ग्रीक वर्णमालेनुसार, पुरुषांचे वर्तन पाच श्रेणींच्या आधारे विभागले गेले आहे. यामध्ये अल्फा, बीटा, गामा, ओमेगा आणि डेल्टा यांचा समावेश आहे. पण एक व्यक्तिमत्व या सर्वांपेक्षा वेगळे आहे ज्याला सिग्मा मेल असे म्हणतात. तेव्हा हा सिग्मा मेल म्हणजे नेमकं काय? कोणत्या प्रकारच्या वर्तनाला सिग्मा म्हणतात? हे जाणून घेऊयात. या वर्गातील लोक स्वावलंबी असतात. अनेकदा त्यांना त्यांच्या विचारानुसार काम करायला आवडते. जुन्या सनातनी विचारसरणीला छेद देऊन ते सर्वांच्या हितासाठी काम करण्यास सक्षम आहेत. यापैकी बहुतेक लोक चांगल्या नेत्यासारखी ओळख निर्माण करण्यास सक्षम असतात. सिग्मा मेलच वर्तन : एकाकीपणाला प्राधान्य: या श्रेणीतील लोकांना जास्त मित्र किंवा अधिक लोकांची संगत आवडत नाही. हे लोक स्वतःची कंपनी जास्त महत्वाची मानतात आणि फक्त त्याचा आनंद घेतात. तसेच गरज असताना ते इतरांचाही आधार घेतात. शांत मन: अल्फा आणि बीटा श्रेणीतील पुरुषांमध्ये राग सामान्य आहे, परंतु सिग्मा पुरुष त्यांच्या शांत मनासाठी ओळखले जातात. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत स्वतःला हाताळू शकतात. साधी राहणी: सिग्मा पुरुषाला जास्त शो ऑफ आवडत नाही. असे लोक आपले आयुष्य अतिशय साधेपणाने व्यतीत करतात. त्यांना साधेपणाने जगणे हे त्यांची ओळख वाटते. सिग्मा मेलला लवकर यश मिळते : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ए के विश्वकर्मा यांनी सांगितले की, हे सिग्मा मेल त्यांच्या गोष्टीला घेऊन खूप जिद्दी असतात, तसेच कामात खूप समर्पित राहतात. सिग्मा मेल व्यक्तिमत्त्वाला खूप लवकर यश मिळते कारण त्यांच्यात समाज बदल घडवण्याचे गुण असतात. हे लोक मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







