Home /News /lifestyle /

Carrot Juice Benefits: हिवाळ्यात गाजराच्या रसाचा आहारात करा समावेश; मिळतील हे जबरदस्त फायदे

Carrot Juice Benefits: हिवाळ्यात गाजराच्या रसाचा आहारात करा समावेश; मिळतील हे जबरदस्त फायदे

Carrot Juice Benefits: दिवसातून एक ग्लास गाजराचा रस प्यायला तर त्यातून तुमच्या शरीरात रोजच्या गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन ए मिळते. व्हिटॅमिन ए व्यतिरिक्त, गाजरामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि फॉस्फरस देखील असतात

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 10 डिसेंबर : थंडीच्या मोसमात लाल गाजरं पाहून मनाला ती खाण्याचा मोह आवरता येत नाही. या मोसमात आपण सर्वांनी गाजराचा हलवा खाल्ला असेल. गाजरात भरपूर पोषक घटक असतात. चवीसोबतच गाजर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. गाजराच्या रसामुळे शरीरालाही खूप फायदा होतो. तुम्ही दिवसाची सुरुवात गाजराच्या रसाने केलीत तर त्याचे अनेक फायदे आहेत. दिवसाची सुरुवात गाजराच्या रसाने केल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहते. यामध्ये असलेल्या पौष्टिकतेसोबतच त्याची चव देखील मनाला (Carrot Juice Benefits) प्रसन्न करते. गाजर सहसा लाल आणि केशरी रंगात आढळतात. वेबएमडीच्या बातमीनुसार, केशरी गाजर आणि त्याच्या ज्यूसमध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. तुम्ही दिवसातून एक ग्लास गाजराचा रस प्यायला तर त्यातून तुमच्या शरीरात रोजच्या गरजेपेक्षा जास्त व्हिटॅमिन ए मिळते. व्हिटॅमिन ए व्यतिरिक्त, गाजरामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर आणि फॉस्फरस देखील असतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. गाजर रसाचे फायदे पेशींची झीझ - गाजराच्या रसात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर असतात. यातील अँटिऑक्सिडेंटमुळे आपल्या शरीरातील पेशींचे नुकसान टाळण्यास मदत होते. यासोबतच पेशींच्या नुकसानीमुळे होणाऱ्या इतर आजारांचा धोकाही कमी होतो. डोळ्यांसाठी फायदेशीर - गाजराचा रस आपल्या डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन डोळ्यांच्या लेन्स आणि रेटिनासाठी विशेषतः फायदेशीर आहेत. गाजराचारस निळा प्रकाश शोषण्यापासून देखील प्रतिबंधित करतो. अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून डोळ्यांचे रक्षण करण्यातही त्याची मदत होते. हे वाचा - Camphor Benefit: पूजेसाठीचा कापूर आहे बहुगुणी, या शारीरिक समस्या काही दिवसात होतील गायब रक्तदाब - गाजराचा रस नियमित प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. गाजरात व्हिटॅमिन ई देखील आढळते, ज्यामुळे बीपी नियंत्रित करण्यास मदत होते. बीपीचा त्रास आता सामान्य समस्या झाली आहे. सकस आहार घेतल्यास ही समस्या बर्‍याच प्रमाणात आटोक्यात ठेवता येते. हे वाचा - Parenting Tips: तुमच्या मुलालाही मोबाईलचे व्यसन लागलंय का? या सोप्या टिप्स करून पहा परिणाम हृदयाची समस्या – गाजर खाणे किंवा गाजराचा रस पिणे यामुळेही हृदयाला खूप फायदा होतो. त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health, Health Tips

    पुढील बातम्या