Home /News /lifestyle /

Cold drink पिताना घशात अडकलं बाटलीचं झाकण; एकुलत्या एक लेकाचा तडफडून मृत्यू

Cold drink पिताना घशात अडकलं बाटलीचं झाकण; एकुलत्या एक लेकाचा तडफडून मृत्यू

कोल्ड ड्रिंकच्या बाटलीचं झाकण घशातून बाहेर काढण्यात आलं पण त्याचा जीव वाचला नाही.

    चंदीगढ, 20 मे : उन्हाळ्यातील उकाड्याने सर्वांना हैराण केलं आहे. उन्हात बाहेर गेलो किंवा बाहेर फिरून घरात आलो तरी जीव नकोसा होतो. तहानेने व्याकूळ झालेले असल्याने आपण घाईघाईत पाणी किंवा कोल्ड ड्रिंकची बाटली घेतो आणि त्यातूनच घटाघट पाणी पित जातो. बऱ्याचदा आपण त्याचं झाकणही पूर्ण काढत नाही किंवा झाकण त्याच हातात धरतो ज्या हातात बाटली धरून आपण पाणी किंवा कोल्ड ड्रिंक पितो. पण असं करणंच एका मुलाच्या जीवावर बेतलं आहे. हरयाणाच्या अंबाला जिल्ह्यातील प्रकरण (Cold drink bottle lid stuck in throat 15 year old boy died). कोल्ड ड्रिंक पिताना घशात बाटलीचं झाकण अडकल्याने 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. यश कुमार असं या मुलाचं नाव आहे.  शिनाख्त डिफेन्स कॉलनीत राहणारा यश बाटलीतून कोल्ड ड्रिंक पित होता. त्याने बाटलीचं झाकण थोडंच उघडलं होतं. जसं त्याने कोल्ड ड्रिंक प्यायला बाटली तोंडाच्या वर धरली. तसं त्या बाटलीचं झाकण पूर्णपणे निघालं आणि ते तोंडात पडलं. हे वाचा - दुर्दैवी! ढोकळा खाताना ठसका लागला आणि जीव गेला; मुंबईतील डॉक्टर नवरीची वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा तो तोंडातून झाकण काढण्याआधीच ते त्याच्या घशात गेलं आणि तिथंच अडकलं. त्याने आणि त्याच्या कुटुंबाने त्याच्या घशातून झाकण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ तो तडफडत होता. शेवटी त्याची आई आणि त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला अंबालातील मिलिट्री रुग्णालयात नेलं. बऱ्याच प्रयत्नानंतर डॉक्टरांनी त्याच्या घशातील झाकण बाहेर काढलं पण त्याला वाचवतं आलं नाही. त्याचदरम्यान त्याचा मृत्यू झाला. हे वाचा - Big B Amitabh Bachchan यांच्यासारखा भारदस्त आवाज काढणं आता कठीण नाही; डॉक्टरला उपाय सापडला मीडिया रिपोर्टनुसार यशचे वडील अनिल कुमार माजी सैनिक आहेत. यश सैनिक स्कूलमध्ये इयत्ता अकरावीत शिकत होता. त्याला एक बहीण आहे, जी त्याच्यापेक्षा मोठी आहे. म्हणजे यश हा घरातील एकुलता एक मुलगा होता. पण त्याचा असा दुर्दैवी अंत झाला.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Death, Haryana

    पुढील बातम्या