स्त्री आणि पुरूषांच्या अपेक्षा (Expectations) आणि गरजा (Needs)वेगवेगळ्या असल्या तरी,लैंगिक संबंधांची आवश्यकता दोघांनाही असते. फक्त व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते.
पतीपत्नीच्या नात्यात रोमान्सही महत्वाचा आहे.पण, कालांतराने नात्यातलं आकर्षण कमी व्हायला लागतं. त्यामुळे पत्नी सेक्ससाठी नकार द्यायला लागते. अशा वेळेस पुरूषांच्या मनात अनेक शंका येतात.
वयानुसार पुरूष आणि महिलांमध्ये हार्मोनल चेंजेस व्हायला सुरुवात होते. त्यामुळे महिलांच्या मनात सेक्सबद्दल आकर्षण कमी व्हायला लागत. अशा वेळी तिचा मूड जाणून घ्या.
शक्य असेल तेव्हा रोमँटीक राहण्याचा प्रयत्न करा. तिला सकाळी गुडमॉर्निंग किस करा, बाहेर गेल्यावर तिचा हात हातात घ्या. तुमचा स्पर्श तिला तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे याची जाणीव करून देईल.
सेक्स करताना नेहमीचा तोचतोपणा जाणवत असेल तर, त्याबद्दलही पत्नीबरोबर बोला. एकाचवेळी, एकाच ठिकाणी, त्याच नेहमीच्या सवयीने सेक्स केल्यावर त्यातील नावीन्य आणि आकर्षण संपल्यासारखं वाटत असेल तर, इंटीमसीसाठी नवीन गोष्टी ट्राय करा.
पत्नी वर्किंग वुमन असेल तर, कामाच्या ठिकाणी स्ट्रेस असल्याने तिला थकवा येऊ शकतो. तिच्याशी बोलून टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करा. तिला घर कामात मदत करा.
कोणत्याही नात्यात विश्वास महत्वाचा असतो. पत्नी इंटीमसीपासून वाचण्याचा प्रयत्न करत असेल तर, तुम्ही एखादं प्रॉमिस तोडल्यामुळे किंवा फसवणूक केल्यामुळेही असू शकतं.
पत्नी उदास असेल, तिचा सेक्स करण्याचा मूड नसेल तर, समजुतदारपणे वागा. तिच्या उदास राहण्याची कारणं शोधा. डिप्रेशनमध्ये असलेल्या माणसाचा मूड आणि वागणं नकारात्मक होऊ शकतो. चर्चा करून तिला मदत करा.
भूतकाळात झालेल्या चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न करा. तिची माफी मागा आणि तिचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा.