मुंबई, 13 ऑगस्ट: एडिस इजिप्ती या डासामार्फत पसरणारा डेंग्यू (Dengue) या आजारात वेळीच उपचार मिळाल्यास त्याचा धोका कमी होतो. परंतु यात गुंतागुंत वाढल्यास त्याचे गंभीर परिणामही भोगावे लागू शकतात. डेंग्यूमध्ये औषधोपचारांसह आहारवरही लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं असतं. आजारादरम्यान शरीरात खूप अशक्तपणा येतो. त्यामुळे ताकद मिळावी, अशा पदार्थांचे सेवन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डेंग्यूत तुमचा आहार कसा असायला हवा याबद्दल आहारतज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. ‘
डेंग्यू झाल्यानंतर त्यातून लवकर बरं होण्यासाठी बकरीच्या दुधाचा आहारात समावेश करावा, असं आहारतज्ज्ञ सांगतात. कारण बकरीच्या दुधामध्ये फॉलिक अॅसिड (Folic Acid) नावाच्या व्हिटॅमिनचं प्रमाण अधिक असतं व बकरीच्या दुधातील प्रथिनं सहज पचू शकतात. बऱ्याचदा बकरीचं दूध मिळत नाही. अशावेळी आपण टोन्ड किंवा गायीचं दूध पिऊ शकतो, अशी माहिती ‘ओन्ली माय हेल्थ हिंदी’ने या हेल्थ पोर्टल ने दिली आहे.
डेंग्यूचा उपचार घेताना आहारात आपण अंड्याचा समावेश करू शकतो. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये उच्च प्रथिनं (High Protein) असतात. त्यामुळे तो भाग काढून टाकत अंड्याच्या पांढऱ्या भागाचं एका मर्यादित प्रमाणात सेवन करायला हवं. लखनऊ येथील न्यूट्रिडाएट क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ प्रीती श्रीवास्तव यांच्या मते, डेंग्यू झाल्यानंतर शरीरातील ताकद कायम राहण्यासाठी हलका-फुलका आहार असणं अत्यंत आवश्यक असतं. खिचडी किंवा इतर पचायला हलक्या पदार्थांसह दही खाण्यास काही हरकत नाही. दह्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण असतं. त्यामुळे याच्या सेवनाने शरीरातील अशक्तपणा घालवण्यासाठी याची मदत होते. रात्रीच्यावेळी मात्र दही खाऊ नये, त्यामुळे प्रकृतीशी निगडीत अडचण निर्माण होऊ शकते.
भात खावा की टाळावा?
दररोजच्या आहारात अनेकांना भाताचं (Rice) सेवन करण्याची सवय असते. भात खाल्ल्याशिवाय त्यांचं पोटच भरत नाही. डेंग्यूचा आजार झाल्यानंतर भात खावा की नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर बोलताना आहारतज्ज्ञ प्रीती सिंह म्हणाल्या की, डेंग्यूचा ताप असल्यानंतर आहारात पचायला हलक्या पदार्थांचा समावेश असायला हवा. डेंग्यू झाल्यानंतर दुपारच्या वेळी तुम्ही भात खाऊ शकता. सायंकाळच्या वेळी मात्र भाताचं सेवन करू नये. भातामधील पोषक तत्त्वांमुळे डेंग्यूतील अशक्तपणा दूर होऊ शकतो.
Weight Loss In Sleep : आता आरामशीर झोपेदरम्यानही होईल वजन कमी, फक्त फॉलो करा या टिप्सपपईचे सेवन करणं योग्य की अयोग्य?-
आहारतज्ज्ञांच्या मते, डेंग्यू झाल्यानंतर पपईच्या पानांचं सेवन करण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. स्नॅक म्हणून पपईचा आहारात समावेश आपण करू शकतो. पपईमध्ये काइमोपपॅन आणि पपॅनसारखे एन्झाइम्स (Papain Enzymes) असतात. त्यामुळे रक्तातील प्लेटलेट्सची (Blood Platelets) संख्या वाढण्यास मदत होते. फक्त सायंकाळच्या वेळी फळांचं सेवन करू नये, असा सल्लाही तज्ज्ञांकडून दिला जातो.
नियमित सकस आहारावर भर देऊनही डेंग्यूतून लवकर बरं होता येतं. डेंग्यू झाल्यानंतर आहारात द्रव पदार्थांचा समावेशही करायला हवा. याचाही चांगला फायदा होत असतो. दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा चांगला फायदा होऊ शकतो.