हिवाळ्यात बळावल्या सांधेदुखीच्या समस्या; फक्त 7 पदार्थ खा, त्वरित मिळेल आराम

हिवाळ्यात बळावल्या सांधेदुखीच्या समस्या; फक्त 7 पदार्थ खा, त्वरित मिळेल आराम

  • Last Updated: Dec 27, 2020 09:04 PM IST
  • Share this:

गुडघा किंवा सांधेदुखीमुळे कोणालाही बेचैन वाटू शकतं आणि त्याचा परिणाम दिवसभर वेदना देणारा असू शकतो. कधीकधी गुडघेदुखी ही दुखापत झाल्यामुळे किंवा संधिवात, संधिरोग इत्यादी अनेक आजारांमुळे होऊ शकते. myupchar.com चे एम्सशी संबंधित डॉ. केएम नादिर यांनी सांगितलं, सांधेदुखीची अनेक कारणं आहेत. ऑस्टियोआर्थरायटिस, संधिवात, बर्सा, टेंडायटीस या सर्वांमुळे सूज, लालसरपणा देखील येतो आणि वेदनाही होतात.

डॉक्टर यावर औषधोपचार करतात मात्र आहारदेखील महत्त्वाची भूमिका बजावतं. हे 7 पदार्थ गुडघा आणि सांध्यातील दुखण्यापासून आराम देऊ शकतात.

हळद : हळदीमध्ये उपस्थित कर्क्युमिन अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्मांसह समृद्ध आहे. अभ्यासात असं आढळलं आहे की, हळदीचं नियमित सेवन केल्यास ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवाताची वाढ रोखण्यास मदत होते. एक ग्लास कोमट दुधात एक चमचा हळद आणि थोडं मध मिसळा. रक्त पातळ करणारी औषधं घेणार्‍यांसाठी हा उपाय योग्य नाही.

आलं : सांध्यातील वेदना आणि स्नायूंसाठी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. यात दाहकता कमी करणारे गुणधर्म आहेत, जे वेदना कमी करण्यास अतिशय प्रभावी आहेत. एक कप पाण्यात आल्याचे तुकडे घालून दहा मिनिटे उकळण्यासाठी ठेवा. हे मिश्रण गाळल्यानंतर त्यात मध आणि लिंबू मिसळून प्या.

लसूण : संधिवात आणि सांधेदुखीनं त्रासलेल्या लोकांसाठी लसणाचं सेवन करणं फायदेशीर ठरू शकतं. यात सल्फर आणि सॅलिनियम असतं जे वेदना आणि जळजळीपासून आराम देतात. आपण आपल्या आहारात कच्चा किंवा शिजवलेला लसूण समाविष्ट करू शकता. दररोज दोन ते तीन लसूण कळ्यांचं सेवन फायदेशीर आहे.

मेथीचे दाणे : संधिवात झाल्यामुळे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी एक चमचे मेथी दाणे रात्रभर भिजवून सकाळी खावेत. यात अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत.

अॅपल सिडर व्हिनेगर व्हिनेगरचं सेवन सांधे आणि ऊतींमधून विषारी द्रव्य काढून टाकतं. क्षारीय परिणामामुळे गुडघा आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. सांध्यांनाही गुळगुळीत करतं आणि गतिशीलता वाढवतं. दोन चमचे व्हिनेगर दोन कप पाण्यात घाला आणि चांगलं एकत्र करून प्या.

मासे : सांध्यांच्या आरोग्यासाठी मासे हा एक उत्तम पर्याय आहे. त्यात हाडे मजबूत करण्यासाठी जीवनसत्व डी आणि कॅल्शियम तसंच ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडची चांगली मात्रा असते. ओमेगा -3 सूज कमी करण्यास मदत करते. जर आपल्याला मासे आवडत नसतील तर कॅल्शियम आणि जीवनसत्व डी साठी कमी चरबीयुक्त दुग्ध उत्पादनांचे सेवन करा आणि आपल्या जीवनसत्त्वांमध्ये फिश ऑइलचा पूरक आहार घेण्याचा प्रयत्न करा.

लाल मिरची : myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, मिरचीमध्ये कॅपसॅसिनअसते, जे वेदनाशामक म्हणून काम करतं. त्याच्यात वेदना दूर करणारे गुणधर्म असतात जे उष्णता निर्माण करून गुडघेदुखीपासून आराम देतात. अर्धा कप गरम ऑलिव्ह तेलात दोन चमचे लाल तिखट मिसळून हे मिश्रण वेदनाग्रस्त भागावर लावा. आठवड्यातून दररोज दोनदा ही प्रक्रिया करा. लाल मिरचीमुळे वेदनाग्रस्त भागात जळजळ उद्भवू शकते. म्हणून दुखापत झालेल्या जागेवर त्याचा वापर करू नका. लाल मिरचीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं जे कोलेजनच्या निर्मितीस मदत करतं. कोलेजेन हाड आणि स्नायू एकत्र ठेवतं.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - गुडघेदुखी: लक्षणे, कारणे, उपचार...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 27, 2020, 9:04 PM IST

ताज्या बातम्या