मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

बिहारी गायिकेच्या गळ्यातून उमटले 'हे सुरांनो चंद्र व्हा', मैथिली ठाकूरचा VIDEO काही मिनिटांत VIRAL

बिहारी गायिकेच्या गळ्यातून उमटले 'हे सुरांनो चंद्र व्हा', मैथिली ठाकूरचा VIDEO काही मिनिटांत VIRAL

स्वर्गीय सूर म्हणजे काय याची प्रचिती या मूळच्या बिहारी गायिकेचा आवाज ऐकून येईल. रिअॅलिटी शोमधून पुढे आलेली मैथिली ठाकूर (Maithili Thakur) ही नव्या पिढितली अतिशय लोकप्रिय गायिका. तिचा नवा मराठी नाट्यगीताचा VIDEO पाहिला का?

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 फेब्रुवारी : मैथिली ठाकूर (Maithili Thakur) ही नव्या पिढीतली एक आश्वासक आणि लोकप्रिय गायिका. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मैथिलीनं आपल्या प्रतिभेच्या जोरावर जगभरातल्या रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. मैथिली ओळखली जाते ती लोकसंगीत आणि भक्तिगीतांसाठी.

मैथिलीनं गुरुवारी संध्याकाळी एक व्हिडिओ (video) पोस्ट केला आहे. अवघ्या काही मिनिटांत तो व्हायरल झाला. यात तिने मराठीतलं लोकप्रिय नाट्यगीत 'हे सुरांनो चंद्र व्हा...' गायलं आहे. मैथिलीनं ... या व्हिडिओमध्ये ही भावपूर्ण रचना (Marathi song) अतिशय समरसून गायली आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेलं गीत मैथिलीनेही तितक्याच आत्मीयतेनं आणि जीव लावून गायलं आहे. मैथिली अमराठी आहे. मात्र तिनं मराठी उच्चारांवरही खूप मेहनत घेतल्याचं जाणवतं आहे. या व्हिडिओला सहा हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. मुळात हे सुरांनो.. हे गीत शास्त्रीय संगीतावर आधारित आणि अवघड सुरावटींचं,  पण मैथिलीच्या गळ्यातून ते अलगद उतरतं आणि हृदयापर्यंत पोहोचतं.

अर्थात, मैथिलीनं मराठी गाणं (Marathi Song) गाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं मराठीतली भक्तीगीतं आणि अभंग गात मराठी माणसांची मनं जिंकली आहेत. यात 'माझे माहेर पंढरी...', 'कानडा राजा पंढरीचा...', 'अबीर गुलाल..', 'सुंदर ते ध्यान...' या गीतांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल.

" isDesktop="true" id="518921" >

मैथिली सोशल मीडियावर (social media) कायमच सक्रिय असते. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये मैथिलीनं आपला एक निर्णय जाहीर केला होता. 'मला बॉलिवुडमध्ये (Bollywood) गाण्याच्या अनेक ऑफर्स सतत येत असतात. मात्र आपण कुठलीही ऑफर स्वीकारणार नाही. आपण पारंपरिक लोकसंगीत (folk music) गाणंच सुरू ठेवणार आहोत.' हा तो निर्णय होता. यावर सोशल मीडियावर अनेकांनी पाठिंबा दर्शवणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. इन्स्टाग्रामवर (Instagram) मैथिलीचे 2.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.

मैथिली मूळ बिहारची (Bihar). बेनीपट्टी नावाच्या लहानशा गावात ती जन्मली. ती पहिल्यांदा प्रकाशझोतात आली, ती 2011 साली 'रायझिंग स्टार' या रिऍलिटी शो मध्ये भाग घेतल्यावर. त्यानंतर इंडियन आयडॉल ज्युनियरमध्येही (Indian idol junior) ती चमकली. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती रायझिंग स्टार या शोनंतर. युट्युब चॅनलच्या (youtube channel) माध्यमातून आता ती आपली उठावदार गायकी सादर करते. इथं तिचे 2.5 मिलियनहून अधिक फॉलोअर्स (followers) आहेत. तिचे दोन भाऊ रिशव आणि अयाची तिला साथसंगत करत असतात.

First published:

Tags: Instagram, Singer, YouTube Channel