• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • दिवाळीत मिठाई, फराळ खाऊन तब्येत बिघडलीय का? या सोप्या पद्धतीनं करा body detox

दिवाळीत मिठाई, फराळ खाऊन तब्येत बिघडलीय का? या सोप्या पद्धतीनं करा body detox

डाएट प्लॅन कितीही असला तरी लोक या काळात खाताना हात ढिला सोडतात. अशा परिस्थितीत जास्त कॅलरी, सॅच्युरेटेड फॅट आणि रिफाइंड साखर असलेले पदार्थ आपले आरोग्य बिघडवतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : दिवाळी, भाऊबीजसारखे (festival season) सण मिठाईशिवाय पूर्ण होत नाहीत. मिठाईबरोबरच स्वादिष्ट, गोड पदार्थांचीही प्रत्येक घरात रेलचेल असतेच. डाएट आहार कितीही असला तरी लोक या काळात खाताना हात ढिला सोडतात. अशा परिस्थितीत जास्त कॅलरी, सॅच्युरेटेड फॅट आणि रिफाइंड साखर असलेले पदार्थ आपले आरोग्य बिघडवतात. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यानंतर त्यांना डिटॉक्स (body detoxification) करणं देखील आवश्यक आहे. सण-उत्सवात अशा गोष्टी खाऊन तुमचीही तब्येतही बिघडली असेल, तर शरीर डिटॉक्सिफिकेशनच्या (detoxification) काही उत्तम पद्धतींनी आराम मिळू शकतो. सकाळी कोमट पाणी प्या - तुमच्या दिवसाची सुरुवात लिंबूपाण्याने करा. एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा लिंबाचा रस टाका. लिंबू पाणी शरीराला लवकर डिटॉक्स करते. प्रथिने शरीर स्वच्छ करेल - वजन कमी करण्यात प्रोटीन हे सर्वात प्रभावी मानले जाते. प्रथिने देखील स्नायू तयार करण्यास मदत करतात. अंडी, चिकन, बीन्स, मसूर आणि शेंगा यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. तुमची भूक नियंत्रित ठेवण्यासोबतच ते कॅलरीजचे प्रमाणही कमी करतात आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. फायबरपासून नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन- फायबर हे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन एजंट मानले जाते. तुमच्या आहारात भरपूर फायबरचा समावेश करा. यासाठी भरपूर काकडी, गाजर, लेट्युस, स्प्राउट्स आणि हिरव्या पालेभाज्या खा. यामुळे तुमचे शरीर आतून मजबूत होईल. एकाच वेळी जास्त खाऊ नका- असा प्लॅन बनवा ज्यामध्ये थोडे थोडे करून अनेक वेळा खा. अशा प्रकारे तुम्हाला भूक कमी लागेल आणि तुम्ही जास्त खाण्याची सवय टाळाल. शरीर हायड्रेटेड ठेवा- सण-उत्सवात अनहेल्दी अन्न खाल्ल्यानंतर शरीर डिटॉक्स करणं फार महत्वाचं आहे आणि यासाठी पाण्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. दिवसभरात ८-९ ग्लास पाणी प्या, यामुळे तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर निघून जातील. पाणी प्यायल्याने तुम्हाला उर्जा जाणवेल. हायड्रेटेड राहिल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि झोपही चांगली लागते. हे वाचा - कार घ्यायची असेल तर ही संधी सोडू नका! Hyundai च्या अनेक कार्सवर मोठी सूट ताजी फळे आणि भाज्या - तुमच्या आहारात कर्बोदके आणि चरबीसारख्या गोष्टींचा समावेश करा. तुमचा आहार ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, शेंगा, काजू आणि बियांनी समृद्ध करा. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. मांस टाळणे- सण संपल्यानंतर तुमच्या पचनसंस्थेवर कमीत कमी दबाव टाका. यासाठी तुमचे जेवण हलके ठेवा. अन्नामध्ये लाल मांस टाळा आणि वनस्पती प्रथिनांचे प्रमाण वाढवा. हे वाचा - IND vs NZ : T20 World Cup मधले 8 खेळाडू आऊट, रोहित कॅप्टन, पण विराटच्या RCB ला लॉटरी! चांगली झोप घ्या- झोपेच्या कमतरतेचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी चांगली झोप गरजेची आहे. झोपण्यापूर्वी एक कप हळद दुधात थोडी दालचिनी, आले पावडर आणि गूळ घाला. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्हाला चांगली झोप लागेल.
  Published by:News18 Desk
  First published: