जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / प्रसूती पश्चात औदासिन्य आलेय, त्यातून बाहेर येण्यासाठी हे 5 उपाय मदत करतील

प्रसूती पश्चात औदासिन्य आलेय, त्यातून बाहेर येण्यासाठी हे 5 उपाय मदत करतील

प्रसूती पश्चात औदासिन्य आलेय, त्यातून बाहेर येण्यासाठी हे 5 उपाय मदत करतील

नऊ महिने गर्भात बाळाला वाढवल्यावर जेव्हा त्याचा जन्म होतो, तेव्हा त्या मातेच्या मनात असंख्य भावनांचा कल्लोळ माजतो. त्यात आनंद, दु:ख, निराशा असते. जर बाळाच्या जन्मानंतर मातेच्या मनात दु:ख्खाची भावना बळावत गेली तर तिच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. हीच ती समस्या आहे जी प्रसूती पश्चात मातेच्या मनात औदासिन्य (डिप्रेशन) निर्माण करते. myUpchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितले कि प्रसूती पश्चात येणारे औदासिन्य ही अशी अवस्था आहे ज्यात अत्यंत निराशा, उत्साहाचा अभाव, चिंता, खानपान आणि झोप या दैनिक गोष्टी मध्ये बदल, वारंवार रडू येणे, चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    नऊ महिने गर्भात बाळाला वाढवल्यावर जेव्हा त्याचा जन्म होतो, तेव्हा त्या मातेच्या मनात असंख्य भावनांचा कल्लोळ माजतो. त्यात आनंद, दु:ख, निराशा असते. जर बाळाच्या जन्मानंतर मातेच्या मनात दु:ख्खाची भावना बळावत गेली तर तिच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. हीच ती समस्या आहे जी प्रसूती पश्चात मातेच्या मनात औदासिन्य (डिप्रेशन) निर्माण करते. myUpchar.com चे डॉ. विशाल मकवाना यांनी सांगितले कि प्रसूती पश्चात येणारे औदासिन्य ही अशी अवस्था आहे ज्यात अत्यंत निराशा, उत्साहाचा अभाव, चिंता, खानपान आणि झोप या दैनिक गोष्टी मध्ये बदल, वारंवार रडू येणे, चिडचिड होणे अशी लक्षणे दिसून येतात. साधारणपणे याची सुरवात प्रसूती नंतर एक आठवडा किंवा महिन्याने होते. या परिस्थितीचे निश्चती कारण अजून कुणालाच कळलेले नाही. पण शरीरातील संप्रेराकांमधील बदल आणि झोपेचा अभाव हे याचे मुख्य कारण आहे. त्यामुळे बाळासोबत निर्माण होणारा आपलेपणा जाणवायला त्रास होतो, त्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होते आणि बळावर त्याचा प्रतीकुल परिणाम होतो. याचे निदान आणि त्यावर उपचार करण्याचा प्रभावी उपाय म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेणे. मानसोपचार, आणि औदासिन्य कमी करणाऱ्या औषधांचा एकत्रित लाभ घेणे आवश्यक आहे. घरी पण काही असे उपाय केले जाऊ शकतात ज्याने अश्या प्रकारे येणाऱ्या औदासिन्यातून बाहेर पडायला मदत होईल आणि लवकरच दैनंदिन जीवन सुरळीत होईल. व्यायाम करा संशोधकांच्या मते प्रसूती पश्चात व्यायामाने मातेवर चांगला प्रभाव पडतो. पायी चालणे औदासिन्य घालवण्याचा उत्तम उपाय आहे. प्रसूती नंतर खूप अवघड व्यायाम नाही करता येत. पण 10 मिनिट व्यायाम करण्याचा प्रयत्न मातेने जरूर करायला हवा. ज्यात सर्व साधारण सोपे व्यायाम प्रकार कुठल्याही साधनांचा उपयोग न करता केले पाहिजे. myUpchar.com ऐम्स चे डॉ. उमर अफरोज यांचे म्हणणे आहे कि निराशेला दूर करण्यासाठी सकाळी ध्यान करायला हवे, आणि हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचा सराव करायला हवा. सकाळी थोडे चालायलाही पाहिजे. पोषक आहार पोषक आहार प्रसूती पश्चात औदासीन्याच्या स्थिती मधून बाहेर काढू शकत नाही पण योग्य प्रमाणात पोषक आहार घेण्याची सवय लावल्यास चांगले वाटते आणि शरीराला आवश्यक पोषण मिळते. स्वतः साठी वेळ द्या बाळाची देखभाल**,** वारंवार स्तनपान**,** घरातील कामे किंवा मोठ्या मुलांची जबाबदारी यामुळे तणाव येवू शकतो**.** पण हे सगळे एकट्याने करण्या ऐवजी मुलांची तास दोन तास काळजी घेवू शकतील अश्या घरातल्यांची मदत घ्यायला हवी**,** त्यामुळे तुम्ही स्वतः साठी वेळ काढू शकता**.** यावेळेत ध्यान करणे**,** वामकुक्षी घेणे**,** किंवा एखादा सिनेमा पहिल्याने तुम्हाला बरे वाटेल**.** आराम साठी वेळ आवश्यक आहे पुरेश्या झोपेचा अभाव खूप समस्या निर्माण करतो, म्हणूनच म्हटलेय कि बाळ झोपले कि आईनेही झोप घ्यायला हवी. हा सल्ला जुनाट असला तरी तो शास्त्रीय आहे. एकाकीपणापासून दूर राहा अनेक संशोधनातून हे सिद्ध झालेय कि आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्याने आपला मूड बदलतो. संशोधकांना असे दिसून आलेय कि प्रसूती पश्चात औदासिन्यातून बऱ्या झालेल्या अनुभवी मातांसोबत बोलण्याने नवीन मातांमध्ये अश्या औदासिन्याचे प्रमाण कमी आढळून आले. म्हणून बोलत राहा. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख  नैराश्य न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: pregnancy
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात