Home /News /lifestyle /

हाडांच्या मजबुतीसाठी फक्त कॅल्शियमच हवं हा गैरसमज; या गोष्टींचीही असते आवश्यकता

हाडांच्या मजबुतीसाठी फक्त कॅल्शियमच हवं हा गैरसमज; या गोष्टींचीही असते आवश्यकता

साहजिकच हाडांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे, पण हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारा तो एक छोटासा भाग आहे. तज्ञांच्या मते, कॅल्शियम व्यतिरिक्त हाडांच्या आरोग्यासाठी आणखीन काही गोष्टी आवश्यक आहेत.

    नवी दिल्ली, 20 जानेवारी : कित्येक लोक त्यांच्या हाडांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. तर बऱ्याच लोकांना असे वाटते की, केवळ कॅल्शियमने (calcium) हाडे मजबूत केली जाऊ शकतात. हाडे कमकुवत होऊ नयेत म्हणून लोक कॅल्शियम सप्लीमेंट्स घेण्यासही सुरुवात करतात. मात्र, आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की कॅल्शियम सप्लीमेंट मूत्रपिंड (किडनी) आणि हृदयाला (Heart) हानी पोहोचवू शकतात. साहजिकच हाडांसाठी कॅल्शियम आवश्यक आहे, पण हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारा तो एक छोटासा भाग आहे. तज्ञांच्या मते, कॅल्शियम व्यतिरिक्त हाडांच्या आरोग्यासाठी आणखीन काही गोष्टी आवश्यक आहेत. व्हिटॅमिन डी 3 - कॅल्शियम शरीरात मोठ्या प्रमाणात शोषले जात नाही. म्हणून, कॅल्शियमचे जास्त डोस घेण्याचा उपयोग नाही. कॅल्शियम सोबत व्हिटॅमिन डी 3 घेणं योग्य ठरेल. तज्ञांच्या मते, जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी 3 ची पातळी कमी असेल तर तुम्ही कॅल्शियम शोषून घेऊ शकणार नाही. हे जीवनसत्व शरीरात सूर्यप्रकाशामुळे तयार होत असते. मॅग्नेशियम, जस्त आणि व्हिटॅमिन के 2 - मजबूत हाडांसाठी आपल्याला मॅग्नेशियम, जस्त आणि व्हिटॅमिन के 2 ची देखील आवश्यकता असते. व्हिटॅमिन के 2 हाडांची घनता वाढवण्यास मदत करते. जर तुम्ही संतुलित आहार घेतला तर तुम्हाला हे सर्व घटक मिळू शकतील. हे वाचा - Khadse vs Mahajan: मास्तराच्या मुलाची 1200 कोटींची मालमत्ता कशी? खडसेंच्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले… प्रथिने - कमीतकमी 50 टक्के हाडे ही प्रथिनांनी बनलेली असतात. म्हणजे असे नव्हे की, प्रथिने फक्त स्नायू तयार करण्यासाठी वापरली जातात. आपल्या प्लेटमध्ये 6 वेगवेगळ्या रंगाची फळे आणि भाज्या समाविष्ट करा. आपण आपल्या प्लेटपासून कार्ब्स दूर ठेवून निरोगी राहु शकत नाही. काही लोक वजन कमी करण्याच्या नादात हाडे पूर्णपणे कमकुवत करून टाकतात. हाडांच्या बळकटीसाठी हिरव्या पालेभाज्या, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. हे वाचा - जशास तसे: चीनच्या विमानांची तैवानमध्ये घुसखोरी, छोट्याशा देशानं दिलं सडेतोड उत्तर व्हिटॅमिन सी - सामान्यतः लोकांना असे वाटते की व्हिटॅमिन सी केवळ रोग प्रतिकारशक्ती वाढवते. परंतु, ते हाडांच्या पेशी देखील सुधारते. संत्रा, लिंबूपाणी, शिमला मिरची, स्ट्रॉबेरी आणि ब्रोकोलीच्या माध्यमातून आपल्या आहारात व्हिटॅमिन सी वाढवण्याचा प्रयत्न करा.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Healthy bones

    पुढील बातम्या