मुंबई, 19 मे : भात खाल्ल्यावर वजन वाढतं, असं टेन्शन अनेकांना असतं. त्यामुळे कित्येक लोक भात खाणं टाळतात. पण जर तुम्हाला कोणी असा भात दिला जो खाल्ल्यावर तुमचं वजन वाढणारच नाही, तर… तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. पण असा मॅजिकल राइस आहे, जो खाल्ल्यावर तुमचं वजन वाढणार नाही. आहारतज्ज्ञांनीच या मॅजिकल राइसबाबत सांगितलं आहे. आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी या मॅजिकल राइसबाबत माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हा भात तुम्हाला फॅट नाही बनवणार उलट तुमचं आरोग्य सुधारेल.
या मॅजिकल राइसचे काही फायदेही त्यांनी सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगलं. यात प्रिबायोटिक असतात, जे पोटात चांगले बॅक्टेरिया वाढवतात. लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे ज्यामुळे इन्सुलिन सेन्सेटिव्हिटी सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आयर्न आणि कॅल्शिअमचा स्रोत आहे. त्यामुळे हाडं आणि केसांचं आरोग्य सुधारतं. व्हिटॅमिन बी असतं, ज्यामुळे हार्मोन्स नियंत्रणात राहतात. स्विचबोर्डला कांदे-टोमॅटो लावा आणि काही सेकंदातच काय कमाल होते पाहा VIDEO आता वजन न वाढवता इतके फायदे देणारा हा भात आहे तरी कोणता हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. हा मॅजिकल राइस दुसरा तिसरा कोणता नाही तर उकडलेला तांदूळ किंवा उकडीचा तांदूळ आहे. उकडीचा तांदूळ जो अर्धवट शिजवलेला असतो. त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. हा तांदूळ भिजवून, उकडवून नंतर सुकवला जातो. वेगवेगळ्या प्रक्रियेतून गेल्याने त्यातील न्यूट्रिशनल घटक वाढतात. त्याचं टेक्स्चर चेंज होतं. त्यामुळे हा तांदूळ आरोग्यासाठी चांगला आहे. त्यामुळे आता वजन वाढण्याचं टेन्शन असेल पण भात खायला आवडत असेल तर बिनधास्त उकडीच्या तांदळाचा भात खा आणि त्याचा काय परिणाम दिसून आला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - लेखातील माहिती आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार देण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही. तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)