणि तुळशीपत्र अर्पण करावं. शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा. प्रबोधिनी एकादशीलाच तुलसीविवाहही केला जातो. या दिवशी विष्णूचा शाळीग्राम अवतार आणि तुळशीची साग्रसंगीत आरती करावी. इतर देवांचीही आरती करावी. देवाला नैवेद्य दाखवावा. देवाला फक्त सात्त्विक गोष्टी, पदार्थांचाच नैवेद्य दाखवला जातो, हे अवश्य लक्षात ठेवावं.

  हे वाचा - Twins Island : या गावात सर्वत्र दिसतात जुळी मुलं, माणसं; रहस्यामागील कारण कोणालाच माहीत नाही

  विष्णूला नैवेद्य दाखवताना त्यामध्ये तुळशीपत्र आवर्जून ठेवावं. तुळशीपत्राविना विष्णू नैवेद्याचा स्वीकार करत नाहीत अशी श्रद्धा आहे. याच दिवशी विषणुसोबतच लक्ष्मीमातेचीही पूजा नक्की करावी. एकादशीला देवाचं जास्तीत जास्त ध्यान करावं.

  एकादशीची पूजा आणि शुभ मुहूर्त

  एकादशी तिथी प्रारंभ - 14 नोव्हेंबर 2021 पहाटे 5:48 वाजल्यापासून

  एकादशी तिथी समाप्ती - 15 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 6:39 वाजेपर्यंत

  पारण्याची वेळ - 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:10 वाजल्यापासून दुपारी 3:19 वाजेपर्यंत

  हरीवासर समाप्ती वेळ - पारण्याच्या दिवशी दुपारी 1:00 वा.

  हे वाचा - लग्नाच्या सीजनमध्ये सोन्याच्या किमतींनी लावली आग; 9 महिन्यात सर्वात महाग झालं सोनं, चांदीही 67 हजार पार

  प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू त्यांच्या निद्रावस्थेतून जागृत होतात. त्यामुळेच या एकादशीला देवउठनी एकादशी असंही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवशी विष्णूंची अर्थातच सृष्टीच्या पालनकर्त्याची पूजा केली जाते. सुखसमृद्धीसाठी देवउठनी एकादशीचं व्रत केलं जातं.

  First published:

  Tags: Diwali 2021