जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Benefits of soaked gram: भिजवलेले हरभरे आरोग्यासाठी आहेत खूप फायदेशीर; खाण्याची ही योग्य वेळ

Benefits of soaked gram: भिजवलेले हरभरे आरोग्यासाठी आहेत खूप फायदेशीर; खाण्याची ही योग्य वेळ

Benefits of soaked gram: भिजवलेले हरभरे आरोग्यासाठी आहेत खूप फायदेशीर; खाण्याची ही योग्य वेळ

शरीरातील रक्ताचं प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. शारीरिक दुर्बलतेनं (Weakness) त्रस्त असलेल्या लोकांना त्यांचं शरीर मजबूत बनवायचे असेल तर भिजवलेले हरभरे (Benefits of soaked gram) खावेत. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : आज आम्ही तुम्हाला भिजवलेले हरभरे खाण्याचे फायदे (Benefits of soaked gram) सांगणार आहोत. भिजवलेले हरभरे खाल्ल्यानं शरीराला लोह मिळतं. याच्यामुळं शरीरातील रक्ताचं प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. शारीरिक दुर्बलतेनं (Weakness) त्रस्त असलेल्या लोकांना त्यांचं शरीर मजबूत बनवायचे असेल तर भिजवलेले हरभरे (Benefits of soaked gram) खावेत. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. यामुळे तुमच्या शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता, असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. भिजवलेल्या हरभऱ्यांविषयी आयुर्वेद तज्ज्ञ काय सांगतात? झी न्यूज ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ आणि “अतुल्य आयुर्वेद” चे संस्थापक डॉ. अबरार मुलतानी यांच्या मते, भिजवलेले हरभरे बदामापेक्षाही सर्वच बाबतीत चांगले आहेत. पण त्याची किंमत बदामापेक्षा कमी असल्यानं लोक त्याचं फारसं कौतुक करत नाहीत. भिजवलेल्या हरभऱ्यांमध्ये मँगनीज, थायामिन, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे पोषक घटक असतात. या पोषक तत्वांचं सेवन केल्यानं शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय, चयापचयाची प्रक्रिया वेगवान होते. तुमचं शरीर पूर्वीपेक्षा जास्त चरबी जाळून ऊर्जा निर्माण करतं. भिजवलेले हरभरे खाण्याचे आणखी काही फायदे 1. कर्करोगापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त चण्यामध्ये ब्युटीरेट नावाचं फॅटी ऍसिड असते, जे कर्करोगास कारणीभूत असलेल्या पेशी नष्ट करण्यास मदत करतं. याच कारणामुळं सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले हरभरे खाल्ल्यानं कर्करोगाचा धोका कमी होतो. 2. वजन कमी करण्यात उपयुक्त हरभरा खाल्ल्यानं तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकता. हरभऱ्यात ग्लायसेमिक इंडेक्स नावाचा घटक आढळतो, ज्यामुळं भूक कमी होते. हे वाचा -  HBD: कधीकाळी बोल्ड फोटोशूटमुळे निघाला होता अजामीनपात्र वॉरंट; ती रीमा सेन सध्या काय करते? 3. अशक्तपणा दूर होतो भिजवलेले हरभरे खाल्ल्यानं लोह मिळतं. ते शरीरातील रक्ताचं प्रमाण योग्य राखण्यास मदत करतं. अॅनिमियापासून (Anemia) मुक्ती मिळवायची असेल, तर आहारात भिजवलेल्या हरभऱ्याचा समावेश करता येईल. 4. रक्त शुद्ध होतं भिजवलेल्या हरभऱ्यामध्ये प्रथिनं, कर्बोदकं, चरबी, तंतुमय पदार्थ (फायबर - Fiber), कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वं आढळतात. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी यांची भूमिका महत्त्वाची असते. भिजवलेले हरभरे खाल्ल्यानं रक्त शुद्ध होतं. तसेच, मेंदू तीक्ष्ण होतो. हे वाचा -  बायकोची हत्या करून पोलिसांना फिल्मी स्टाइल गुंगारा; प्रयत्न फसला अन् गजाआड झाला भिजवलेले हरभरे केव्हा खावे डॉक्टर अबरार मुलतानी म्हणतात की, भिजवलेले काळे हरभरे खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी. भिजवलेले हरभरे सकाळी रिकाम्या पोटी खाणं आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. सकाळचा सकस आणि पौष्टिक नाश्ता घेणं खूप महत्वाचं असतं, जेणेकरून तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. या दृष्टीने हरभरा सकाळी खाणं हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात