मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /जुळ्यांचं शहर! जुळी मुलं का जन्मतात आणि भारतात जुळ्यांचं गाव कुठे आहे?

जुळ्यांचं शहर! जुळी मुलं का जन्मतात आणि भारतात जुळ्यांचं गाव कुठे आहे?

जुळी मुलं

जुळी मुलं

खरं तर इतके जुळे एकावेळी पाहिल्याने नव्या माणसाचं डोकं चक्रावून जाईल. पण इथे ही गोष्ट खूपच सामान्य आहे, कारण हे शहरच जुळ्यांचं आहे. हे शहर जगभरातील जुळ्या मुलांसाठी प्रसिद्ध आहे.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 09 जानेवारी:  तुम्ही तुमच्या नात्यात किंवा मित्र-मैत्रिणींमध्ये अनेक जुळे भाऊ आणि बहिणी पाहिल्या असतील, पण एका शहरात फक्त जुळीच राहतात, असं म्हटलं तर. म्हणजे तुम्हाला आता भेटलेल्या व्यक्तीसारखं कुणीतरी काही वेळाने पुन्हा दिसेल. खरं तर इतके जुळे एकावेळी पाहिल्याने नव्या माणसाचं डोकं चक्रावून जाईल. पण इथे ही गोष्ट खूपच सामान्य आहे, कारण हे शहरच जुळ्यांचं आहे. हे शहर जगभरातील जुळ्या मुलांसाठी प्रसिद्ध आहे. या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय.

  हे शहर नायजेरियामध्ये आहे आणि त्याचं नाव इग्बो-ओरा आहे. येथील लोकसंख्या 2 लाख 78 हजार आहे. पण इथे जुळ्या मुलांचा जन्मदर इतका जास्त आहे की त्याला जगातील जुळ्या मुलांची राजधानी म्हटलं जातं. इथं प्रत्येक 1000 जन्मांमध्ये 158 जन्म जुळ्या मुलांचे होतात. जर जुळ्या जन्मदराची तुलना युरोप आणि अमेरिकेशी केली तर ती खूप जास्त आहे. प्रत्येक 1000 जन्मांमागे युरोपमध्ये 16 जुळ्या आणि अमेरिकेत 33 जुळ्यांचे जन्म होतात.

  हेही वाचा - India's Tallest Elephant : बापरे बाप! नजर पोहोचेपर्यंत लचकेल मान; सर्वात उंच हत्ती तुम्ही पाहिलात का?

  इग्बो-ओरा शहर लागोसपासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी बहुतांश शेतकरी व छोट्या व्यावसायिकांची कुटुंब राहतात. या शहरात जुळी मुलं नसलेली फार कमी कुटुंब आहेत. इथं रस्त्यावर फिरताना एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा पाहिल्यासारखी वाटते, एवढं इथल्या जुळ्याचं प्रमाण आहे.

  यामागचं कारण काय?

  एका अंदाजानुसार, जगाच्या लोकसंख्येमध्ये सुमारे 1.9% जुळी मुलं आहेत. पण इग्बो-ओरामध्ये प्रत्येक कुटुंबात जुळी मुलं आहेत. या भागातील महिलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे इथं जुळी मुले जन्माला येण्याचं प्रमाण जास्त आहे, असं एका अभ्यासातून समोर आलंय.

  लागोस युनिव्हर्सिटीतील एका अभ्यासानुसार इथं महिलांच्या आहारात yams cassava आणि yam tubersचं प्रमाण जास्त आहेत. यामुळे शरीरात एक विशिष्ट प्रकारचं केमिकल किंवा हॉर्मोन विकसित होतं आणि ते गर्भधारणेदरम्यान गर्भाशयात दोन अंड्यांचे फलन करण्यास कारणीभूत ठरतं आणि जुळी मुलं जन्मतात, असं गायनॅकॉलॉजिस्टचं म्हणणं आहे. तिथले लोक मात्र okra leaf or Ilasa soup ला कारणीभूत मानतात. पण, सूप किंवा फळांच्या दाव्यांबद्दल वैज्ञानिकांनी पुष्टी केलेली नाही.

  ट्विन्स फेस्टिव्हल

  इथे दरवर्षी ट्विन्स फेस्टिव्हल भरतो आणि जुळ्यांच्या हजारो जोड्या त्यात सहभागी होतात. यासाठी फ्रान्ससह जवळपासच्या देशातील लोक येतात.

  जगभरात अनेक ठिकाणी आढळतात जुळे

  Igbo-Ora प्रमाणेच जगभरात अनेक ठिकाणी जुळे आढळतात. त्यात ब्राझीलमधील कँडिडो गोडोई, इजिप्तचा अबू अटवा, युक्रेनमधील वेलिकाया कोपान्या आणि भारतातील केरळमधील कोदिन्ही नावाचं एक गाव, ही सर्व जुळ्यांची गावं आहेत.

  केरळमधील गावाची कहाणी

  केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यातील कोदिन्ही गावात 400 जुळी भावंडं राहतात. भारतात 1000 जन्मावर जुळ्यांची सरासरी मात्र फक्त 9 आहे. पण या गावात ती 45 आहे. सीएसआयआर आणि सायंटिफिक लॅबसह अनेक संस्थांच्या पथकांनी दिल्ली-हैदराबाद आणि मुंबईसारख्या शहरांतून येऊन या गावाला भेट दिली आणि इथल्या जुळ्यांच्या जन्मदराबाबत संशोधन केलं. त्यासाठी लोकांचे डीएनए, केस आणि लाळेचे नमुनेही घेण्यात आले. अनुवंशिक कारणांव्यतिरिक्त, इथली हवा, पाणी आणि मातीमधील काही घटकांमुळे जुळ्याचं प्रमाण जास्त आहे असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला.

  जुळं, तिळं आणि चार बाळं

  8100 जन्मामध्ये एकदा तिळ्याचा जन्म होतो. याशिवाय एकावेळी 4,5,6,7,8 मुलांचा जन्म होण्याच्या अनेक दुर्मिळ घटनाही घडतात.

  एकावेळी 6 व 9 मुलांचा जन्म

  यूके लिव्हरपूल, इथं 1983 मध्ये जन्मलेल्या 6 बहिणी हयात असलेल्या पहिल्या महिला सेक्सटुप्लेट्स होत्या. मे 2021 मध्ये, मालीमधील एका महिलेने एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिला. सर्व मुलं ठणठणीत होती. 9 मुलांना जन्म दिल्यामुळे हलिमा नावाची ही 26 वर्षीय महिला जगभर प्रसिद्ध झाली होती. जगभरात एकाचवेळी 9 मुलांच्या जन्माच्या फक्त तीन घटनांची नोंद झाली आहे.

  ऑक्सफॉर्ड विद्यापीठाच्या एका रिपोर्टनुसार, मागच्या काही दशकात जुळ्यांचा जन्म होण्याचं प्रमाण वाढलंय. सध्या जगभरात वर्षभरात 16 लाख जुळी जन्मतात. याचा सर्वाधिक दर आफ्रिकेत असून सर्वात कमी आशिया खंडात आहे.

  जुळी मुलं का जन्मतात?

  एकाच गर्भावस्थेत जन्मलेल्या दोन मुलांना जुळी म्हणतात. जुळी दोन मुलं किंवा दोन मुली, किंवा एक मुलगा आणि एक मुलगी अशी कोणतीही जोडी असू शकते. याचा अर्थ एकाच गर्भातून जन्मलेली मुले जी वैज्ञानिक भाषेत एकयुग्मनज असतात, म्हणजेच ती एकाच युग्मजापासून विकसित होतात जी विभाजित होऊन दोन गर्भाचं रूप धारण करतात. त्यापैकी बहुतेक जुळी दिसायला सारखी असतात. कधीकधी जुळी मुलं शारीरिक रंग-रुपाने वेगवेगळी असतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, ज्या स्त्रिया जास्त वयात आई बनतात, त्या जुळ्या मुलांना जन्म देण्याची अधिक शक्यता असते.

  First published:

  Tags: Science