मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रक्ताच्या गुठळ्या होण्याची कारणं काय? कोरोना झालेल्यांना का होतोय हा त्रास

रक्ताच्या गुठळ्या होण्याची कारणं काय? कोरोना झालेल्यांना का होतोय हा त्रास

रक्ताच्या गुठळ्या का होतात

रक्ताच्या गुठळ्या का होतात

कोविड-19 च्या नंतरच्या परिणामांवर केलेल्या अभ्यासानुसार, ज्यांना विषाणूची लागण होऊन गेली आहे, त्यांना सुमारे एक वर्षानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका जास्त असल्याचं आढळून आलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : शरीरात रक्तप्रवाह सुरळीत असणं खूप गरजेचं असतं. शरीरात रक्ताची गुठळी तयार झाल्यास शरीराला अनेक प्रकारे धोका होऊ शकतो. रक्ताच्या गुठळीला ब्लड क्लॉट असंही म्हणतात. रक्ताची गुठळी तयार होते, तेव्हा रक्त घट्ट होऊ लागतं. त्याला थ्रोम्बोसिस असंदेखील म्हणतात. दुखापत झाल्यास ब्लड क्लॉटिंग होणं आवश्यक असतं. कारण त्यामुळे शरीरातून जास्त रक्तस्राव होण्यापासून बचाव होतो. परंतु जेव्हा हे क्लॉटिंग शरीराच्या आतल्या शिरांमध्ये होऊ लागतं, तेव्हा ते धोकादायक बनते. शिरांमधलं ब्लड क्लॉटिंग धोकादायक असतं. यामुळे हार्ट अ‍ॅटॅक आणि हार्ट स्ट्रोक येऊ शकतो. या संदर्भात माहिती देणारं वृत्त 'आज तक'ने दिलं आहे.

रक्ताच्या गुठळ्यांचे अनेक प्रकार आहेत. सामान्यपणे पायाच्या खालच्या भागात ब्लड क्लॉटिंग होण्याचे प्रकार दिसून येतात; मात्र हात, हृदय, पेल्व्हिस, फुफ्फुस, मेंदू, पोट आणि शरीराच्या इतर भागांमध्येही ते होऊ शकतं. याशिवाय रक्तवाहिन्या आणि धमन्यांमध्येही रक्ताच्या गुठळ्या होऊ शकतात.

रक्ताच्या गुठळ्या होणं हा कोविड-19च्या दुष्परिणामांपैकी एक आहे. परिणामी हृदयविकाराचा धोका वाढतो. कोविड-19 च्या नंतरच्या परिणामांवर केलेल्या अभ्यासानुसार, ज्यांना विषाणूची लागण होऊन गेली आहे, त्यांना सुमारे एक वर्षानंतर रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका जास्त असल्याचं आढळून आलं आहे.

रक्तवाहिन्या आणि धमन्यांद्वारे शरीरात रक्तप्रवाह होतो. धमन्यांमध्ये बनणाऱ्या ब्लड क्लॉटला आर्टेरियल क्लॉट म्हणतात. धमनीच्या गुठळ्यांमुळे वेदना आणि अर्धांगवायू होऊ शकतो. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकही येऊ शकतो. शिरांमधल्या ब्लड क्लॉटला व्हेनस क्लॉटही म्हणतात. अशा प्रकारचं क्लॉटिंग हळूहळू वाढतं आणि ते जीवघेणं ठरू शकतं. मेंदूमध्ये रक्ताची गुठळी तयार झाल्यामुळे रक्तप्रवाह थांबतो. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.

शरीरात ब्लड क्लॉट झाल्यास अनेक प्रकारची लक्षणं दिसतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा.

ब्लड क्लॉटिंगची लक्षणं

त्वचेचा रंग बदलणं - कोणतीही गुठळी हात किंवा पायाच्या शिरा बंद करत असेल, तर ते लाल किंवा निळ्या रंगाचे दिसतात. शिरा डॅमेज झाल्याने त्वचा फिकी पडते.

सूज - जेव्हा रक्ताची गुठळी शरीरात रक्ताचा प्रवाह रोखते किंवा कमी करते तेव्हा ते पेशींमध्ये जमा होऊ लागते. त्यामुळे सूज येते. हातामध्ये किंवा पोटातही रक्ताची गुठळी तयार होऊ शकते. ते बरं झाल्यानंतर तीनपैकी एका व्यक्तीमध्ये सूज कायम राहते आणि काही वेळा रक्तवाहिन्यांना नुकसान झाल्यामुळे वेदना आणि जखमाही होऊ शकतात.

हे वाचा - वजन कमी करायचंय? मग हे ट्रेंडी पदार्थ करतील मदत, वाचा सविस्तर

छातीमध्ये तीव्र वेदना - अचानक छातीमध्ये तीव्र वेदना होत असतील, तर शरीरात ब्लड क्लॉट फुटला असू शकतो. तसंच धमन्यांमधल्या ब्लड क्लॉटमुळे हार्ट अ‍ॅटॅक येण्याचंही ते लक्षण असू शकतं. यामुळे डाव्या हातात वेदना जाणवू शकतात.

श्वास घेण्यास अडचण - श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते फुफ्फुस आणि हृदयातील क्लॉटिंगचे संकेत असू शकतात. यामुळे हार्टबीट वाढून शुद्ध हरपू शकते.

हे वाचा - Ready To Eat पदार्थांमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका;संशोधकांचा धक्कादायक खुलासा

सतत खोकला येणं - सतत येणारा खोकलादेखील ब्लड क्लॉटचा संकेत असू शकतो. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, छातीत दुखण्यासह कोरडा खोकला येत असेल किंव बलगममध्ये रक्त येत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायला हवं.

First published:

Tags: Blood donation, Health, Health Tips