जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ऐकावं ते नवलचं! हवेपासून बनवले शाकाहारी मांस! स्वस्त, मस्त अन् टिकाऊ असल्याचा दावा

ऐकावं ते नवलचं! हवेपासून बनवले शाकाहारी मांस! स्वस्त, मस्त अन् टिकाऊ असल्याचा दावा

ऐकावं ते नवलचं! हवेपासून बनवले शाकाहारी मांस! स्वस्त, मस्त अन् टिकाऊ असल्याचा दावा

Air Protein : आत्तापर्यंत तुम्ही प्लांट बेस्ड मीट (Plant Based Meat) अर्थात वनस्पतींपासून मांसासारखी प्रथिने बनवण्याबद्दल ऐकले असेल, पण आता एका फूड कंपनीने हवेपासून मांस बनवण्याचा दावा केला आहे.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 23 फेब्रुवारी : हवेपासून (Air) काहीही बनत नाही असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. पण हे असत्य असल्याचा दावा एका कंपनीनं केला असून, या कंपनीनं चक्क हवेपासून मांस (Meat) बनवलं आहे. संशोधकांनी हवेतली प्रथिनं वापरून मांसाला पर्याय तयार केला असून, ‘एअर प्रोटीन’ या फूड स्टार्टअप कंपनीने अशा प्रकारचं मांस (Meat Made of Thin Air) बाजारातही दाखल केलं आहे. एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटाची कथा आहे असं वाटलं ना! पण हे अगदी 100 टक्के खरं आहे. अतिशय अकल्पनीय वाटणारा हा शोध आता जगासमोर सादर करण्यात आला असून, सर्वत्र त्याची चर्चा आहे. एअर प्रोटीन (Air Protein) नावाच्या स्टार्टअपने (Startup) अतिशय प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हवेतून मांस तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. पुरस्कार विजेत्या भौतिकशास्त्रज्ञ डॉ. लिसा डायसन या कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. त्यांनीच यासाठी पुढाकार घेतला आहे. मांसाला पर्याय म्हणून सादर करण्यात आलेला हा पदार्थ हवेतील प्रथिनांचा वापर करून तयार केला जातो. यात काही सूक्ष्मजंतूंद्वारे कार्बन डायऑक्साईडचं (CO2) अमिनो आम्लांमध्ये (Amino acid) रूपांतर केलं जातं आणि त्यातून प्रोटीन पावडर (Protein Powder) मिळते. ही पावडर किंवा पीठ वापरून मांसविरहित विविध उत्पादनं बनवली जातात. डॉ. लिसा यांच्या मते, हे पीठ कार्बन डायऑक्साइडपासून (CO2) पासून बनवलेलं असलं, तरी ते खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. जग असंही दिसू शकतं? अवकाशातून टिपलेले हे फोटो पाहून थक्क व्हाल! ‘नासा’च्या संशोधनातून प्रेरणा 1960च्या दशकात नासा (NASA) या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने केलेल्या एका संशोधनातून डॉ. लिसा डायसन यांना ‘एअर प्रोटीन’च्या संशोधनाची प्रेरणा मिळाली. अंतराळवीर हवेत स्वतःचं अन्न तयार करू शकतील यासाठी नासा ही संस्था संशोधन करत होती. यात ‘नासा’ने हायड्रोजेन्ट्रोफ नावाच्या सूक्ष्मजंतूंचा शोध लावला. ते योग्य परिस्थितीत कार्बन डायऑक्साईडच्या संपर्कात आणले जातात, तेव्हा अमिनो आम्ल तयार होतं. त्याचा उपयोग अन्नपदार्थ बनवण्यासाठी होऊ शकतो. ‘नासा’च्या या कल्पनेवर अधिक विचार करून या कंपनीने स्वत:चं एक वेगळंच उत्पादन तयार केलं आहे. मांसाच्या इतर पर्यायांपेक्षा हे मांस खूपच स्वस्त आणि अधिक टिकाऊ असेल असा दावा डायसन यांनी केला आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात