मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

अरे देवा! आता पाण्यातून नव्या महासाथीचं संकट; आजाराचे 11 बळी

अरे देवा! आता पाण्यातून नव्या महासाथीचं संकट; आजाराचे 11 बळी

पहिल्यांदाच एका सागरी जीवाचा बर्ड फ्लूमुळे (Bird flu) मृत्यू झाला आहे.

पहिल्यांदाच एका सागरी जीवाचा बर्ड फ्लूमुळे (Bird flu) मृत्यू झाला आहे.

पहिल्यांदाच एका सागरी जीवाचा बर्ड फ्लूमुळे (Bird flu) मृत्यू झाला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : कोरोना महासाथ (Coronavirus) अद्यापही थैमान घालते आहे. हवा, पृष्ठभाग यामार्फत हा आजार पसरतो आहे. अशात आता पाण्यातूनही एका महासाथीच्या संकटाची टांगती तलवार आहे. पाण्यामध्ये बर्ड फ्लू (Bird flu) संसर्गाचं दुर्मिळ प्रकरण नोंदवलं गेलं आहे. यामुळे 11 बळी गेले आहेत. तीन समुद्री प्राण्यांसह एका कोल्ह्याचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे (Seal died from bird flu).

इंग्लंडमधील वन्यजीव पुनर्वसन केंद्रात पाच हंस, पाच समुद्री सील आणि कोल्ह्याचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. यामुळं जगभरातील शास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ काळजीत पडले आहेत. हा रोग सागरी प्राण्यांमध्ये पसरू लागला तर, जगात साथीच्या रोगाची नवी लाट येऊ शकते आणि ही खूप धोकादायक असू शकते.

हा संसर्ग वर्ष 2020 च्या अखेरीस पसरला होता. परंतु तो अद्याप उघड करण्यात आला नव्हता. कारण शास्त्रज्ञ त्यावर अभ्यास करत होते. तसेच, इंग्लंड सरकारला कोरोनाच्या महामसाथीत सापडलेल्या जगाला आणखी घाबरवण्याची इच्छा नव्हती, असं सांगण्यात आलं आहे. सागरी सील, कोल्हा हे सस्तन प्राणी असून बर्ड फ्लू सस्तन प्राण्यांना सहजतेनं संक्रमित करत नाही. परंतु, सील आणि कोल्ह्याचा या आजारानं मृत्यू झाल्यानंतर शास्त्रज्ञ काळजीत पडले होते. त्यांचा अभ्यास नुकताच जर्नल इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये प्रकाशित झाला आहे.

या प्राण्यांमध्ये आढळलेल्या बर्ड फ्लूच्या स्ट्रेनची तपासणी केली असता या विषाणूमध्ये उत्परिवर्तन (mutation) झाल्याचं आढळून आलं. हा H5N8 विषाणू (virus) होता. हा विषाणू पक्ष्यांमधून सस्तन प्राण्यांमध्ये संक्रमित झाला. तथापि, अशा प्रकारचं उत्परिवर्तन सामान्यतः मानवांशी संबंधित आहे. परंतु, गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये मानवाच्या संसर्गाशी संबंधित एकही प्रकरण समोर आलं नाही. या प्राण्यांच्या मृत्यूनंतर बर्ड फ्लूचा विषाणू कोणत्याही मनुष्यापर्यंत पोहोचला नाही.

हे वाचा - 1 लाखाच्या गुंतवणुकीत सुरु करा नवा व्यवसाय; महिन्याला होईल इतक्या लाखांचा नफा

दरम्यान, या अभ्यासात असं सांगितलं गेलंय की, H5N8 विषाणू सस्तन प्राण्यांसाठी देखील खूप धोकादायक आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांमध्ये होणाऱ्या आजारांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. सागरी जगतात एक प्राणी दुसऱ्याला खातो. याचा अन्नसाखळीवर परिणाम होऊन हा विषाणू वेगानं पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. समुद्री मासे या स्ट्रेननं संक्रमित झाल्यास संपूर्ण जगालाच धोका निर्माण होऊ शकतो.

