Home /News /lifestyle /

Hibiscus Oil : घनदाट-काळ्या केसांसाठी जास्वंदीचं तेल वापरून पाहा; कोंडा, केस गळतीवरही आहे फायदेशीर

Hibiscus Oil : घनदाट-काळ्या केसांसाठी जास्वंदीचं तेल वापरून पाहा; कोंडा, केस गळतीवरही आहे फायदेशीर

केसांमधील कोंडा घालवण्यासाठी, केस गळणं थांबवण्यासाठी, केस दाट होण्यासाठी, केसांना कंडिशनिंग करण्यासाठी, केस निरोगी ठेवण्यासाठी जास्वंदीचं तेल (Benefits Of Hibiscus Oil For Hair) खूप फायदेशीर ठरतं.

    नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : केसांची चांगली वाढ होण्यासाठी आणि ते घनदाट राहण्यासाठी जास्वंदीच्या तेलाचा (Hibiscus Oil) वापर वर्षानुवर्षे केला जात आहे. विशेषत: चीन आणि भारतात जास्वंदीचं तेल बऱ्याच काळापासून केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी वापरलं जात आहे. जास्वंदीची फुलं आणि त्याची पानं यांचा केसांच्या वाढीवर चांगला परिणाम होत असल्याचंही संशोधनात आढळून आलंय. हेल्थलाइनच्या मते, केसांमधील कोंडा घालवण्यासाठी, केस गळणं थांबवण्यासाठी, केस दाट होण्यासाठी, केसांना कंडिशनिंग करण्यासाठी, केस निरोगी ठेवण्यासाठी जास्वंदीचं तेल (Benefits Of Hibiscus Oil For Hair) खूप फायदेशीर ठरतं. जास्वंदीच्या फुलांपेक्षा पानांना जास्त फायदा होतो संशोधनात असं आढळून आलं आहे की, जास्वंदी फुलाच्या (Hibiscus Flower) तुलनेत त्याच्या पानांचा अर्क (Hibiscus Leaf) केसांना लावल्यास केसांना जास्त फायदा होतो. 2003 मध्ये, उंदरांवर केलेल्या संशोधनात असं आढळून आलंय की, जास्वंदीच्या पानांचा अर्क केसांच्या वाढीवर आणि केसांच्या मुळांवर अधिक प्रभावी आहे. असा करा वापर बदाम तेल, खोबरेल तेल, जोजोबा तेल, ऑलिव्ह तेल, अक्रोड तेल इत्यादींमध्ये जास्वंदी तेल मिसळा आणि केसांना लावा. हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावा आणि अर्ध्या तासानंतर धुवा. असं केल्यानं अधिक फायदा होईल. जास्वंदी तेलाचे फायदे 1. केस दाट आणि लांब होतात जास्वंदीच्या फुलामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे केसांची मुळं घट्ट करण्यासाठी फायदेशीर असतं. हे तेल लावल्यानं केस निरोगी, दाट, लांब होतात. जास्वंदीच्या फुलापासून बनवलेलं तेल केसांना पोषण देतं. जास्वंदीचं फूल आणि त्याचा अर्क यांच्यांमुळं केसांची वाढ होण्यास मदत होते. 2. केस मजबूत होतात जास्वंदी तेल लावल्यानं केसांना ताकद आणि लवचिकता मिळते आणि ते सहज तुटत नाहीत आणि मजबूत राहतात. या तेलामध्ये असलेलं व्हिटॅमिन-सी केसांच्या मुळांना मजबूत करतं. हे वाचा - Diabetes होण्याची 4 सर्वात मोठी कारणं; या चुकीच्या सवयी आजच सोडून द्याल तर बरे 3. कोंडा निघून जातो जास्वंदी तेलात बुरशीविरोधी (अँटीफंगल) गुणधर्म असतात. हे कोंडा दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. हे तेल डोक्याच्या त्वचेला खाज सुटणं आणि डोक्यातील कोंडा यांच्याशी लढण्यासाठी आणि त्यापासून मुक्त करण्यासाठी उपयुक्त आहे. हे वाचा - फळं-भाज्या खरेदी करताना या सोप्या गोष्टी ध्यानात ठेवा; नेहमी मिळेल फ्रेश, ताजा माल 4. हे तेल केसांना मऊ करतं जास्वंदीच्या फुलांमध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म आढळतात. याशिवाय यामध्ये असलेले अनेक प्रकारचे पोषक घटक केसांना चांगला रंग देतात. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Woman hair

    पुढील बातम्या