मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Benefits of Drinking Water in Glass : काचेच्या ग्लास, बाटलीतून पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे, वाचा सर्व माहिती

Benefits of Drinking Water in Glass : काचेच्या ग्लास, बाटलीतून पाणी पिण्याचे आहेत अनेक फायदे, वाचा सर्व माहिती

पाणी पिण्यासाठी काचेचे ग्लास (Glass) किंवा काचेच्या बाटल्या क्वचितच वापरल्या जातात. पण जर तुम्ही दररोज काचेच्या ग्लासमधून पाणी प्याल तर तुम्हाला त्यातून बरेच आरोग्यदायी फायदे मिळू (Benefits of Drinking Water in Glass) शकतात.

    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : पाणी पिण्यासाठी लोक सहसा आपल्या घरात स्टीलचा ग्लास वापरतात. तर अनेक घरांमध्ये पिण्याचे पाणी साठवण्यासाठी आणि पिण्यासाठी देखील प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या जातात. पाणी पिण्यासाठी काचेचे ग्लास (Glass) किंवा काचेच्या बाटल्या क्वचितच वापरल्या जातात. तेही विशेषतः जेव्हा एखादा पाहुणा आला असेल तर, पण जर तुम्ही दररोज काचेच्या ग्लासमधून पाणी प्याल तर तुम्हाला त्यातून बरेच आरोग्यदायी फायदे मिळू (Benefits of Drinking Water in Glass) शकतात. त्याबद्दल जाणून घेऊया. वास आणि केमिकल नाही सहसा, जेव्हा आपण प्लास्टिकच्या बाटलीत किंवा घरातील ग्लासमधून पाणी पितो, तेव्हा त्याची चव सामान्य पाण्यापेक्षा थोडी वेगळी जाणवते. तसेच कधी-कधी थोडा वास देखील जाणवतो. कारण प्लास्टिकमध्ये हानिकारक रसायने असतात. जी पाण्याद्वारे आपल्या शरीरापर्यंत पोहोचतात आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. पण काचेच्या ग्लासमध्ये किंवा बाटलीत कोणत्याही प्रकारच्या रसायनांचा धोका नसतो. तसेच, कोणत्याही प्रकारचा वास येत नाही किंवा चवीमध्ये कोणताही बदल होत नाही. हे वाचा - आर्यन खानने अनन्या पांडेकडून केली गांजाची मागणी! अखेर अभिनेत्रीचा मोठा खुलासा पाणी स्वच्छ आहे की नाही ते समजते काचेच्या बाटलीत किंवा काचेच्या ग्लासमध्ये पाणी ठेवले की ते दिवसभर फ्रेश राहते. तसेच पाणी स्वच्छ आहे की नाही हे जाणून घेणं सोपं आहे. पारदर्शक काचेमुळे पाण्यातील घाण सहज दिसू शकते. स्वच्छ करणं सोपं आहे बऱ्याच वेळा स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्यानेही माशांसारखा वास येऊ लागतो. तर काचेच्या ग्लासमध्ये पाणी प्यायल्याने असे काही वाटत नाही. काचेचा ग्लास स्वच्छ करणं खूप सोपं पडतं. हे वाचा - Chicken मुळे कोरोनापेक्षाही भयंकर Virus चं संकट; Avian Flu च्या महासाथीशी लढण्यासाठी तयार राहा तापमान कायम राहते प्लास्टिक आणि स्टीलच्या ग्लासेस किंवा बाटल्यांमध्ये पाणी ठेवले तर त्याच्या तापमानात (Temperature) फरक पडतो. त्याचे तापमान नेहमी वाढते आणि पाण्याची चव देखील योग्य राहत नाही. काचेच्या ग्लासमध्ये किंवा काचेच्या बाटलीत पाणी ठेवल्यावर असे होत नाही. कारण काचेच्या बाटल्या पाण्याचे तापमान जास्त काळ थंड किंवा गरम ठेवण्यास सक्षम असतात. केवळ पाणीच नाही तर कोणतेही पेय ठेवण्यासाठी तुम्ही काचेच्या बाटल्यांची मदत घेऊ शकता. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Drink water, Freshwater

    पुढील बातम्या