कोरोनाची लस घेऊच, पण या 4 साइड इफेक्ट्सचं काय करायचं? डॉक्टरांनी दिला इशारा

कोरोनाची लस घेऊच, पण या 4 साइड इफेक्ट्सचं काय करायचं? डॉक्टरांनी दिला इशारा

कोरोनाची लस जगभरातले शास्त्रज्ञ तयार शोधत आहेत. मात्र लसीकरणादरम्यान समोर येणारे साइड इफेकट्सही चिंताजनक ठरत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 14 डिसेंबर : कोरोना (corona)ला रोखणारी लस कधी येणार याकडे सगळं जग सध्या डोळे लावून बसलं आहे. जगभरातले वैज्ञानिकही कमालीच्या वेगात लस (vaccine) शोधून मानवजातीला वाचवण्याकामी गुंतलेत. सध्या प्रायोगिक तत्वावर लस घेतलेल्या व्यक्ती सुरक्षित असल्याचं सांगितलं जात असलं तरी औषध कंपन्या आणि डॉक्टर्स काही प्रकारची खबरदारी घेण्याबाबत सतत चेतावणी देत आहेत. कोविडची (Covid-19) लस घेणारी व्यक्ती संभाव्य धोक्यांना बळी पडू शकते.

कोविडची लस घेतल्यावर अ‍ॅलर्जी किंवा गंभीर साईड इफेक्ट्स उद्भवू शकतात. अनेक प्रमुख वॅक्सीन ट्रायल्ससह स्वयंसेवक बनलेल्या काही लोकांमध्ये असे साईड इफेक्ट्स समोर आलेत. काही केसेसमध्ये तर खूपच आगळेवेगळे परिणाम दिसताहेत. लसीकरण यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला उणिवांवर लक्ष द्यावं लागेल. असेच काही पोस्ट-वॅक्सिनेशन (लसीकरणोत्तर) परिणाम आपण जाणून घेऊ, ज्याबाबत डॉक्टर्स जास्तच काळजीत पडलेत.

ताप किंवा हुडहुडी भरणं - मॉडर्नाची एक लस घेतल्यावर ताप येणं आणि थंडी वाजण्यासारखे साईड इफेक्ट्स दिसून आले होते. संबंधित स्वयंसेवकाला काही तासातच  अंश ताप चढला. आता लसनिर्मात्या कंपन्यांना या दोन साईड इफेक्ट्सवर विशेषत्वानं लक्ष द्यावं लागेल. तसं पाहता, शरीर जेव्हा प्रतिद्रव्य (अँटीबॉडी) बनवतं, तेव्हा माणसाला कमी-अधिक ताप चढू शकतो.

डोकेदुखी - लस टोचल्यावर डोकं दुखण्याची समस्याही एक असं लक्षण आहे, ज्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. तीव्र डोकेदुखीसह मानसिक ताण, चिडचिड आणि मूड स्विंग्जलाही तोंड द्यावं लागू शकतं. कुठल्याही संसर्गादरम्यान ५० टक्के रुग्णांमध्ये अशा तक्रारी उद्भवतात.

उलटी किंवा धडधड वाढणं - कुठल्याही लसीचा परिणाम व्यक्तीच्या गॅस्ट्रोइंटस्टाइनल सिस्टम (जठर व आतडेविषयक यंत्रणेवर) होऊ शकतो. एकी स्वयंसेवकाला मे महिन्यात 'मॉडर्ना'च्या लसीचे सर्वाधिक डोस घ्यायला निवडलं होतं. लस घेतल्यावर कित्येक तास त्याची तब्येत बिघडलेली राहिली. यादरम्यान त्या व्यक्तीनं धडधड वाढणं, जीव घाबरा होणं, पोटात मुरडा येणं अशी अनेक लक्षणं नोंदवली.

मांसपेशींमध्ये वेदना - रुग्णाला ज्या जागेवर लस दिली जाते, तिथे बहुतेकदा मांसपेशींमध्ये वेदना आणि सूज उद्भवते. सोबतच त्या जागेवर लालसरपणा किंवा पुरळसुद्धा येतात. मॉडर्ना, फायजर आणि ऑक्सफर्ड-एस्ट्रोजेनका अशा तिन्ही कंपन्यांनी आपल्या लसीचे असे साईड इफेक्ट्स नोंदवलेत.

मायग्रेन - मायग्रेन अर्थात डोक्याची एक बाजू दुखणे हीसुद्धा एक समस्या यातून निर्माण होऊ शकते. एका अहवालानुसार, फायजरच्या वॅक्सीन ट्रायलचा भाग असलेल्या एका स्वयंसेविकेमध्ये मायग्रेन उद्भवला. तिनं अनेकांना सांगितलंसुद्धा होतं, की ही लस घेण्याआधी एक दिवस सुट्टी घ्या आणि खूप आराम करा.

Published by: News18 Desk
First published: December 14, 2020, 11:15 PM IST

ताज्या बातम्या