कोरोना लसीकरणाची तयारी सुरू आहे. सध्या देशभरात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन (Corona vaccine dry Run) सुरू आहे. लवकरच कोरोना लस प्रत्यक्षात दिली जाण्याची शक्यता आहे.
कोरोना लस हवी असल्यास त्यासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. सरकारनं यासाठी CoWIN अॅप तयार केलं आहे. या अॅपवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल.
कोरोना लस देण्यासाठी सरकारनं प्राधान्यक्रम ठरवला आहे. सर्वात आधीत आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. पण जे आरोग्य कर्मचारी नाहीत त्यांना ही लस हवी असल्यास CoWIN अॅपवर नोंदणी करावी लागेल.
गुगल प्ले स्टोर किंवा अॅपल अॅप स्टोरवर हे CoWIN अॅप उपलब्ध असेल. तिथून तुम्हााल डाऊनलोड करावं लागेल.
यामध्ये 5 मॉड्यूल आहेत. प्रशासकीय मॉड्युल, रजिस्ट्रेशन मॉड्युल, वॅक्सिनेशन मॉड्युल, स्वीकृती मॉड्युल आणि रिपोर्ट मॉड्युल. यातील रजिस्ट्रेशन मॉड्युलमध्ये जाऊन तुम्हाला नोंदणी करायची आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात देशातील तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना मोफत लस दिली जाणार आहे. इतर नागरिकांबाबत जुलैपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.