बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणजेच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. सोनाक्षी सिन्हाने आपले काही एक्सरसाईझचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती अतिशय सडपातळ दिसत आहे.
सोनाक्षी सिन्हाचा हा नवा लुक पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर चाहत्यांनाकडून या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतं आहे.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील अभिनयाचे गुण पुरेपूर सोनाक्षी सिन्हात उतरलेले दिसतात.
सोनाक्षी सध्या आपला नवा लुक एन्जॉय करत आहे आणि तिच्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठी पसंतीदेखील मिळत आहे.