जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / बापरे! मेंदू कुरतडून कुरतडून घेतो जीव; व्यक्तीच्या डोक्यात घुसला Brain Eating Amoeba

बापरे! मेंदू कुरतडून कुरतडून घेतो जीव; व्यक्तीच्या डोक्यात घुसला Brain Eating Amoeba

बापरे! मेंदू कुरतडून कुरतडून घेतो जीव; व्यक्तीच्या डोक्यात घुसला Brain Eating Amoeba

व्यक्तीच्या मेंदूत ब्रेन इटिंग अमिबा सापडला. ज्यामुळे त्याला दुर्मिळ आणि गंभीर असं इन्फेक्शन झालं.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 13 जुलै : सध्या जगभर कोरोनाव्हायरस थैमान घालतो आहे. त्यासोबत स्वाइन फ्लू, मंकीपॉक्स, मारबर्ग अशा वेगवेगळ्या व्हायरसबाबतही ऐकायला मिळत आहेत. त्यात आता थेट मेंदूत घुसणाऱ्या कीड्याने खळबळ उडवली आहे. एका व्यक्तीच्या डोक्यात मेंदू खाणारा कीडा घुसला आहे. हा कीडा मेंदू कुरतडून कुरतडून माणसांचा जीव घेतो (Brain Eating Amoeba). असे काही परजीवी आहेत, जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे अमिबा. हो तोच अमिबा ज्याच्याबाबत आपण शाळेच्या पुस्तकात शिकलो आहोत. एकपेशी परजीवी. पण हा जीव मानवी शरीरात गेल्यात किती खतरनाक ठरू शकतो याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अमेरिकेतील एका व्यक्तीच्या डोक्यात हा अमिबा घुसला आहे.  नेग्लेरिया फॉवलेरी या ब्रेन इटिंग अमिबामुळे त्याला गंभीर दुर्मिळ इन्फेक्शन झालं. आयोवाच्या थ्री फायर्स स्टेट पार्क बीचवर ही व्यक्ती स्विमिंग करायला गेली. तिथून घरी परतल्यानंतर काही तासांतच तिची तब्येत बिघडली. व्यक्तीने रुग्णालयात धाव घेतली. तेव्हा तिला ब्रेन इटिंग अमिबा नेग्लेरिया फॉवलेरीमुळे दुर्मिळ इन्फेक्शन झाल्याचं निदान झालं. हे वाचा -  कोरोनापेक्षाही खतरनाक Marburg Virus चे संशयित रुग्ण आढळले; WHO कडूनही Alert हा अमिबा इतका खतरनाक आहे की तो मेंदूच्या पेशीही खातो. ज्यामुळे मेंदूत सूज येते आणि जीवही जाऊ शकतो. सीडीसीच्या मते, या इन्फेक्शमुळे मृत्यूचा धोका 97 टक्क्यांपर्यंत वाढतो. अमेरिकेत 1962 ते 2021 सालादरम्यान अशी 154 प्रकरणं समोर आली. त्यापैकी फक्त चौघांचा जीव वाचला. तलाव आणि झऱ्यांमध्ये हा असतो.  सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार या अमिबामुळे दूषित झालेलं पाणी प्यायल्याने काही धोका नाही, मात्र हे पाणी तुमच्या नाकात गेलं तर ते जीवघेणं ठरू शकतं. कारण हा अमिबा नाकावाटे मेंदूत प्रवेश करतो. यामुळे होणाऱ्या इन्फेक्शनच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, भीती वाटणं, मळमळ, अत्यंत थकवा, डोकेदुखी अशी लक्षणं दिसतात. जसजसं इन्फेक्शन वाढतं तसतशी लक्षणंही बदलतात. मान आखडल्यासारखी होते, मानसिक स्थितीवरही परिणाम होतो. शेवटी व्यक्ती कोमातही जातो. हे वाचा -  पावसाळ्यात दमट हवेमुळे वाटतेय आजारी पडण्याची भिती? तज्ज्ञांच्या टिप्स फोलो करुन रोगांना ठेवा दूर या अमिबाचा संसर्ग तपासणारी कुठलीही चाचणी सध्या उपलब्ध नाही आणि रुग्णामध्ये लक्षणं दिसण्यास काही काळ जावा लागतो. तोवर त्याचा मृत्यूही ओढवू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात