नवी दिल्ली, 12 जुलै : कोरोनाव्हायरसशी जग अजूनही दोनहात करत आहे (Coronavirus). कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट्स समोर येत आहेत. त्यात स्वाइन फ्लू, मंकीपॉक्स अशा व्हायरसही डोकं वर काढत आहेत. हे कमी की काय त्यात आणखी एका व्हायरसने आता दहशत निर्माण केली आहे. हा व्हायरस कोरोनापेक्षाही खतरनाक असल्याचं सांगितलं जातं आहे. या व्हायरसबाबात जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) अलर्ट दिला आहे. हा व्हायरस आहे मारबर्ग व्हायरस (Marburg Virus). पश्चिमी आफ्रिकन देश घानामध्ये मारबर्गचे दोन संशयित प्रकरणं समोर आली आहे. या व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने टेन्शन वाढलं आहे. डब्ल्यूएचओसुद्धा याबाबत सतर्क झालं आहे. मारबर्ग या व्हायरसची याआधीही काही प्रकरणं समोर आली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, 1967 मध्येही या व्हायरसची सर्वाधिक प्रकरणं आढळली होती. तेव्हापासून दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत या व्हायरसचा बऱ्याचदा उद्रेक झाला आहे. हे वाचा - कोरोनापाठोपाठ पुण्यातील Serum Institute च्या Cervical cancer vaccine ला मंजुरी; पहिलीच भारतीय लस मारबर्ग इबोला व्हायरसपेक्षाही किती तरी वेगाने पसरून लोकांना आपल्या विळख्यात घेतो. जर कुणी या व्हायरसच्या विळख्यात सापडलं तर त्याचा मृत्यू निश्चित आहे, असंही सांगितलं जातं. यामुळे होणारा मृत्यूदर हा 24 ते 88 टक्के आहे. यावरूनच याचा संसर्गाचा वेग किती आहे, याचा अंदाज लावता येतो. याबाबत आयसीएमआरचे माजी महासंचालक एन.के. गांगुली यांनी सांगितलं की, हा व्हायरस एका व्यक्तीमार्फत दुसऱ्यापर्यंत पसरू शकतो. स्पर्शाने या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. इबोला व्हायरशी संबंधित हा व्हायरस आहे. याची लक्षणं फ्लूसारखी असतात. असे व्हायरस येत असतात पण आता कोरोनामुळे लोक अशा आजाराबाबत अधिक सतर्क झाले आहेत. हे वाचा - डॉक्टरांनी केली कमाल! दोन्ही किडनी शरीराच्या एकाच भागात जोडून वाचवला रुग्णाचा जीव तर डॉ. एम. वली यांनी सांगितलं की, मारबर्ग व्हायरसची प्रकरणं याआधी आढळली असली तरी कोरोनाच्या कालावधीत हा व्हायरस अॅक्टिव्ह होणं हे ठिक नाही कारण हा व्हायरस इबोलासारखाच पसरतो. यावर कोणतंही अँटिव्हायरल औषध किंवा लस नाही. सुदैवाने आफ्रिकाबाहेरील देशात याची प्रकरणं नाहीत पण तरी लोकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.