कोरोनाव्हायरसविरोधातील लस कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. मात्र कोरोनाची लस आल्यानंतर ही बातमी सर्वांसाठीच दिलासादायक ठरेल असं नाही.
नार्थ कॅरोलिना युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेला हा अभ्यास ओबेसिटी रिव्ह्यू जर्नलमध्ये (Obesity Review journal) प्रकाशित करण्यात आला आहे.
लठ्ठ किंवा जास्त वजन असलेल्या व्यक्तीने इतर व्यक्तींवर कोरोना लशीचा परिमाण होणार नाही, असं संशोधकांनी म्हटलं आहे.
लठ्ठ, अति वजन असलेल्या व्यक्तींना इतरांच्या तुलनेत गंभीर आजार लवकर बळावतात. लठ्ठपणा म्हटलं की रक्तदाब, मधुमेह असे आजार आलेच आणि हे आजार असलेल्या रुग्णांना कोरोनाशी लढणं अशक्य होतं.
कोरोनाग्रस्त लठ्ठ व्यक्तींचं रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण आणि कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही अधिक आहे, असं याआधी एका संशोधनात दिसून आलं आहे.
वजन जास्त असलेल्या लोकांमध्ये याधी एच1एन1 फ्ल्यूची लस परिणामकारक नव्हती. त्यामुळे आता लठ्ठ व्यक्तींवर कोरोना लशीचाही फारसा परिणाम होणार नाही. अशी शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.