Home /News /lifestyle /

तुमच्या आवडीचं कोल्ड्रिंक ठरतंय जगासाठी विनाशकारी! या 2 बड्या कंपन्यामुळे होतंय गंभीर प्रदूषण

तुमच्या आवडीचं कोल्ड्रिंक ठरतंय जगासाठी विनाशकारी! या 2 बड्या कंपन्यामुळे होतंय गंभीर प्रदूषण

कोल्ड्रिंक्स (Cold Drink) अनेकजणं नित्यनियमाने पितात. पण तुम्हाला माहीत आहे का, कोल्ड्रिंक्ससाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकमुळे आज जगभरातील प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे.

न्‍यूयॉर्क, 02 फेब्रुवारी: प्रदूषणाची समस्या (Pollution Problem) दिवसेंदिवस गंभीर होत आहे. जगभरात प्रदूषणाच्या समस्येबाबत विविध पावलं उचलली जात आहेत. लोकांमध्ये प्रदूषणाबाबत जागरूकता निर्माण केली जात आहे. कोल्ड्रिंक्स (Cold Drink) अनेकजणं नित्यनियमाने पितात. पण तुम्हाला माहीत आहे का, कोल्ड्रिंक्ससाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकमुळे आज जगभरातील प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. कोल्ड्रिंक्स निर्मितीतील दोन मोठ्या कंपन्या कोका-कोला आणि पेप्सिकोवर सर्वांत जास्त प्रमाणात प्लॅस्टिक प्रदूषण करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सलग चौथ्या वर्षी या कंपन्यांना प्रदूषणासाठी दोषी ठरवत ‘ब्रेक फ्री फ्रॉम प्लॅस्टिक’ या संस्थेने आपलं रँकिंग जाहीर केलं आहे. ही संस्था जगभरातील प्लॅस्टिकच्या प्रदूषणाविरुद्ध काम करते. ‘ब्रेक फ्री फ्रॉम प्लॅस्टिक’ ही संस्था विश्वस्तरावर काम करत आहे. या संस्थेच्या रँकिंगनुसार अनेक मोठ्या कंपन्यांचा 2021 च्या सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांमध्ये समावेश आहे. युनिलिव्हर, नेस्ले, पी अँड जी, कोलगेट-पामोलिव्ह, फिलिप मॉरिस इंटरनॅशनल, डॅनन या कंपन्या सर्वाधिक प्रदूषण करतात असं या संस्थेचं रँकिंग सांगतं. हे वाचा-Cancer पासून वाचण्यासाठी व्हॅक्सिनची भूमिका ठरेल महत्त्वाची,संशोधकांचा मोठा दावा या संस्थेच्या अहवालानुसार 1966 साली जागतिक प्लॅस्टिक उत्पादन 20 दक्षलक्ष मेट्रिक टन (Million Metric Tons) होतं. जे 2015 साली वाढून 381 दक्षलक्ष मेट्रिक टन एवढं झालं. हे अर्ध्या दशकांमध्ये 20 पटींपेक्षा अधिक आहे. या कोल्ड्रिंक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी रिसायकलिंग आणि पायलट योजनांवर लक्ष केंद्रित केलं असलं तरी ते पुरेसं नाही, असं टियर फंडचे वरिष्ठ नीती सल्लागार जोआन ग्रीन यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले, ‘कोल्ड्रिंक निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी सिंगल-युज पॅकेजिंग कमी करणं आणि त्यांच्याद्वारे विकल्या जाणाऱ्या वस्तूंचे प्लॅस्टिक कॅन किंवा बाटल्या पुन्हा गोळा करायला हवेत. कोका-कोला कंपनी काही देशांत असं काम करते पण त्यांनी सगळ्या देशांत असं काम करायला हवं.’ जागतिक बँकेनुसार कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये जवळपास 93 टक्के कचऱ्यांची नीट विल्हेवाट न लावता तो कुठेही फेकला जातो. मैदानांमध्ये तो जाळला जातो त्यामुळे प्रदूषण वाढून त्याचं रूपांतर अनेक समस्यांमध्ये होतं. जसं समुद्रात फेकलेल्या कचऱ्यामुळे होणारं प्रदूषण किंवा नाले तुंबून साचणारं पाणी इ. या अहवालानुसार सुरूवातील समुद्रातील कचऱ्यावर लक्ष क्रेंद्रित करत फक्त जहाज आणि समुद्रावर आधारित उपक्रमांवर पाऊल उचलण्यात आली होती. पण आता समोर आलं आहे की, जमिनीवरील प्लॅस्टिकचा कचरा हा नद्या आणि नाल्यांमार्फत समुद्रापर्यंत पोचू शकतो. हे वाचा-‘या’ प्रोटिनमुळे भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढतोय Diabetes चा धोका परिणामी समुद्रातील जवळपास एक हजार प्रजांतीवर प्लॅस्टिकचा परिणाम होऊन तोच कचरा मासांहारद्वारे माणसांसाठी धोकादायक बनत आहे. या अहवालानुसार दरवर्षी जवळपास 8 दक्षलक्ष मेट्रिक टन (MMT) कचरा जगभरात निर्माण होतो. जे प्रत्येक मिनिटाला प्लॅस्टिक कचऱ्याचा एक ट्रक समुद्रात डंप करण्यासारखं आहे. अशीच स्थिती राहिल्यास समुद्रात फेकल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचं प्रमाण 2030 सालापर्यंत दरवर्षी 53 MMT एवढं होईल. जे समुद्रातून पकडल्या जाणाऱ्या माश्यांच्या एकूण वजनाच्या जवळपास अर्ध आहे. याच कारण मोठ्या प्रमाणात कचरा म्हणून जमा होणारं प्लॅस्टिक आहे. या कचऱ्याच्या रिसायकलिंगबाबत 1980 नंतर कोणतंही प्रमाण ठरवण्यात न आल्याने हे प्रमाण वाढलं आहे. याबाबत कोका-कोलाही कंपनी जागतिक स्तरावर काम करत आहे, पण असं काम प्रत्येक देशात झालं पाहिजे. विकसित देशात प्लॅस्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत या कंपन्यांनाकडून तितकीशी पावलं उचलली जात नाहीत. हे चित्र बदललं गेलं पाहिजे. या विकसित देशांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत त्यापैकी एक म्हणजे कच्च्या प्लॅस्टिकचं उत्पादन कमी करणं. तसंच विकसित देशांत घरातील कचरा एका विशिष्ट ठिकाणीच टाकला जायला हवा त्यासाठी सरकारनी नियोजन करायला हवं. वेस्ट कॅप्चर टेक्नॉलॉजीचा वापर केल्यास जलमार्ग आणि समुद्रात प्लॅस्टिक जाणार नाही. एनजीओ बियाँड प्लॅस्टिक्सचे प्रमुख जुडिथ एनक यांच्या म्हणण्यानुसार समुद्रातील प्लॅस्टिकविषयी आलेले संशोधन अहवाल हे त्याचा गंभीर धोका दर्शवत आहेत त्यांच्यावर सरकारने कारवाई करणं गरजेचं आहे. ओशियानातील प्लॅस्टिकविरोधी अभियानाच्या प्रमुख क्रिस्टी लेविट यांचं म्हणणं आहे की समुद्रातील प्लॅस्टिकची समस्या ही जगासमोरच्या पर्यावरणासंबंधी समस्यांमधील एक मोठी समस्या आहे आणि तिच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आज प्लॅस्टिक हे जगभरात प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे तुम्हीही सजग नागरिक बना आणि प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर दैनंदिन जीवनात करून प्रदूषण टाळा.
First published:

Tags: Pollution

पुढील बातम्या