जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / 'माझ्यामुळे भारताला मिळाली स्वदेशी कोरोना लस', भाजप खासदारानं घेतलं श्रेय

'माझ्यामुळे भारताला मिळाली स्वदेशी कोरोना लस', भाजप खासदारानं घेतलं श्रेय

'माझ्यामुळे भारताला मिळाली स्वदेशी कोरोना लस', भाजप खासदारानं घेतलं श्रेय

“भारतीयांना विदेशी कोरोना लशीसाठी Guinea pigs बनवलं जात होतं, मी वेळीच हस्तक्षेप केला म्हणून बरं झालं”, असं या खासदारानं म्हटलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 02 जानेवारी : भारतातील पहिल्या स्वदेशी कोरोना लशीच्या (made in india corona vaccine) आपात्कालीन वापराला (emergency use) मंजुरी देण्यात आली. याचं श्रेय मात्र भाजप खासदार (bjp mp) सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी घेतलं आहे. माझ्यामुळे भारताला कोरोना लस मिळाली नाहीतर भारतीयांना तर विदेशी कोरोना लशीसाठी Guinea pigs बनवलं जात होतं, असं सुब्रमण्यम स्वामी  म्हणालेत. भारतात दोन कोरोना लशींच्या आपात्कालीन वापराला तज्ज्ञांच्या समितीनं परवानगी दिली आहे. आता DGCI कडून अंतिम निर्णय येणं बाकी आहे. सर्वात आधी ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनकाची कोरोना लस, जी कोविशिल्ड म्हणून भारतात ओळखली जाते. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं याचं उत्पादन घेतलं आहे. 1 जानेवारीला या लशीला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी यावर आक्षेप घेतला होता.

जाहिरात

“आत्मनिर्भर भारताला फक्त भारत बायोटेकनं तयार केलेली लसच मिळायला हवी, दुसरी कोणतीच लस नाही. आम्ही काही महिने प्रतीक्षा करू शकतो. विदेशी भारतीयांचा वापर  Guinea pigs म्हणून करत आहे. यामुळे भारताच्या सुरक्षेचाही प्रश्न आहे. यासाठी फक्त आत्मनिर्भर हाच एक पर्याय आहे”, असं ट्विट सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं होतं.

“भारत बायोटेकनं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलमध्ये  13, 000 व्यक्तींवर अभ्यास केला आहे. इंग्रजी लशीची फक्त 1200 लोकांवर चाचणी करण्यात आली आहे. तरीही इंग्रजी लशीबाबत करार करून स्वदेशी लशीला एका बाजूला सारण्यात आलं, असंही स्वामी म्हणाले” हे वाचा -  BREAKING: भारताला मोठं यश; पहिली स्वदेशी लस COVAXIN ला मिळाली मंजुरी दरम्यान आता स्वदेशी कोरोना लस कोवॅक्सिनला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे याचं श्रेय सुब्रमण्यम स्वामी यांनीच घेतलं आहे. लशीला परवानगी मिळताच त्यांनी ट्विट केलं आहे.

जाहिरात

“मी योग्य वेळी हस्तक्षेप केला म्हणून बरं झालं. पण तरी अजून खेळ संपलेला नाही”, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले. हे वाचा -  BJP ची लस नको रे बाबा! माजी मुख्यमंत्र्यांनी Covid-19 लसीकरणाला दिला नकार… भारतात 1 जानेवारीला ऑस्कफोर्ड-अॅस्ट्राझेनका-पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड (Covishield) लशीला आणि 2  जानेवारीला भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला  परवानगी देण्यात आली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं  (Central Drugs Standards Control Organisation) च्या तज्ज्ञांच्या समितीनं हा हिरवा कंदील दिला आहे. या समितीनं आता DCGI कडे शिफारस केली आहे. आता DCGI निर्णयाची सर्वांना प्रतीक्षा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात