तोंडाची आग, जळजळ होतेय; किचनमधील फक्त 2 पदार्थांनी आराम मिळवा

तोंडाची आग, जळजळ होतेय; किचनमधील फक्त 2 पदार्थांनी आराम मिळवा

तिखट किंवा गरम पदार्थ खाल्ल्याने सामान्यपणे तोंडात त्रास जाणवतो मात्र अनेकांना काहीही न खातादेखील अशी समस्या उद्भवते.

  • Last Updated: Dec 23, 2020 04:28 PM IST
  • Share this:

बर्‍याच वेळा लोकांना तोंडात जळजळ जाणवते. ओठ, गालांच्या आतील भाग, तोंडाचा वरचा भाग, जीभ, हिरड्या आणि संपूर्ण तोंडात तीव्र वेदना आणि आग होते. याच्या इतर लक्षणांमध्ये चव कमी लागणं, कडवट किंवा धातूची चव भासणं, तोंड कोरडं होणं आणि जास्त तहान लागणं यांचा समावेश आहे. तोंडात जळजळ होण्यामुळे झोपेची समस्या, खाण्यात समस्या, नैराश्य, चिंता इत्यादी इतर समस्या उद्भवतात.

myupchar.com शी संबंधित डॉ. व्ही. के. राजलक्ष्मी यांनी सांगितलं की, तोंडाची आग किंवा जळजळ होण्याचा विकार हा एक आजार आहे ज्याची दोन कारणं आहेत. काही अभ्यासांनुसार ही समस्या चव, मेंदू आणि पाठीच्या मज्जातंतूंच्या समस्येशी संबंधित आहे. दुसरं म्हणजे हे पौष्टिक घटकांच्या कमतरतेमुळे असू शकतं. याशिवाय कोरडं तोंड, बनावट दात, पोटात आंबटपणा, अॅलर्जी, अंतःस्रावी रोग, विशिष्ट औषधांचं सेवन किंवा तोंडाच्या इतर आजारांमुळेही जळजळ होऊ शकते.

कसं होतं निदान?

जरी ही समस्या शोधण्यासाठी कोणतीही विशेष चाचणी नसली, तरी डॉक्टरांना आधीचे रोग आणि त्याबद्दल प्रथम निदान करण्यासाठी औषधं याची माहिती असावी. तोंडाचं परीक्षण करा आणि लक्षणं जाणून घ्या. कोणत्याही खाद्यपदार्थात किंवा बनावट दातांना अॅलर्जी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांची अॅलर्जी चाचणी केली जाऊ शकते. रक्ताच्या चाचणीद्वारे आपल्याला थायरॉईड, ग्लुकोज पातळी इत्यादी कारणांबद्दल कल्पना येईल. लाळ चाचणीमध्ये लाळ बनणं कमी झाले आहे का हे तपासलंं जातं. बायोप्सीद्वारे कळू शकते की तेथे बुरशीजन्य किंवा विषाणू संसर्ग आहे की नाही.

जर तोंडाच्या जळजळीचे कारण दुय्यम असेल तर आरोग्याशी संबंधित समस्या त्या अवस्थेस कारणीभूत ठरू शकतात. प्राथमिक कारणामुळे तोंडात होणाऱ्या जळजळीवर अद्याप उपचार नाही, म्हणून यात लक्षणे दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.

आपण घरगुती उपचारांचा अवलंब करू शकता

तोंडाचे अल्सर, ज्वलन आणि सूज दूर करण्यासाठी बर्फ हा एक प्रभावी घरगुती उपाय मानला जातो. बर्फाचा तुकडा रुमालामध्ये गुंडाळा आणि तोंडाच्या जळत्या भागावर लावा. बर्फ थेट त्वचेवर कधीही लावू नका. बर्फ थंड असतो आणि काही काळ होणाऱ्या जळजळीपासून आराम देतो. याशिवाय बोटाच्या सहाय्याने मध लावा आणि 5-10 मिनिटं सोडा. जळजळ शांत होईपर्यंत ही प्रक्रिया पुन्हा दोन वेळा करा. मधात प्रतीसुक्ष्म जैविक गुणधर्म असतात जे शरीराचे सूक्ष्मजंतू नष्ट करतात. हे संक्रमण आणि फोड कमी करतं आणि जळजळीपासून आराम देते.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख – छातीत जळजळ: लक्षणे, कारणे, उपचार ...

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीयमाहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेतस्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठीआरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: December 23, 2020, 3:30 PM IST

ताज्या बातम्या