मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Men's health : चांगल्या सेक्स लाईफसाठी पुरुषांनी या गोष्टी नक्की खाव्यात; आहेत अनेक फायदे

Men's health : चांगल्या सेक्स लाईफसाठी पुरुषांनी या गोष्टी नक्की खाव्यात; आहेत अनेक फायदे

टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हे पुरुषांमध्ये आढळणारे सेक्स हार्मोन (Sex Hormone) आहे. हे संप्रेरक प्रजनन क्षमता, लैंगिक कार्य, हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. वाढत्या वयानुसार, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते.

टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हे पुरुषांमध्ये आढळणारे सेक्स हार्मोन (Sex Hormone) आहे. हे संप्रेरक प्रजनन क्षमता, लैंगिक कार्य, हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. वाढत्या वयानुसार, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते.

टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हे पुरुषांमध्ये आढळणारे सेक्स हार्मोन (Sex Hormone) आहे. हे संप्रेरक प्रजनन क्षमता, लैंगिक कार्य, हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. वाढत्या वयानुसार, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते.

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : टेस्टोस्टेरॉन (Testosterone) हे पुरुषांमध्ये आढळणारे सेक्स हार्मोन (Sex Hormone) आहे. हे संप्रेरक प्रजनन क्षमता, लैंगिक कार्य, हाडे आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. वाढत्या वयानुसार, टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होते. काही वैद्यकीय परिस्थिती किंवा वाईट जीवनशैलीदेखील या संप्रेरकावर परिणाम करते. काही खाद्यपदार्थ टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासाठी मदत करतात, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जाणून घेऊ कोणते आहेत हे (Foods for good sex life) खाद्यपदार्थ..

टूना फिश - टेस्टोस्टेरॉन उत्पादनासाठी व्हिटॅमिन डी (Vitamin D) आवश्यक आहे. टूना फिशमध्ये (Tuna Fish) ते मोठ्या प्रमाणात आढळतं. टूना फिश हृदयासाठीही खूप चांगला असतो. त्यात भरपूर प्रथिनं (Protine) आणि खूप कमी कॅलरीज (Calories) असतात. हा मासा नैसर्गिक पद्धतीने टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचे काम करतो. याशिवाय सॅल्मन, सार्डिन आणि शेल फिशसुद्धा टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचे काम करतात. तुम्ही ते आठवड्यातून 2-3 वेळा खाऊ शकता.

व्हिटॅमिन डी असलेलं कमी चरबीयुक्त दूध (Low Fat Skimmed Milk) - दूध हे प्रथिनं आणि कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. हाडं मजबूत करण्याव्यतिरिक्त, ते पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन वाढवण्याचं काम करतं. व्हिटॅमिन D नं समृद्ध असलेलं दूध निवडताय? मग कमी चरबीयुक्त स्किम्ड दूध (Low Fat Skimmed Milk) हा एक चांगला पर्याय आहे. त्यात दुधासारखेच (Whole Milk) पोषक घटक असतात.

अंड्यातील पिवळं बलक - अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये भरपूर व्हिटॅमिन डी असतं. हे काही प्रमाणात कोलेस्टेरॉल वाढवण्याचं काम करत असलं तरी पांढऱ्या भागापेक्षा अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये जास्त पोषक घटक आढळतात. अंड्यातील पिवळं बलक टेस्टोस्टेरॉन वाढवतं. तुम्हाला आधीपासून कोलेस्टेरॉलची समस्या नसेल तर, तुम्ही बिनधास्तपणे दररोज एक संपूर्ण अंडं खाऊ शकता.

हे वाचा - तुमच्यासाठी कायपण!’त्या’सीनसाठी झाडावर लटकला जयदीप; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मालिकेत अभिनेत्याने घेतली मोठी जोखीम

डाळिंब- डाळिंब प्रजनन क्षमता आणि लैंगिक कार्यामध्ये खूप प्रभावी असल्याचं दिसून आलंय. त्याचे अँटिऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात. ताण कमी करण्यासाठीदेखील डाळिंब काम करते. 2012 च्या एका अभ्यासात असे दिसून आलंय की डाळिंब पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवू शकते. डाळिंबाचा रस टेस्टोस्टेरॉनवर अधिक प्रभावी आहे. या व्यतिरिक्त, हे मूड आणि रक्तदाब दोन्ही सुधारते.

फोर्टिफाइड धान्यं (फोर्टीफाइड सीरील्स - Fortified Cereals) - अंडी प्रथिनांनी समृद्ध असतात आणि टेस्टोस्टेरॉनच्या समस्येत देखील मदत करतात. मात्र, आपल्याला कोलेस्टेरॉलची समस्या असल्यास, आपण आपल्या आहारात फोर्टिफाइड धान्यांचा समावेश करू शकता. काही फोर्टिफाइड धान्यांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर असते. आपल्या दिवसाची सुरवात फोर्टिफाइड धान्यांच्या न्याहारीनं करा. यामुळं तुमच्या टेस्टोस्टेरॉनची पातळीही वाढेल.

बीन्स- पुरुषांच्या हार्मोन्सशी संबंधित कोणत्याही समस्येवर बीन्स फायदेशीर आहेत. शेंगदाणे,चणे, छोले, मसूर आणि भाजलेले बीन्स हे सर्व झिंकचे चांगले स्रोत मानले जातात. टेस्टोस्टेरोन वाढवण्यासोबतच यातून तंतुमय पदार्थ (फायबर - Fiber) आणि प्रथिनंही शरीरात भरपूर प्रमाणात पोहोचतात. तसंच, हृदयरोगापासून संरक्षण होतं.

हे वाचा - YouTube वापरकर्त्यांना Google ने केले सावधान: कशापद्धतीने केले जात आहे यूटयुब अकाउंटस हॅक?

आले- आलं हे शतकानुशतकं अन्न किंवा औषधांमध्ये वापरलं जातं. संशोधनानुसार, आलं पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते. 2012 च्या एका अभ्यासात असं आढळून आलंय की 3 महिने आल्याचं सेवन केल्यानं टेस्टोस्टेरॉनची पातळी 17.7 टक्क्यांनी वाढते. याव्यतिरिक्त, आलं शुक्राणूंची गुणवत्ताही सुधारतं.

First published:

Tags: Sexual health, Sexual wellness