ऑस्ट्रेलियातल्या एका महिलेने आपल्या घटस्फोटाचं खरं कारणं सांगितल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. फिरण्याची आवड असलेली ऍश्लेला मित्राच्या लग्नानंतर आपणही लग्न करावं असं वाटायला लागलं.
30व्या वर्षी तिने लग्नाचा निर्णय घेतला. त्यानंतर वर्षभराने तिच्या आयुष्यात मॅथ्यू आला. भेटीगाठी वाढल्या आणि एक वर्षाने रोमॅन्टिक हॉलिडेला त्याने ऍश्लेला प्रपोज केलं. त्यावेळी त्यांनी भविष्याचे प्लॅन बनवले. याच काळात मॅथ्युने तिला मुलांबद्दल विचारलं तेव्हा ऍश्लेने मुलं होणं न होणं नशिबाच्या गोष्टी असल्याचं म्हटलं.
लग्नानंतर लहान मुलांना पाहून ऍश्लेलाही बाळाला जन्म देण्याची इच्छा झाली. मॅथ्युकडे हा विषय काढल्यावर त्याचं वागणं पूर्णपणे बदललं. त्याचा स्वभाव चिडचिडा झाला.
आपण मुलांशिवाय जगण्याचा निर्णय घेतल्याचं मॅथ्यु सांगायचा पण, ऍश्लेच्यामते असा कोणताही निर्णय झाला नव्हता. मुलं झाली तर आपल्याला फिरता येणार नाही असं म्हणत मॅथ्यु ऍश्लेची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचा. काही दिवसांनी मॅथ्यु तयार झाला आणि ऍश्लेला प्रचंड आनंद झाला.
6 महिने चांगले गेले. मात्र प्रयत्न करुनही गर्भधारणा होत नसल्याने डॉक्टरांच्या अपॉयमेन्ट घेणं सुरू झालं. ऍश्लेचे रिपोर्ट नॉर्मल होते.1 वर्षांनंतरही बाळाची चाहूल लागली नाही.
त्यानंतर डॉक्टरांनी मॅथ्युची टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र मॅथ्यूने याच कारणावरून भांडण केलं. मुल होत नसेल तर, प्रयत्न सोडून देऊ असं तो सांगत होता. बरीच भांडणं झाली 3 आठवडे अबोला राहीला. त्यानंतर एका रात्री अचानक मॅथ्युने जे काही सांगितलं त्यामुळे ऍश्लेला धक्काच बसला.
मॅथ्यूचं पहिलं लग्न झालं होतं आणि त्याच्या पहिल्या बायकोला मुल नको असल्याने त्याने नसबंदी करवली होती. तेव्हा ऍश्लेला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. मॅथ्यु मुलांना जन्माला घालू शकत नव्हता तरी त्याने हे लपवून ठेवलं होतं.
मॅथ्यूला वाटत होतं की, ऍश्ले प्रयत्न करून थकल्यावर स्वत:लाच दोष देईल आणि हा विषय बंद होईल. त्याच्या याच विचाराने ऍश्ले दुखावली गेली.
तिने आपल्या वकील असलेल्या बहिणीला ऍश्लेच्यावतीने डिव्होससाठी एप्लिकेशन करण्यास सांगितलं. लवकरात लवकर हे नातं संपवण्याची तिची इच्छा होती. तिला मोठा धक्का बसला आहे. त्यासाठी ती मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत आहे.
मुलं होण्यासाठी ती प्रत्येक प्रयत्न करत होती. मॅथ्यु सगळकाही पहात होता तरी गप्प होता. सगळा आरोप ऍश्लेवर टाकण्याचा त्याचा डाव होता. त्यामुळेच त्याला पोलिसांकडे द्यायला हवं होतं असं ऍश्लेला वाटतं. आता तिची बहिण तिच्यासोबत राहून तिला या धक्क्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.