जिनिव्हा, 12 जानेवारी : भारतात कोरोना लसीकरणाची (Corona vaccination) तयारी सुरू आहे. 16 जानेवारीला लसीकरण (covid 19 vaccination) सुरू केलं जाणार आहे. काही देशांमध्ये लसीकरणाला सुरुवातही करण्यात आली आहे. त्यामुळे आपण लवकरच कोरोनाविरोधात लढाई जिंकू अशी आशा असतानाच जागतिक आरोग्य संघटनेनं ( (World Health Organisation) सर्वांना धक्का दिला आहे. लसीकरणानंतरही हर्ड इम्युनिटीची शक्यता नाही, असं डब्ल्यूएचओनं (WHO) म्हटलं आहे. कोरोनाचं बदलतं रूप आणि जगातील परिस्थिती पाहता सध्या तरी जगात कुठेही हर्ड इम्युनिटीची शक्यता दिसून येत नाही. असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत WHO ही चिंता व्यक्त केली आहे. WHO च्या डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, “नुकतीच ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, इज्राइल आणि नेदरलँडसह अनेक देशांनी आपल्या नागरिकांचं लसीकरण सुरू केलं आहे. लस देऊन आपण कोरोनाचा जास्त धोका असलेल्या लोकांना सुरक्षा देऊ पण 2021 सालात आपण हर्ड इम्युनिटी विकसित करू शकत नाही. जर काही ठिकाणी किंवा देशांमध्ये असं झालं तरी जगभरातील नागरिकांना सुरक्षा मिळेल असं नाही. तज्ज्ञांच्या मते, हर्ड इम्युनिटीसाठी जवळपास 70% टक्के लोकांचं लसीकरण आवश्यक आहे. यामुळे संपूर्ण लोकसंख्या कोरोनापासून सुरक्षित होईल. पण कोरोना जास्त संसर्गज्य आहे आणि हर्ड इम्युनिटीसाठी फक्त 70% ही पुरेसे नाहीत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि इतर खबरदारी घ्यायलायच हवी. " हे वाचा - गोरिला कोरोनाच्या विळख्यात, पहिल्यांदाच 2 गोरिलाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह डब्ल्यूएचओच्या महासंचालकांचे सल्लागार डॉ. ब्रूस आयलवर्ड यांनी सांगितलं, “या महिन्याच्या अखेर किंवा फेब्रुवारीत काही गरीब देशांमध्ये कोरोना लसीकरण सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. सर्व देशांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. जास्त धोका असलेल्या लोकांचं लसीकरण करण्यासाठी लस उत्पादकांच्या मदतीची गरज आहे”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.