नवी दिल्ली, 02 नोव्हेंबर : साधारणपणे प्रत्येक घरात सकाळी गरम नाश्ता आणि सुगंधी मसाला चहा बनवला जातो. जवळपास सर्वच घरांमध्ये सकाळी नाश्त्यासोबत चहा प्यायला जातो. अनेकजण सकाळी उठल्यानंतर आळस दूर करण्यासाठी चहा पितात. अनेकांच्या घरात नाश्ता आणि चहा एकत्र घेण्याची सवय असते. म्हणजे बहुतेकांना सकाळी नाश्ता घेतल्यानंतर त्याच्यासोबत चहाही प्यायची सवय झालेली (Dangerous Food Combinations) असते.
खरंतर न्याहारीनंतर म्हणजेच सकाळच्या नाश्त्यानंतर चहा पिणं ही चांगली सवय नाही. ही आरोग्यासाठी सर्वात हानिकारक सवय ठरू शकते. न्याहारीसोबत चहाचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घेऊया.
न्याहारीनंतर चहा पिणे हानिकारक आहे का?
याबाबत समजल्यानंतर अनेक लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की, खरंच चहासोबत नाश्ता करणं योग्य आहे का? आरोग्य तज्ज्ञांच्या मते याचं उत्तर असं आहे की, केवळ पोहेच नाही तर इतर अनेक प्रकारचे स्नॅक्स जे लोक चहासोबत खातात ते तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. यापाठीमागील अन्न विज्ञान आणि आयुर्वेद शास्त्रानुसार नाश्ता आणि चहा हे दोन भिन्न पदार्थ आहेत जे कधीही एकत्र सेवन करू नयेत.
आयुर्वेदात याविषयी सांगितले आहे की, अन्नामुळे एक प्रकारची शक्ती मिळते, अशा स्थितीत 2 विरुद्ध ऊर्जा असलेले अन्न एकत्र सेवन केल्यास शरीरातील कार्यप्रणाली नीट काम करू शकत नाही. ज्यामुळे त्याचा वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत हे दोन्ही शरीरात एकत्र गेल्यास फायदे देण्याऐवजी ते हानिकारक ठरतात.
हे वाचा - महिनाभर केली ड्युटी, मग त्याच पोलीस ठाण्यात झाली अटक; वाचा तोतया पोलिसाची गोष्ट
तज्ज्ञांच्या मते, अशा हानिकारक अन्नाच्या मिश्रणामुळे शरीरात विविध प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
हे आपल्या पचनसंस्थेवर आणि चयापचय प्रक्रियेवर परिणाम करू शकते, ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की उलट्या, मायग्रेन आणि अपचन सारख्या समस्या अनेकदा चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे होतात, यामुळे अॅसिडिटीची समस्या देखील होऊ शकते.
हे वाचा - तुमच्याही गळ्यात भेसळयुक्त चहा पावडर मारली जात नाही ना? अशी करा सोपी तपासणी
यामुळे त्वचेचे संक्रमण होऊ शकते.
आरोग्य तज्ज्ञांचा मते नाश्ता केल्यानंतर काही वेळाने तुम्ही चहाचे सेवन करू शकता, यामुळे आरोग्याचे खूप कमी नुकसान होईल. शक्यतो रिकाम्या पोटी चहा कधीच पिऊ नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips