मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Nasal Vaccine Price: कोरोना उद्रेकात चांगली बातमी! नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची किंमत ठरली; किती येणार खर्च?

Nasal Vaccine Price: कोरोना उद्रेकात चांगली बातमी! नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची किंमत ठरली; किती येणार खर्च?

नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची किंमत ठरली

नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची किंमत ठरली

Coronavirus Nasal Vaccine Price: कोरोनाच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नेझल लसीची किंमत निश्चित केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : चीनसह संपूर्ण जगात वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये एक चांगली बातमी समोर येत आहे. कोरोनाच्या वाढत्या केसेसच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने नाकावाटे देण्यात देणाऱ्या लसीची (Coronavirus Nasal Vaccine Price) किंमत निश्चित केली आहे. या निर्णयानंतर कोरोनाला सामोरे जाण्यात आणखी वेग येईल. केंद्र सरकारने जीएसटीसह नाकातील लसीची किंमत 840 रुपये निश्चित केली आहे.

वास्तविक, नेझल लसीची किंमत 800+ 5% GST सह रु. 840 असेल. सध्या सरकारने ठरवून दिलेली ही किंमत आहे. पण भारत बायोटेक कंपनीला लसीची किंमत ₹ 1000 ठेवायची आहे. ही लस सुरुवातीला खासगी रुग्णालयांमध्ये बूस्टर डोस म्हणून दिली जाईल.

दरम्यान, कोवॅक्सिन किंवा कोविशील्डने पूर्णपणे लसीकरण केलेल्या लोकांसाठी इंट्रानेझल लस पूर्वी बूस्टर शॉट म्हणून मंजूर करण्यात आली होती. आता ही नेझल लस जानेवारी अखेरपर्यंत उपलब्ध असेल ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. भारत बायोटेकने वॉशिंग्टन विद्यापीठाच्या सहकार्याने ही अनुनासिक लस तयार केली आहे. या संदर्भात भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा एला म्हणतात की, कोविड विरुद्धच्या लढाईत ही लस प्रभावी ठरेल.

वाचा - 'ही फक्त सुरुवात! कोरोनाची नवी लाट जगभरात कहर करणार आणि लाखो लोकांचा..', शास्त्रज्ञांचा दावा

देशात कोरोनाची स्थिती काय आहे?

भारतात एका दिवसात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 157 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर, देशात आतापर्यंत संक्रमित लोकांची संख्या 4,46,77,459 झाली आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,421 वर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी 8 वाजता जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मृतांची संख्या 5,30,696 वर पोहोचली आहे. संसर्गामुळे झालेल्या मृत्यूच्या आकड्यांमध्ये केरळमधील एका मृत्यूने आणखी एक नाव जोडले आहे.

नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजे काय?

नेझल कोरोना वॅक्सिन म्हणजे नाकावाटे देण्यात येणारी कोरोना लस आहे. नाकाद्वारे या लसीचा डोस दिला जातो. या लसीला इंट्रानेझल वॅक्सिन असेही म्हणतात. नाकावाटे देण्यात येणारी ही लस इंजेक्शनला पर्याय म्हणून वापरली जाणार आहे. विशेषत: लहान मुले किंवा वृद्ध ज्यांना ट्रायपॅनाफोबिया आहे, म्हणजेच सुईची भीती वाटते. अशा लोकांसाठी नेझल कोरोना वॅक्सिन उत्तम पर्याय आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine