जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / गर्भपातानंतर IVF चा विचार करताय? मग आधी या महत्त्वाच्या गोष्टी नक्की वाचा

गर्भपातानंतर IVF चा विचार करताय? मग आधी या महत्त्वाच्या गोष्टी नक्की वाचा

गर्भपातानंतर IVF चा विचार करताय? मग आधी या महत्त्वाच्या गोष्टी नक्की वाचा

रिकरंट प्रेग्नंसी लॉस होणाऱ्या जोडप्यांनी IVF सारख्या फर्टिलिटी ट्रिटमेंटचा विचार केला पाहिजे, असं दिल्लीतील राजौरी गार्डन येथील नोव्हा IVF फर्टिलिटीमधील वंध्यत्व विशेषज्ज्ञ डॉ. पारुल यांनी सांगितलं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई 17 एप्रिल : गर्भपात म्हणजेच मिसकॅरेज होणं हे एखाद्या मायनर हार्ट अ‍ॅटॅकसारखं असू शकतं. ते शारीरिक व भावनिक स्तरावर उद्ध्वस्त करणारं असू शकतं. काही गुंतागुंतींमुळे तुमचं बाळ गमावणं हे भावनिकदृष्ट्या खूप कठीण असू शकतं. गर्भपातानंतर पुन्हा गर्भधारणा होऊ शकतं नाही असं नाही, पण अशा घटनेनंतर बहुतेक स्त्रिया पुन्हाही गर्भपात होऊ शकतो, या भीतीत जगतात. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या महिन्यांत गर्भपात होणं हे सहसा सामान्य असतं, पाचपैकी एका महिलेचा गर्भपात होतो. यावेळी रक्तस्राव तपकिरी, गुलाबी-पांढरा किंवा गडद लाल रंगाचा दिसू शकतो. “एक गर्भपात स्त्रीच्या दुसऱ्या गर्भधारणेच्या क्षमतेस अडथळा आणत नाही; पण सलग दोन गर्भपातांनंतर, आणखी गर्भपाताचा धोका सुमारे 28% पर्यंत वाढतो आणि तीन किंवा अधिक सलग गर्भपातांनंतर ही जोखीम सुमारे 43% पर्यंत वाढते. त्यामुळे रिकरंट प्रेग्नंसी लॉस होणाऱ्या जोडप्यांनी IVF सारख्या फर्टिलिटी ट्रिटमेंटचा विचार केला पाहिजे,” असं दिल्लीतील राजौरी गार्डन येथील नोव्हा IVF फर्टिलिटीमधील वंध्यत्व विशेषज्ज्ञ डॉ. पारुल यांनी सांगितलं.

    News18लोकमत
    News18लोकमत

    गर्भपातानंतर IVF? पुन्हा पुन्हा गर्भपात होणं जेव्हा सलग दोनदा गर्भपात होतो, तेव्हा तज्ज्ञ त्याला रिकरंट प्रेग्नंसी लॉस म्हणतात. सलग तीन वेळा गर्भपात झाल्यास शारीरिक तपासणी करणं अत्यावश्यक असतं. “मिसकॅरेजची पुष्टी करण्यासाठी, त्याचं कारण निश्चित करण्यासाठी, अल्ट्रासाउंड, पेल्व्हिक एक्झाम, ब्लड टेस्ट यासारख्या चाचण्या आवश्यक आहेत. गर्भपाताची कारणं क्रोमोझोमल विकृती, हॉर्मोनल असंतुलन, गर्भाशयाच्या समस्या, ल्युपससारखे ऑटोइम्युन रोग असू शकतात,” असं डॉ पारुल म्हणाल्या. IVF ची मदत कशी होते? एकापेक्षा जास्त गर्भपात झालेल्या महिलांसाठी इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन ही गर्भधारणा करण्याची एक चांगली पद्धत आहे. निरोगी गर्भधारणेच्या शक्यता वाढवण्यासाठी आणि गर्भपात होण्याची शक्यता कमी करण्यासाठी विशिष्ट स्टेप्स असतात. “फर्टिलिटी स्पेशॅलिस्ट IVF (PST) सोबत प्रीप्लांटेशन अनुवांशिक तपासणी देतात. ही प्रक्रिया तज्ज्ञांना क्रोमोझोमल आणि अनुवांशिक समस्यांसाठी गर्भाची तपासणी करण्याची परवानगी देते. यामध्ये सिस्टिक फायब्रोसिस आणि इतर विविध परिस्थितींसारख्या आनुवांशिक विकारांसाठी स्क्रीनिंग केलं जातं,” असं डॉ. पारुल सांगतात. निरोगी गर्भधारणा सुनिश्चित करणं गुरुग्राममधील मेडिकल डायरेक्टर डॉ. प्रीती अग्रवाल म्हणतात, “गर्भपात झाल्यानंतर पुढच्या गर्भधारणेसाठी घाई करू नका. संपूर्ण शारीरिक आणि भावनिक रिकव्हरीनंतर पुन्हा प्रयत्न करायला हवेत. तसंच आयव्हीएफ प्रक्रियाही नंतर सुरू करायली हवी, ही प्रक्रिया गर्भपाताच्या प्रकारानुसार बदलू शकते.” फॉलिक अॅसिड सप्लिमेंट घ्या. आपल्या शरीराची आणि मनाची काळजी घेऊन निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. तुमच्या निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार, भरपूर पालेभाज्या, कडधान्ये, फळं आणि लोहयुक्त आहार घ्या. झोप नीट घ्या, धूम्रपान किंवा मद्यपान टाळा. “पेरी-गर्भधारणेच्या काळात आपण निरोगी असणं महत्त्वाचं आहे. प्रीडायबेटिस, डायबेटिस, थायरॉईड, पॉलीसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आणि ऑटोइम्युन कंडिशन यांसारख्या हॉर्मोनल आणि मेटाबॉलिक कंडिशन्सचा शोध घेऊन त्या सुधारणं महत्त्वाचं आहे,” असं डॉ अग्रवाल सांगतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: pregnancy
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात