जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / तुम्हीही मुलांकडे मोबाइल देताय? या सवयीमुळे मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, नेमकं काय घडतं?

तुम्हीही मुलांकडे मोबाइल देताय? या सवयीमुळे मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, नेमकं काय घडतं?

तुम्हीही मुलांकडे मोबाइल देताय? या सवयीमुळे मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, नेमकं काय घडतं?

तुम्हीही मुलांकडे मोबाइल देताय? या सवयीमुळे मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, नेमकं काय घडतं?

लहानमुलांमध्ये मोबाइलसह गॅजेट्सच्या वापराचं प्रमाण वाढल्यामुळे त्यांच्यात ऑटिझमचं प्रमाण वाढत आहे. व्हर्च्युअल ऑटिझम ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होतो. व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे काय, ही समस्या रोखण्यासाठी काय करावं, ते सविस्तर जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 29 मे : अलीकडे मोबाइल, टॅब, टीव्ही, कम्प्युटर आणि लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या वापराचं प्रमाण वाढलं आहे. लहान मुलांमध्येही मोबाइलसह या गॅजेट्सच्या वापराचं प्रमाण लक्षणीय आहे. या वस्तूंच्या सवयीमुळे लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका रिपोर्टनुसार, सातत्याने इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरल्याने लहान मुलांमध्ये ऑटिझमचं प्रमाण वाढत आहे. यामुळे त्यांच्या सामाजिक संवाद आणि वर्तणूक कौशल्यावर परिणाम होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. व्हर्च्युअल ऑटिझम ही एक गंभीर समस्या आहे. यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम होतो. व्हर्च्युअल ऑटिझम म्हणजे काय, ही समस्या रोखण्यासाठी काय करावं, ते सविस्तर जाणून घेऊ या. घरात जेव्हा लहान मुलं रडू लागतात किंवा एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करू लागतात तेव्हा पालक त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या हातात मोबाइल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक गॅजेट देतात. हा ट्रेंड अलीकडे सर्वत्र पाहायला मिळतो. या उपायामुळे मूल शांत होतं; पण अनेक तास स्क्रीनसमोर बसल्याने त्याला त्या उपकरणांची सवय लागते. या सवयीतून पुढं आरोग्यविषयक समस्या सुरू होतात. या संदर्भात जगभरात अनेक प्रकारचं संशोधन केलं गेलं. या संशोधनांनुसार, कमी वय असलेल्या मुलांच्या हातात स्मार्टफोन दिल्याने त्यांच्या मानसिक विकासावर परिणाम होतो. मोबाइलसह अन्य गॅजेट्स सतत वापरल्याने किंवा सातत्याने टीव्ही पाहण्याच्या सवयीमुळे मुलांच्या भविष्यावर परिणाम होतो. तसंच यामुळे व्हर्च्युअल ऑटिझमचा धोका वाढतो. गेल्या काही वर्षांत, आपल्या लहान मुलांचं मनोरंजन करण्याकरिता पालक त्यांना गोष्टी सांगणं किंवा गाणी म्हणून दाखवण्याऐवजी त्यांच्या हातात मोबाइल किंवा अन्य गॅजेट्स देताना दिसत आहेत. यामुळे लहान मुलं या व्हर्च्युअल दुनियेत हरवून जात आहेत. याशिवाय सिंगल किंवा न्यूक्लिअर फॅमिलीकडे असलेला कल आणि कुटुंबातल्या सदस्यांमध्ये परस्पर संवादाचा अभाव यामुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    `टाइम्स ऑफ इंडिया`च्या एका वृत्तानुसार, बिहारसह देशभरात गेल्या दशकात मुलांमध्ये व्हर्च्युअल ऑटिझमच्या प्रमाणात तीन ते चार पटींनी वाढ झाली आहे. यामागे आनुवंशिकता हा महत्त्वाचा घटक असला तरी लहान मुलांमध्ये मोबाइलचा अतिवापर यांसह अनेक कारणंही यामागे आहेत. मुजफ्फरपूरचे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. अरुण शाह यांनी सांगितलं, की, `माझ्याकडे दर महिन्याला ऑटिझमच्या दोन केसेस येतात. ऑटिझमवर कोणतंही औषध नाही; पण व्यक्तिमत्त्व विकास, स्पीच आणि स्पेशल एज्युकेशन थेरपी या आजारावर प्रभावी ठरू शकते. यामुळे मुलांची स्थिती सुधारते; मात्र यासाठी खूप वेळ आणि प्रयत्न गरजेचे असतात.