Home /News /lifestyle /

तुमच्या किचनमधील फक्त 3 पदार्थही हेल्दी ठेवतील तुमची किडनी

तुमच्या किचनमधील फक्त 3 पदार्थही हेल्दी ठेवतील तुमची किडनी

एका अभ्यासानूसार दिवसातून 1000 मिलीग्रॅमपेक्षा जास्त व्हिटॅमीन सी घेण्याने शरीराची ते शोषण्याची क्षमता 50 टक्क्यांनी कमी होते आणि अतिरिक्त व्हिटॅमिन सी मूत्रमाद्वारे शरीरातून बाहेर काढलं जातं.

एका अभ्यासानूसार दिवसातून 1000 मिलीग्रॅमपेक्षा जास्त व्हिटॅमीन सी घेण्याने शरीराची ते शोषण्याची क्षमता 50 टक्क्यांनी कमी होते आणि अतिरिक्त व्हिटॅमिन सी मूत्रमाद्वारे शरीरातून बाहेर काढलं जातं.

किडनी (kidneys) निरोगी ठेवण्यासाठी हे सोपे असे घरगुती उपाय आहेत.

  • myupchar
  • Last Updated :
    आपल्या शरीता किडनीचं कार्य खूप महत्त्वपूर्ण आहे. मूत्रपिंडाचे प्रथम आणि सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे रक्त गाळण करणं आणि त्यातील अस्वच्छता दूर करणं करणं.  शिवाय रक्तदाब नियंत्रित करण्यातही मदत करते, कारण त्यांचे कार्य करण्यासाठी त्यांना विशिष्ट दाबाची आवश्यकता असते. रेनिन नावाच्या संप्रेरकाद्वारे किडनी रक्तदाब कमी किंवा वाढवू शकते. जर आपण किडनी निरोगी ठेवली नाही तर तीनिकामी होण्याचा किंवा मूत्रपिंडाला कर्करोग होण्याचा धोका असतो.  myupchar.com च्या एम्सशी संबंधित डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी म्हणतात की, जेव्हा मूत्रपिंडाचा आजार होतो. तेव्हा तो शरीरातून उर्वरित द्रव पदार्थ प्रभावीपणे बाहेर काढू शकत नाही, ज्यामुळे शरीरातील द्रव पदार्थाचे संतुलन बिघडतं. मूत्रपिंड निरोगी राहण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचा आहार घेणं तसंच शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहणं आवश्यक आहे. लसूण : लसणाचा मूत्रपिंड आणि इतर अवयवांवर संरक्षणात्मक प्रभाव असतो. लसणाच्या नियमित सेवनाने मूत्रपिंड, यकृत, हृदय आणि रक्त प्रवाहातील शिसं आणि कॅडमियमचं प्रमाण कमी होतं. लसूण शरीरातून अतिरिक्त सोडियम नष्ट करतं. तसंच यातील सक्रिय घटक अ‍ॅलिसिनमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आहेत. हळद: हळदीमध्ये कर्क्युमिन असते जे मुत्रापिंडाच्या गंभीर आजाराला कारणीभूत अणू आणि एन्जाइमचा प्रभाव कमी करतं. कर्क्युमिन प्रत्यक्षात सर्व प्रकारच्या सूक्ष्मजंतूंची वाढ आणि प्रसार रोखतं. ज्यांना आधीच मूत्रपिंडाचा आजार आहे त्यांच्यासाठी येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हळदीमध्ये योग्य प्रमाणात पोटॅशियम असतं. शरीराच्या द्रव पातळी टिकवण्यासाठी सोडियमसह काम करतं. किडनीचा आजार असणाऱ्यांना पोटॅशियम संतुलित ठेवणं अवघड होतं. म्हणून पीडित व्यक्तींना हळदीचं सेवन मर्यादित प्रमाणात करावं. आले: आल्यामध्ये जिंजरॉल नावाचं एक कंपाऊंड असतं जे जिवाणूंच्या प्रसारास प्रतिबंधित करतं. हे मूत्रपिंड आणि यकृत याचं कार्य अधिक चांगलं करण्यास मदत करतं. आलं हे निरोगी पचन क्रियेसाठी ओळखलं जातं आणि यामुळे संपूर्ण शरीरातील सूज आणि वेदना कमी होतात. रक्तातील अति प्रमाणातील साखरेचा मूत्रपिंडावर हानिकारक परिणाम होतो अश्यावेळी आणि आल्याची पुड त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते. या कारणास्तव, आल्याचे नियमित सेवन मधुमेह असलेल्या लोकांमध्ये मूत्रपिंडाच्या बिकट आजारास कमी करण्यासाठी प्रभावी मानले जाते. सिंहपर्णी : myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला म्हणतात की सिंहपर्णी चा उपयोग मधुमेह, यकृत, मूत्रपिंड आणि पोटाच्या विकारांवर उपचार करण्यासाठी अनेक शतका पासून औषधाच्या रुपात वापर केला जात आहे. याची मुळे, पाने आणि फुले सर्व खाण्यास उपयुक्त आणि अत्यंत पौष्टिक आहेत. ही औषधी वनस्पती; जीवनसत्त्वे अ, सी, डी आणि बी यांचा समृद्ध स्रोत आहे. डंडेलियन रूट म्हणजेच पिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड मूत्रपिंड आणि यकृत दोन्ही शुद्ध करण्यात मदत करू शकते. हे कावीळ, मुरुम आणि अशक्तपणा तसेच मूत्रपिंड आणि यकृत विकारांवर उपचार. क्रॅनबेरी: क्रॅनबेरी म्हणजेच क्रॅनबेरीचे फळ आकाराने खूप लहान, गुलाबी रंगाचे आणि गोड असते. मूत्रमार्गात संक्रमण असणाऱ्या लोकांना त्याचे सेवन करण्याची शिफारस केली जाते, कारण त्यात एक प्रकारचा फायटोन्यूट्रिएंट आहे, ज्याला ए-टाइप प्रोएंथोसाइनिडिन म्हणून ओळखले जाते. हे जीवाणूना मूत्रमार्गात आणि मूत्रपिंडांवर चिकटून राहण्यापासून प्रतिबंधित करते. क्रॅनबेरी दैनंदिन आहारासाठी फायदेशीर आहे कारण त्यात सोडियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम देखील कमी आहे. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - किडनी खराब होणे: लक्षणे, कारणे... न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Health

    पुढील बातम्या