Home /News /lifestyle /

भारतीय अभिनेत्री कान फिल्म फेस्टिव्हलला जाण्यामागे सिनेमा नव्हे, `ही` आहेत कारणं

भारतीय अभिनेत्री कान फिल्म फेस्टिव्हलला जाण्यामागे सिनेमा नव्हे, `ही` आहेत कारणं

Canne's Film festival Red carpet: कान चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या काही अभिनेत्री अशा असतात की ज्यांचा एकही चित्रपट येथे दाखवला जात नाही, मात्र त्यांचे येथील फोटो चर्चेत येतात. काय असतं भारतीय सेलेब्रिटीही तिथे उपस्थिती लावण्यामागचं कारण?

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 14 मे : सेलेब्रिटींच्या दृष्टीनं अ‍ॅवॉर्ड सोहळे, फिल्म फेस्टिव्हल हे एखाद्या पर्वणीप्रमाणे असतात. यावेळी मनोरंजनासोबतच फॅशन, ब्रॅण्ड प्रमोशन आदी गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं. दरवर्षी भारतासह काही देशांमध्ये फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. सर्वसामान्यपणे गाजलेले आणि वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट, चर्चासत्रं, पुरस्कार वितरण अशा गोष्टी फिल्म फेस्टिव्हलमध्ये असतात; पण कान फिल्म फेस्टिव्हलची (Cannes Film Festival) गोष्टच काहीशी न्यारी आहे. हा फेस्टिव्हलमध्ये भारतासह अनेक देशांतील अभिनेत्री (Actress) सहभागी होतात. येथील रेड कार्पेटवर (Red Carpet) केलेलं फोटोशूट हा तर जगभरात चर्चेचा विषय ठरतो. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या काही अभिनेत्रींचा फॅशनेबल लूक (Fashionable Look) इतका हटके असतो, की त्यांना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या काही अभिनेत्री अशा असतात की ज्यांचा एकही चित्रपट येथे दाखवला जात नाही, मात्र त्यांचे येथील फोटो चर्चेत येतात. गेल्या काही वर्षांत ऐश्वर्या राय बच्चन, कंगना राणौत, सोनम कपूर, दीपिका पादुकोण या अभिनेत्रींची कान फिल्म फेस्टिव्हलमधली उपस्थिती विशेष चर्चिली गेली. या अभिनेत्रींचा कान फेस्टिव्हलला जाण्याचा नेमका काय उद्देश असावा, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. त्यामागे काही व्यावसायिक कारणं आहेत. `टीव्ही नाइन हिंदी`ने या विषयीची माहिती दिली आहे. मनोरंजन क्षेत्रातील सर्वांत मोठा इव्हेंट समजला जाणारा कान फिल्म फेस्टिव्हल येत्या 17 मे पासून सुरू होत आहे. भारतातले अनेक सेलेब्रिटी यात सहभागी होत आहेत. अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यंदा कान फिल्म फेस्टिव्हलची ज्युरी मेंबर (Jury Member) असेल. यंदा या फेस्टिव्हलमध्ये भारताकडून प्रसिद्ध लोकगायक मामे खान, अभिनेता नवाझुद्दीन सिद्दिकी, नयनतारा, तमन्ना भाटिया, वाणी त्रिपाठी तसंच दोन वेळा ग्रॅमी विजेता ठरलेला संगीतकार रिकी केज हजेरी लावणार आहे. या फेस्टिव्हलमधले रेड कार्पेटवरचे फोटो दरवर्षी विशेष चर्चेत असतात. या रेड कार्पेटवर भारतीय अभिनेत्री आपल्या अदा आणि सौंदर्याचं प्रदर्शन करताना दिसतात. जितके दिवस हा फेस्टिव्हल चालतो, तितके दिवस रेड कार्पेटवर वॉक करतानाचे आणि विशेष लूकचे फोटो माध्यमांमध्ये येत असतात. खरं तर, काही विशिष्ट कारणांसाठी भारतासह अनेक देशातले सेलेब्स (Celebs) कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत असतात. काही भारतीय अभिनेत्री दरवर्षी कानमध्ये सहभागी होतात. यात प्रामुख्याने ऐश्वर्या राय बच्चन, सोनम कपूर, कंगना राणौतचा समावेश आहे. या अभिनेत्री कोणत्याही चित्रपटासाठी नाही तर ब्रॅण्ड प्रमोशनसाठी (Brand Promotion) या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतात. इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रॅण्ड लॉरियल पेरिस (L'Oreal Paris) हा गेल्या काही वर्षांपासून कान फिल्म फेस्टिव्हलचा ब्युटी पार्टनर (Beauty Parter) आहे. ऐश्वर्या आणि सोनम या ब्रॅण्डच्या भारतातल्या अ‍ॅम्बेसिडर (Ambassador) आहेत. तसेच कंगना ग्रे गुसी व्होडका (Grey Goose Vodka) यांच्या वतीने फेस्टिव्हलमध्ये सहभागी होते. ही कंपनी फेस्टिव्हलची प्रायोजक आहे. कान फिल्म फेस्टिव्हलला गेल्यानंतर या अभिनेत्री त्यांचे ब्रॅण्ड प्रमोट करतात. तसेच यावेळी रेड कार्पेट वॉक आणि फोटोशूटही केलं जातं. जगभरातली माध्यमं या गोष्टी कव्हर करतात. तसेच यानिमित्तानं चित्रपट निर्मात्यांशी संवाद होतो. नवे चित्रपट, नवोदित निर्माते यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश देखील या फेस्टिव्हलमधून साधला जातो. काही अभिनेत्री `फॅशन फॉर रिलीफ` च्या माध्यमातून पर्यावरण आणि मानवी कारणांसाठी निधी जमा करतात यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की ब्रॅण्ड्सच्या बोलावण्यावरून वेगवेगळ्या अभिनेत्री कान फिल्म फेस्टिव्हलला जातात. फेस्टिव्हलमधल्या चित्रपटांशी या अभिनेत्रींचा काहीही संबंध नसतो. जर एखाद्या अभिनेत्रीचा चित्रपट फेस्टिव्हलमध्ये रिलीज होणार असेल किंवा दाखवला जाणार असेल तर तो भाग संपूर्ण वेगळा असतो. कॅटरिना कैफ आणि दीपिका पादुकोण या अ‍ॅम्बेसिडर राहिलेल्या आहेत. लॉरियल या अभिनेत्रींना स्पॉन्सर करतो आणि त्या कंपनीचे ब्युटी प्रोडक्टचा प्रचार करण्यासाठी फेस्टिव्हलमध्ये सहभागी होतात. दरवर्षी लॉरियल यांना एक मॉडेल म्हणून प्रचारासाठी फेस्टिव्हलला येण्याचं आमंत्रण देतो.
    First published:

    Tags: Bollywood actress, Deepika padukone, Film, Film festival, Film star

    पुढील बातम्या