जगात कोरोनाच्या विषाणूचा (coronavirus) संसर्ग वाढत आहे. यावरील लशीसाठी काही काळ जाऊ शकतो. परंतु यापासून बचावासाठी उपाय म्हणजे मास्कचा (Mask) वापर करणे, हात धुणे आणि सुरक्षित अंतर राखणे इतकेच आहे. लोकांना सतत मास्क घालण्याचा सल्ला देण्यात येत आहे, परंतु मास्क परिधान करताना काही खबरदारी घ्यावी, अन्यथा यामुळे काही शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात. myupchar.com चे डॉ. आयुष पांडे यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही निरोगी व्यक्तीसाठी मास्क घालणे आवश्यक नाही. कोणत्याही निरोगी व्यक्तीने केवळ तेव्हाच मास्कचा वापर करावा जेव्हा तो एखाद्या आजारी किंवा कोरोना असलेल्या व्यक्तीची काळजी घेत असेल.जाणून घ्या मास्क लावण्यापासून होणारे नुकसान-
श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, हे आहे मुख्य कारण
मनुष्य श्वासाद्वारे प्राणवायू ग्रहण करतात आणि कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर सोडतात, परंतु मास्क घातल्यामुळे हळूहळू कार्बन डाय ऑक्साईड मास्कद्वारे बाहेर पडतो. मास्क घातल्यामुळे प्राणवायू शरीरात कमी प्रमाणात पोहोचतो. यामुळे शरीरातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढते व प्राणवायूच्या प्रमाणात घट होते. एखाद्या व्यक्तीस भोवळ येणे किंवा श्वास घेण्यात अडथळा येणे अश्या समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच अधिक काळ मास्कचा वापर करू नये.
डोकेदुखी आणि चक्कर येणे
मास्क घातल्यावर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्यास, त्यात असलेले हायपरकेनिया डोकेदुखी आणि चक्कर येणे या सारखी समस्या वाढवू शकते. राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या म्हणण्यानुसार, जास्त काळ मास्क लावल्याने शरीराला हानी पोहचू शकते. म्हणूनच, जेव्हा जास्त लोकांमध्ये उपस्थिती असेल तेव्हा मास्क लावा, परंतु जेव्हा जास्त गर्दी नसेल तर आपण मास्कचा वापर कमी करू शकता.
मॉर्निंग वॉक करताना किंवा धावताना मास्क घालू नका
सकाळी मॉर्निंग वॉक करताना जर कोणी मास्क लावत असेल, तर हे देखील चुकीचे आहे, कारण धावताना प्राणवायूची अधिक आवश्यकता असते. याशिवाय, एन 95 चे मास्क केवळ आरोग्य कर्मचार्यांनाच आवश्यक आहे. इतर लोक घरगुती कपड्यांचे बनवलेले मास्क सुद्धा लावू शकतात. असे मास्क लावल्यास श्वास घेण्यात कोणतीही अडचण येत नाही. शक्यतो, एकाच वेळी सर्व कामे करण्यासाठीच बाहेर पडायचा प्रयत्न करा, प्रत्येक छोट्या छोट्या कामासाठी बाहेर जाऊ नका.
घरच्या घरीच एक मास्क तयार करा आणि वापरल्यानंतर तो स्वच्छ करा
घरच्या सूती कापडापासून मास्क बनवला जाऊ शकतो. सूती कापड हे आरामदायक देखील आहे. याचा वापर करताना मास्क किंचित सैल परिधान केले पाहिजेत. घट्ट मास्क घातल्याने श्वास घेण्यात अडचण येते आणि नाकावर लाल चट्टे उठतात. लहान मुलांसाठी मास्क बनवताना हे लक्षात ठेवावे की कापड सूती आणि ते पातळ असावे, जेणेकरुन मुलांना श्वास घेण्यास त्रास होणार नाही. myupchar.com चे डॉ.आयुष पांडे यांच्या म्हणण्यानुसार, एन 95, एन 99 मास्कचा वापराचे चलन कोरोना संक्रमणाच्या प्रारंभापासून वाढले आहे, परंतु हे सर्व लोकांना आवश्यक नाहीत. परिचारिका आणि डॉक्टर्स यांनाच एन 95, एन 99 मास्क आवश्यक आहेत.
अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख -श्वसनाचा त्रास: लक्षणे, कारणे...
न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Mask