बर्ड फ्लूचा विषाणू केवळ पक्ष्यांना संक्रमित करतो. तो इतर जीवांमध्ये सहजासहजी पसरत नाही. मानवांनाही संक्रमित करत नाही. परंतु क्वचित प्रसंगी, बर्ड फ्लूचे काही प्रकार मानवांनाही संक्रमित करू शकतात. हे स्ट्रेन H5N1, H7N9, H5N6 आणि H5N8 आहेत. यापैकी H5N8 चा मानवी संसर्ग पहिल्यांदा या वर्षी फेब्रुवारीमध्ये नोंदवला गेला. रशियातील एका पोल्ट्री फार्ममधील काही कामगारांना या विषाणूचा संसर्ग झाला होता.

आयोवा स्टेट युनिव्हर्सिटीच्या मते, बर्ड फ्लूचे काही दुर्मीळ प्रकार इतर जीवांनाही संक्रमित करू शकतात. उदाहरणार्थ, मांजरी, डुकरे, घोडे, कुत्री आणि पोपट. या जीवांमध्ये बर्ड फ्लू सहजासहजी पसरत नाही. तसंच, समुद्री जीवांबद्दल कुठेही उल्लेख नव्हता. ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान इंग्लंडमधील वन्यजीव केंद्रात पाच हंस आणले गेले होते. त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं तपासणीत उघड झालं. नोव्हेंबरच्या अखेरीस त्या सर्वांचा मृत्यू झाला.

हे वाचा - Explained: जुन्या मौल्यवान वारसा असलेल्या वस्तू त्या-त्या देशाला कशा परत केल्या जातात? काय आहे प्रक्रिया? वाचा

एका आठवड्यानंतर 5 ते 6 डिसेंबर 2020 पर्यंत, चार सामान्य सील, एक राखाडी सील आणि एक कोल्हा बर्ड फ्लूने संक्रमित आढळला. त्यांचाही काही दिवसांतच मृत्यू झाला. उर्वरित प्राण्यांचीही वन्यजीव केंद्रात तपासणी करण्यात आली. पण इतर कोणत्याही जीवामध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग झाला नाही. बर्ड फ्लूमुळे मरण पावलेल्या प्राण्यांच्या मृतदेहामधून काही नमुने घेण्यात आले. त्यांची तपासणी केली असता या सर्वांना H5N8 स्ट्रेनची लागण झाल्याचं समजलं.

बर्ड फ्लूच्या H5N8 स्ट्रेनमध्ये आढळणारं D701N हे उत्परिवर्तन आहे. हे उत्परिवर्तन कोणत्याही सस्तन प्राण्यांच्या शरीराला बर्ड फ्लूने संक्रमित करू शकते. पण ते अत्यंत दुर्मीळ असते. कारण सामान्यत: बर्ड फ्लूचा विषाणू पक्ष्यांकडून जीवांच्या इतर प्रजातींमध्ये जात नाही. या मृत सीलमध्ये आधीच फुफ्फुसाचा विकार (Lungworm) होता. यामुळं त्यांना या संसर्गाची सहजपणे लागण झाली. तर, कोल्हीही दुबळी झाली होती. तिची रोगप्रतिकारक शक्ती विषाणूचा हल्ला थांबवू शकली नाही.

हे वाचा - धक्कादायक! कोरोना लशीऐवजी सापाचा दंश; लसीकरणावेळी महिलेने चक्क कोब्राच बाहेर काढला

बर्ड फ्लूच्या H5N8 स्ट्रेनसह संक्रमण दुर्मीळ आहे. परंतु, परिस्थिती अनुकूल असेल तर हा स्ट्रेन इतर जीवांच्या अनेक प्रजातींना संक्रमित करू शकतो. हा काही आठवड्यांत सस्तन प्राण्यांना मारू शकतो. वन्यजीव केंद्राच्या कर्मचाऱ्यांना कोविड-19, बर्ड फ्लू किंवा फ्लूचा कशाचाही संसर्ग नव्हता. यानंतर, असा संसर्ग कधीच दिसला नाही.

First published:

Tags: Bird flu, Health, Health Tips, Lifestyle