` व्हर्च्युअल ऑटिझमची लक्षणं सामान्यपणे चार ते पाच वर्षांच्या मुलांमध्ये दिसतात. सातत्याने मोबाइल, टीव्ही किंवा कम्प्युटरसारखी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरल्याने ही समस्या निर्माण होते. स्मार्टफोनचा जास्त वापर, लॅपटॉप, टीव्ही जास्त वेळ पाहण्याच्या सवयीमुळे मुलांना बोलण्यास, व्यक्त होण्यास त्रास होतो. तसंच समाजातल्या व्यक्तींशी संवाद साधताना अडचण जाणवते. दिल्लीतल्या बीएलके मॅक्स हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. रजनी फर्मानिया यांनी या आजाराबाबत माहिती दिली आहे. डॉ. फर्मानिया म्हणाल्या, की `या स्थितीला आम्ही व्हर्च्युअल ऑटिझम असं म्हणतो. याचा अर्थ मुलांमध्ये ऑटिझम नसतो; पण त्याची लक्षणं दिसून येतात. एक ते तीन वर्षं वयोगटातल्या मुलांना याचा धोका जास्त असतो. सध्याच्या काळात मूल चालायला लागलं, की ते मोबाइल फोनच्या संपर्कात येतं. हे प्रमाण सव्वा वर्ष ते तीन वर्षं वयोगटातल्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं. पालक मुलांपासून बऱ्याचदा दूर राहिल्याने असं करतात. आपण मुलांना वाचायला शिकवतोय असं अनेक वेळा पालकांना वाटतं. त्यांना वाटतं मुलं ए, बी, सी, डी शिकत आहेत; पण प्रत्यक्षात त्यांना गॅजेट्सची सवय लागायला सुरुवात झालेली असते.` `याचा नकारात्मक परिणाम म्हणजे मुलांमध्ये बोलण्याचं कौशल्य विकसित होत नाही. ती गॅजेट्समध्ये गुंतून राहतात. मुलांना वर्तणुकीविषयी समस्या येतात. ती अनेक वेळा रागवतात आणि आक्रमक होतात. अनेक पालक मुलांना रात्रीच्या वेळी गॅजेट्समध्ये गुंतवून ठेवतात यामुळे मुलांच्या झोपेच्या पॅटर्नवर परिणाम होतो. त्यामुळे पालकांना अशा गोष्टी टाळाव्यात. काही वेळा मुलं पालकांकडे टीव्ही पाहण्याचा किंवा मोबाइल देण्याचा हट्ट करतात; पण यामुळे मुलांच्या एकाग्रतेवर परिणाम होतो,` असं डॉ. फर्मानिया यांनी सांगितलं. व्हर्च्युअल ऑटिझमची समस्या असलेली मुलं दुसऱ्यांशी बोलण्यास घाबरतात. त्यांच्याशी डोळ्यांत डोळे घालून बोलत नाहीत. अशा मुलांच्या बोलण्याच्या क्षमतेचा विकास उशिरा होतो. त्यांना माणसांमध्ये मिसळण्यास अडचणी येतात. तसंच मुलांचा आयक्यूही कमी होतो. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. बिंदा सिंह यांनी सांगितलं, की `तुमच्या मुलांमध्ये अशी लक्षणं दिसत असतील तर घाबरण्याऐवजी आणि उशीर करण्यापेक्षा आपल्या मुलाला अतिरिक्त देखभाल, उपचारांची गरज आहे, हे पालकांनी स्वीकारावं. अनेक थेरपीजच्या मदतीने पालक आपल्या मुलांना चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात आणि त्यांना बरं होण्यास मदत करू शकतात.` `मुलांमध्ये व्हर्च्युअल ऑटिझमची लक्षणं दिसत असतील घाबरण्याचं कारण नाही. सर्वांत प्रथम मुलांना मोबाइल, टीव्हीपासून दूर ठेवावं. त्यांचा स्क्रीन टाइम कमी करावा. त्यांचा झोपेचा पॅटर्न सुधारावा. कोरोना काळात घराबाहेर पडणं कमी झालं आणि मुलांना मोबाइलची सवय लागली. खरं तर मुलांना रोखण्यापूर्वी पालकांनी स्वतःमध्ये बदल करावा. पालकांनी फोन दूर ठेवून मुलांसोबत खेळावं, त्यांना वेळ द्यावा. पालकांनी स्वतःचा आणि मुलांचा झोपेचा पॅटर्न सुधारावा,` असं डॉ. रजनी फर्मानिया यांनी सांगितलं. डॉ. फर्मानिया म्हणाल्या, की `वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत मुलांना मोबाइल आणि अन्य गॅजेट्सपासून दूर ठेवलं पाहिजे. मुलांना मोबाइल आणि टीव्ही पाहायला पालकच शिकवतात. दोन ते पाच वर्षं वयोगटातल्या मुलांना तुम्ही थोडा वेळ टीव्ही दाखवू शकता; पण मुलांना टीव्हीची सवय लागू नये यासाठी पालकांनी त्या वेळी मुलांसोबत बसलं पाहिजे. मुलांच्या हातात मोबाइल देणं हे एकप्रकारे त्यांच्यासाठी विष आहे आणि हे विष खूप धोकादायक आहे.`

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात