स्वॅब टेस्ट (Swab test) – यामध्ये नाक किंवा घशात एक पट्टी किंवा ब्रश टाकून लाळेचे नमुना घेतले जातात
नसल अॅस्पिरेट (Nasal aspirate ) – नाकात सलाइन सॉल्युशन टाकलं जातं आणि सेक्शन पद्धतीने नमुने घेतले जातात.
Tracheal aspirate - म्हणजे एक लहानशी ट्युब (ब्रॉन्कोस्पोप) तोंडाच्या माध्यमातून फुफ्फुसांपर्यंत टाकली जाते आणि नमुने घेतले जातात.
Sputum test – या पद्धतीत एका विशिष्ट भांड्यात तुमची थुंकी घेतली जाते आणि शिवाय हाताच्या नसेतून रक्ताचे नमुने घेतले जातात.
कोरोनाव्हायरसच्या चाचणीसाठी जगभरात विशेष अशा प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. भारतात केंद्र सरकारने कोविड 19 (covid 19) च्या चाचणीसाठी 15 लॅब तयार केल्यात.